sant muktabai gatha

देउळाच्या कळशीं नांदे एक ऋषी – संत मुक्ताबाई अभंग

देउळाच्या कळशीं नांदे एक ऋषी – संत मुक्ताबाई अभंग


देउळाच्या कळशीं नांदे एक ऋषी ।
तया घातली पुशी योगेश्वरीं ॥ १ ॥
दिवसा चांदिणें रात्रीं पडे उष्ण ।
कैसेंनी कठिण तत्त्व जालें ॥ २ ॥
ऋषी म्हणे चापेकळिकाळ पैं कांपे ।
प्रकाश पिसे मनाच्या धारसे एक होय ॥ ३ ॥
एकट एकलें वायांचि पै गुंफलें ।
मुक्त पैं विठ्ठलें सहज असे ॥ ४ ॥
वैकुंठ अविट असोनि प्रकट ।
वायांचि आडवाट मुक्ताई म्हणे ॥ ५ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *