sant muktabai gatha

करणें जंव कांही करूं जाये शेवट – संत मुक्ताबाई अभंग

करणें जंव कांही करूं जाये शेवट – संत मुक्ताबाई अभंग


करणें जंव कांही करूं जाये शेवट ।
तंव पडे आडवाटें द्वैतभावें ॥ १ ॥
राहिलें करणें नचलें पैं कर्म ।
हरिविण देहधर्म चुकताहे ॥ २ ॥
मोक्षालागीं उपाय करितोसि नाना ।
तंव साधनी परता पडो पाहे ॥ ३ ॥
मुक्ताई करि हरि श्रवण पाठ ।
तेणें मोक्षमार्ग नीट सकळ साधे ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *