sant muktabai gatha

उजियेडु कोडें घेतलो निवाडें – संत मुक्ताबाई अभंग

उजियेडु कोडें घेतलो निवाडें – संत मुक्ताबाई अभंग


उजियेडु कोडें घेतलो निवाडें ।
आपुलिये चाडे जीवनकळा ॥ १ ॥
एकरूप दिसे सर्वांघटीं भासे ।
एक ह्रषिकेशें व्यापियेलें ॥ २ ॥
त्रिपुटि भेदुनी सर्वत्रगामिनी ।
एका रूपें मोहिनी तेही सदां ॥ ३ ॥
नित्यता उन्मत्त अवघेचि भरित ।
एकतत्त्वें दावित सोहं भावें ॥ ४ ॥
मुक्ताई सांगती कैसेनि गुंपती ।
मायादेवी समाप्ति निजतत्त्वीं ॥ ५ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *