sant muktabai gatha

आधी तूं मुक्तचि होतासिरे प्राणीया – संत मुक्ताबाई अभंग

आधी तूं मुक्तचि होतासिरे प्राणीया – संत मुक्ताबाई अभंग


आधी तूं मुक्तचि होतासिरे प्राणीया ।
परि वासनें पापिणीया नाडिलासी ।
आधींचे आठवीं मग घेई परी ।
हरिनाम जिव्हारीं मंत्रसार ॥ १ ॥
आदि मध्य हरि ऊर्ध्व पै वैकुंठ ।
जाईल वासना हरि होईल प्रगट ॥ ध्रु० ॥
एकतत्त्व धरी हरिनाम गोड ।
येर तें काबाड विषय ओढी ।
नाम पैं सांडी वासना पापिणी ।
एक नारायणीं चाड धरी ॥ २ ॥
मुक्ताई मुक्तलग सांडिली वासना ।
मुक्तामुक्ती राणा हरिपाठें ।
नामाचेनि घोटें जळती पापराशी ।
न येती गर्भवासी अरे जाना ॥ ३ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *