sant muktabai gatha

सर्व रूपीं निर्गुण संचलें पैं सर्वदा – संत मुक्ताबाई अभंग

सर्व रूपीं निर्गुण संचलें पैं सर्वदा – संत मुक्ताबाई अभंग


सर्व रूपीं निर्गुण संचलें पैं सर्वदा ।
आकार संपदा नाहीं तया ॥ १ ॥
आकारिती भक्त मायामय काम ।
सर्वत्र निःसीम अंतरी आहे ॥ २ ॥
निवृत्तीचा उच्छेदु निवृत्ति तत्त्वता ।
सर्वही समता सांगितली ॥ ३ ॥
मुक्ताई अविट मुक्तपंथरत ।
जीवीं शिवीं अनंत तत्त्वविद ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *