sant muktabai gatha

मुक्तामुक्त दोन्ही आईक तो कर्णीं – संत मुक्ताबाई अभंग

मुक्तामुक्त दोन्ही आईक तो कर्णीं – संत मुक्ताबाई अभंग


मुक्तामुक्त दोन्ही आईक तो कर्णीं ।
हरिनाम वर्णी सदा काळ ॥ १॥
नाहीं काळ तेथें आम्हां वेळ कैची ।
हरिनामछंदाची गोडी थोरी ॥ २ ॥
नाना विघ्नबाधा नाईकों आम्हीं कदां ।
निरंतर धंदा रामकृष्ण ॥ ३ ॥
मुक्तपणें मुक्त मुक्ताई रत ।
हरिनाम सेवीत सर्वकाळ ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *