sant muktabai gatha

व्यक्त अव्यक्तीचें रूपस मोहाचें – संत मुक्ताबाई अभंग

व्यक्त अव्यक्तीचें रूपस मोहाचें – संत मुक्ताबाई अभंग


व्यक्त अव्यक्तीचें रूपस मोहाचें ।
एकतत्त्व दीपाचें ह्रदयीं नादें ॥ १ ॥
चांगया फावलें फावोनी घेतलें ।
निवृत्तीनें दिधलें आमुच्या करीं ॥ २ ॥
आदि मध्य यासी सर्वत्रनिवासी ।
एक रूपें निशी दवडितु ॥ ३ ॥
मुक्ताई पूर्णता एकरूपें चिता ।
आदि अंतु कथा सांडियेली ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत मुक्ताबाई अँप डाउनलोड करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *