संत नामदेव

संत नामदेव गाथा तीर्थावळी

संत नामदेव गाथा तीर्थावळी अभंग १ ते ६२


नामयाचे भेटी ज्ञानदेव आले । लोटांगण घातलें नामदेवें ॥१॥
देऊनि आलिंगन प्रीती पडिभरें । पूजिलें आदरेम यथाविधी ॥२॥
धन्य तो अवसरु संत समागमु । करीतसे संभ्रमु आवडीचा ॥३॥
नामदेव म्हणे सुफळ माझें जिणें । स्वामीच्या दर्शनें धन्य जालों ॥४॥


पूर्व पुण्य माझें फळोन्मुख जालें । प्रत्यक्ष भेटले पांडुरंग ॥१॥
संसारीं आसक्त मायामोहें रत । तापत्रयीं संतप्त जाले जीव ॥२॥
ऐसिया पतिताचा करावया उद्धार । यालागीं अवतार तुमचा जगीं ॥३॥
तरी मी एक मूढ मतिहीनु । चरनींचा रजरेणू संतांचिया ॥४॥
म्हणोनि पंढरीनाथ पाळितसे मातेम । प्रेमजीवन भातें देवोनियां ॥५॥
आजि स्वामीनीं पाहिलें कृपादृष्टिं । केली सुखवृष्टि अनिवार ॥६॥
नामा म्हणे तुमच्या चरणाचा आधार । ठाकिन पैलपार भवनदीचा ॥७॥


ज्ञानदेव म्हणे तूं भक्तशिरोमणी । जोडिले जन्मोनि केशवचरण ॥१॥
प्रेमसुख गोडी तुजची फावली । वासना मावळली सकळ तुझी ॥२॥
धन्य तुझें जन्म धन्य तुझें कुळ । धन्य तुज राऊळ जवळीं असे ॥३॥
भक्तिप्रेम धन्य साधिलें तुवां सार । केला पैं संसार देशधडी ॥४॥
क्षणएक एकांती बैसोनी सहज । अंतरींचे गुज बोलों कांहीं ॥५॥
जीवन्मुक्त ज्ञानी जरी जालें पावन । तरि देवतीर्थभजन न संडिती ॥६॥
भक्तशिरोमणी धन्य तूं संसारीं । परि एक अवधारी वचन माझें ॥७॥
भूतळींची तीर्थें पहावीं नयनीं । असे आर्त मनीं आहे मज ॥८॥
तुझिये संगतीचें नित्य सुख घ्यावें । सार्थक करावें संसाराचें ॥९॥
ऐसी उत्कंठा बहुत माझे पोटीं । भाग्यें जाली भेटी तुजसी आजी ॥१०॥
ज्ञानदेव म्हणे पुरवी मनोरथ । करावा मुहूर्त प्रयाणासी ॥११॥


ऐसें ऐकोनी नामा विचारी मानसीं । काय द्यावेम यासी प्रतिवचन ॥१॥
विठोबाचे पाय आठविले मनीं । बोले अमृतवचनीं तयाप्रति ॥२॥
सर्व सुख मज आहे पांडुरंगी । जावेम कवणा लागीं कोण्या तीर्था ॥३॥
आहिक्य परत्रीं मज चाड नाहीं सर्वथा । न लागती पुरुषार्था मुक्ति चारी ॥४॥
रंक होऊनियां पंढरी चोहटा । राखेन दारवंटा महाद्वारीं ॥५॥
या सुखाकारणें शरीर कर्वती फाडिलें । दुर्जय तोडिलें मायाजाळ ॥६॥
त्रिभुवनींचे वैभव सांडोनियां दुरी । जालोंसे भिकारी पंढरीचा ॥७॥
कल्पतुरची छाया कामधेनूचें दुभतें । संपूर्ण आईतें सर्वकाम ॥८॥
विठोबाचे पायीं मज काय उणें । परि वासनाचि मनें गिळिली माझी ॥९॥
जन्मोनी पाळिलों पोशिलों जयाचा । विकिलों कायावाचामनें त्यासी ॥१०॥
नामा म्हणे विठाबासी पुसा । आज्ञा देईल शिरसा धरीन त्याची ॥११॥


ज्ञानदेव म्हणे भला भक्तराज । कळलें गौप्यगुज सर्व तुझें ॥१॥
धीर आणि चतुर सर्वस्वेम उदार । साजे तुज अधिकार प्रेमभक्ति ॥२॥
धन्य तूं संसारी भक्तभावशीळ । साधिलें तुवां केवळ प्रेमसुख ॥३॥
देउनी आलिंगन नामा धरियेला करीं । वंदियेलें शिरीं चरणरज ॥४॥
राउळा भीतरीं चला जाऊं वेगें । आज्ञा मागों दोघे तीर्थयात्रें ॥५॥
सत्वर उठोनी आले स्वामी जवळी । मस्तकें ठेवियेलीं चरणावरीं ॥६॥
जीवींचा निजभावो सांगे ज्ञानदेवो । ऐकोनी पंढरीरावो हासिन्नले ॥७॥
म्हणे तूं ज्ञानशीळ चिद्रूप केवळ । सबाह्यनिर्मल स्फटिक हैसा ॥८॥
सहज तीर्थरुप तूंचि निरंतर । असताम हा विचार काय करिसी ॥९॥
येरु म्हणे स्वामी बोलिलेती बरवें । परि सार्थक करावेम देहाचेम या ॥१०॥
प्रसंगें नामयाचेम संगति घ्यावें । म्हणोनी ज्ञानदेवें धरिले चरण ॥११॥


हांसोनी पंढरिनाथ पाहे नाम्याकडे । म्हणे नवल केवढें भाग्य तुझें ॥१॥
प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ति ज्ञानेश्वर । करीतसे आदर संगतीचा ॥२॥
ऐसें भाग्य जेणें सर्वस्वें साधावें । तरीच जन्मा यावें विष्णुदासा ॥३॥
जावें स्वस्ति क्षेम यावें शीघ्रवत । करावें स्वहित कळेल तैसें ॥४॥
सर्वभावें आमचा विसरु न पडावा । लोभ असों द्यावा मजवरी ॥५॥
परियेसीं ज्ञानराजा बोले जगजीवनु । तूं तंव सर्वज्ञु सुखमूर्ति ॥६॥
परि एक मागणें आहे तुजप्रती । आठवण चित्तीं असो द्यावी ॥७॥
हें कृपेचेम पोसणें माझें आवडतें । क्षण जीवापरतें न करीं कदा ॥८॥
परी तुवाम सांकडे घातलें सर्वथा । दाटलें अवस्था ह्रदय माझें ॥९॥
आरुष साबडें नामें माझें वेडें । मार्गीं मागें पुढें सांभाळावेम ॥१०॥
ताहान भूक तुवां जाणावी जीवींची । मज चिंता याची थोर वाटे ॥११॥
मग नामयाचा हातु धरोनी श्रीपती । देतु अस हातीं ज्ञानदेवा ॥१२॥
रानीं वनीं जनीं विसंबसी झणीं । धाडितों देखोनी आर्त तुझें ॥१३॥
चरणीं ठेवुनी माथा निघते जाले दोघे । आले चंद्रभागे केलीं स्नानें ॥१४॥
पुंडलिकाचे चरण वंदूनियां माथा । उतरले भीमा पैल तीरीं ॥१५॥


तीर्थयात्रेप्रति बोळविला नामा । आले निजधामा देवरावो ॥१॥
चरण प्रक्षाळाया रुक्मादेवी आली । श्रीमुख न्हाहाळी भरोनी दृष्टी ॥२॥
तैं निडारले नयन स्वेदें भिजलें वदन । ह्रदय जालें पूर्ण करुणारसेम ॥३॥
बाप कृपेचा सागरु सुखाचा सुखतरु । आर्त लोभापरु दीनालागीं ॥४॥
चरणीं ठेवुनी माथा पुसे जगन्माता । आजी कां अवस्था विपरीत देखों ॥५॥
म्हणे वाटतें जडभारी नाम्याच्या वियोगें । दाटलें उद्धेगे चित्त माझें ॥६॥
कवण्या सुखें स्थिर न राहे माझें मन । कैं डोळां देखेन प्राण माझा ॥७॥
इष्टमित्र बंधु मायबाप सखा । हीं नामें मज देखा ठेविलीं तेणें ॥८॥
तो कैसा मजवीण राखिल आपुला प्राण । हे चिंता दारुण वाटे मज ॥९॥
तव ती महामाया म्हणे जी यादव राया । झणीं तुमच्या नामया दिठी लागे ॥१०॥
शोक मोह दुःख क्षणामाजीं जाळी । तें जीवन त्याजवळीं नाम तुमचें ॥११॥


माझे भक्त मज अनुसरले चित्ते । त्याहुनि पढियंते मज आणिक नाहीम ॥१॥
व्यक्ति येणें घडे त्याची या आवडी । युगायुगी प्रौढि हेचि मिरवी ॥२॥
त्याचेनि कृतार्थ असेम मी पूर्णकाम । ते माझे परम प्राणसखे ॥३॥
ते माझे आश्रम मी त्यांचा विश्राम । जीहीं रुपनाम केलें मज ॥४॥
मी त्यांचा सोयरा ते माझे सांगाती । करी त्यांसी एकांति सुखगोष्टी ॥५॥
जीहीं तनुमन प्राण लाविला मजकडे । मी तयां आवडे जीवाहुनि ॥६॥
ते माझ्या भाग्याचे अधिकारी विभागी । वैकुंठ त्या लागीं वसतें केलें ॥७॥
त्यांचे गुज गौप्य मीची एक जाणें । माझी प्रेमखूण कळकी तयां ॥८॥
मनाची साउली कनोनियां माते । भोगिती आतां ते प्रेमसुख ॥९॥
आपुलियाचीं किरणें विराजे गभस्ती । परी किरणें तीं नव्हती आन जेंवीं ॥१०॥
तैसे माझे दास मजमाजीं उदास । असती समरस दुजेनविण ॥११॥
मी तो भक्तरुप भक्त माझें स्वरुप । प्रभा आणि दीप जयापरी ॥१२॥
हे खूण अनुभवी जाणती ते ज्ञानी । ज्या नाहीं आयणी कासयाची ॥१३॥
त्यांचिये चरणींचे रजरेणु माझें नामें । जें सांडिलें रजतमें सत्वशीळ ॥१४॥
त्यांचे भेटीलागीं हदय माझें कळवळे । कैं देखेन डोळे निवती माझे ॥१५॥


तंव ते आवडते भक्त अंतरंग आपुले । देवं बोलाविलें एकांतासी ॥१॥
म्हणे ह्या नाम्यापरतें मज दुजें नावडे । सांगे तयापुढें केशीराजु ॥२॥
त्या देखतांची दृष्टी मन माझें निवे । वाटे त्या घालावें हदयामाजीं ॥३॥
त्याचेनि लोभें मन माझें मोहिलें । अखंड राहिलें त्याचेपाशीं ॥४॥
मजपरतें दुर्जे नेणें तो नामा । नित्य माझा प्रेमा पढिये त्यासी ॥५॥
मी भक्तकाजकैवारी म्हणवितां वाटे लाज । परि म्यां कांही काज केलें त्यांचे ॥६॥
धर्म अर्थ काम त्या नाहीं दिधले । जन्मोनि बांधलें सेवाऋणें ॥७॥
तेणें आपुलेनि पुरुषार्थे जिंकिला संसार । केला मदमत्सर देशधडी ॥८॥
लोभ दंभ दुरल माया मोह वैरी । घातलें तोडरीं कामक्रोध ॥९॥
तो न मनीं आणिका देवा न करी त्यांची सेवा । मजपरता विसांवा नाहीं त्यासी ॥१०॥
तें मार्गीम शिणलें असेल कोमाईलें । सुखदुःख आपुलें सांगेल कवणा ॥११॥
त्याचिया जीवींचे मीच जाणे सर्व । हा माझा अनुभव आहे त्यासी ॥१२॥
तें माझें दास आवडतें अंतरंग । त्यजिला सर्वसंग मजसाठीं ॥१३॥
देखोनी ते आवडी अभिन्नव वाटलें । सप्रेमें दाटले सकळ भक्त ॥१४॥
परसा भागवत आनंदे नाचत । लोटांगणीं येत गरुडपारीं ॥१५॥

१०
ऐसे सुखरुप दोघे चालताती मार्गीं । परी चित्त पांडुरंगीं नामयाचें ॥१॥
क्षणाक्षणा वास परतोनी पाहे । वियोग न साहे पंढरीचा ॥२॥
म्हणे कां गा केशीराजा मोकलिलें मातें । न येसीच सांगातेम सांभाळीत ॥३॥
चिंतातुर थोर पडिलों ये परजनीं । न दिसे माझे कोणी जिवलग ॥४॥
फुटोनी हदय होती दोन्ही भाग । बहु मज उद्वेग वाटताती ॥५॥
तूं माझी जननी तूं माझा जनिता । तूं बधु चुलता पंढरीराया ॥६॥
इष्टामित्र तूंचि तूंचि गणगोत । तूंचि कुळदैवत आवडतें ॥७॥
तूंचि माझें व्रत तूंचि माझें तीर्थ । तूंचि धर्म अर्थ काम देवा ॥८॥
तूंचि ज्ञानजक्षु तूंचि माझा लक्षू । तूंचि माझा साक्षु स्वभावासी ॥९॥
साच कीं लटिकें हें माझें बोलणें । तुजवांचुनि जाणें कवण दुजा ॥१०॥
नामा म्हणे आपुलें अनाथ सांभाळीं । येऊनी ह्रदयकमळीं राहे माझ्या ॥११॥

११
ज्ञानदेव म्हणे परियेसी विष्णुदासा । तूम सुखसंतोषा पात्र होसी ॥१॥
प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या ह्रदयीम आला । तूं का वेळोवेळां खंती करिसी ॥२॥
विचारी सावध होवोनि भक्तराजा । सुखानंदु तुझा तुजची जवळी ॥३॥
मी नेणें ज्ञानगती नेणें योगयुक्ति । न देखें विश्रांति एकेविण ॥४॥
सर्वभावें मज तेंचि रुप आवडे । जें पुंडलिकापुढें उभें असे ॥५॥
तो माझा विठठल दावा दृष्टी भरी । आस मी न करी आणिकांची ॥६॥
व्यापकु विठ्ठलु आहे सर्व देशीं । जरी सांडोनियां पाहसी भेदभ्रमु ॥७॥
तो नाहीं ऐसा ठाव उरलासे कवण । सर्वत्र संपूर्ण गगन जैसें ॥८॥
काया वाचा मनें तोचि व्हावा । गीतीं गातां जीवा सुख वाटे ॥९॥
ऐकावा श्रवणीम पाहावा तोचि नयनीं । नवजावा जवळोनी दूर कोठें ॥१०॥
जें अक्षर अव्यक्त देशकाळरहित । ज्ञानी उपासित सोहंभावें ॥११॥
सर्वेद्रियांसहित आवरोनि चित्त । भोगिती अद्वैत नित्य सुख ॥१२॥
सर्व सुख मज आहे त्याच्या पायीं । आणिकांच्या वाहीं न पडे कदां ॥१३॥
तेथें माझें मन रंगलेंसें भावें । सुख येणें जीवें देखिलें डोळां ॥१४॥
सर्वगत संपूर्ण सर्वकाळ असणें । होणें आणि जाणें नाहीं जया ॥१५॥
तें तुज माझारीम तूं तयाभीतरीं । अनुभवी निर्धारी ठेवुनी मन ॥१६॥
मी न मनीं न मनीं लटिकी हे कहाणी । जळधरावांचोनि चातक जैसा ॥१७॥
तैसें माझें मन स्मरे रात्रदिवस । पंढरीनिवास जीवन माझें ॥१८॥
ऐसें ऐकोनि बोलणें म्हणे ज्ञानदेव । धन्य तुझा भाव एकविध ॥१९॥
नामा म्हणे माझ्या सुखाचा विसावा । आवडे या जीवा पंडरीरावो ॥२०॥

१२
ऐसें नित्यानंदभरित क्रमिताती मार्गु । ह्रदयीं तो अनुरागु आवडीचा ॥१॥
प्रेमें वोसंडत करितो स्वहितगोष्टी । द्राविती कसोटी अनुभवाची ॥२॥
बाप तें सुख वृष्टि होतसे अनिवार । ब्रह्मरसें पूर वोसंडत ॥३॥
ज्ञानदेव म्हणे परियेसी नामया । अद्वैत आत्मया प्रेममूर्ती ॥४॥
भक्तिभाग्य तुवां जोडिलें अविनाश । सांग पां सविलास मार्ग त्याचा ॥५॥
कैसा तो साधावा सांग भजनविधि । कैसी नमनबुद्धि सत्वशील ॥६॥
कैसा निर्विकार ध्यानाचा प्रकार । हा सर्व विचार सांगे मज ॥७॥
कैसें तें श्रवण कैसे तें मनन । कैसें निजध्यासन दृढ होय ॥८॥
कवण तें भक्ति कवण तें धृति । कवण तें विश्रांति दावी मज ॥९॥
बहु उत्कंठित या सुखा करणें । तें मज पारणें करवीम आजी ॥१०॥
सांगे हा अनुभवो साधन उपावो । विनवी ज्ञानदेवो नामयासी ॥११॥

१३
परिसुनी ते गोष्टी घाली चरणीं मिठी । दाटलासे कंठीं सद्‌गदित ॥१॥
कृपेचें पोसणें मी पंढरीरायाचें । येवढें भाग्य कैचें मज जाणिवेचें ॥२॥
नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशील । दास मी दुर्बळ वैष्णवांचा ॥३॥
नेणतें नेणतेम कांहींच मी नेणतें । म्हणोनि देवें तुम्हांतें निरविले ॥४॥
येतां माझा हात दिधला तुमच्या करीं । घातलें आभारीं मायबापें ॥५॥
याचेनि कृपावसें येईल वाचेसरिसें । कळेल कांहीं तैसें निवेदीन ॥६॥
परी भानूसी देखणें करिजे अनुतेजें । तैसें ज्ञान माझें स्वामीप्रती ॥७॥
कल्पतरु याचक कृपणाचे द्वारीं । कां दैन्य भाकी थोरी कामधेनु ॥८॥
तैसी तुमची यांच्या मज दीनाप्रती । नकळे काळगति समर्थाची ॥९॥
मातेचिया स्नेहें बाळक बोबडें । खेळे लाडें कोडें नेणे लाजो ॥१०॥
नामा म्हणे तैसें तुम्हीं माझें कवतुक । करुनी सुखें सुख वाढविताम ॥११॥

१४
ज्ञानदेव म्हणे शंका न धरिजे मनीं । दृष्टि दुजेपणीम न ठेवावी ॥१॥
सुखें सुख घ्यावेम अनुभवोनी अनुभवावें । आहे तें आघवें ब्रह्मरुप ॥२॥
तो सुखाचा अनुवाद करी रे सुखरुपा । सुख वस्तुच्या दीपा नामदेवा ॥३॥
सुखाचिये ताटीं सुखची वोगरी । तृप्ती होईल थोरी क्षुधातुरा ॥४॥
पंढरीरायाचा तूं प्रेमभांडारी । आस पूर्ण करी मज याचकाची ॥५॥
विश्रांतीसी पात्रे तूंचि विष्णुदास । हा मज भरंवसा आहे तुझा ॥६॥
म्हणोनी तुझा संग धरिली थोर आस । झणीं होसी उदास भक्तराया ॥७॥
सिंधुहुनी सखोल सुरस तुझे बोल । आनंदाची वोल नित्य नवी ॥८॥
ते मज सादर ऐकव्वी सत्वर । श्रवण क्षुधातुर जाले माझे ॥९॥
जाणीव शहाणीव तरीच शोभे सर्व । जरी होय आविर्भाव वैराग्याचा ॥१०॥
ज्ञानदेवा म्हणे तूं भक्त अंतरंग । नलगे तुज पांग बहुज्ञतेचा ॥११॥

१५
ऐसें ऐकोनियां प्रेमा आला पोटीं । म्हणे बोलावी ते गोष्टी अनुभवाची ॥१॥
येर ते कर्मधर्म सर्वही पाल्हाळ । श्रमुचि केवळ जाणिवेचा ॥२॥
ऐसा संत भेटे विरळा भाग्ययोगें । जो आथिला वैराग्यें सप्रेमळू ॥३॥
सर्वभूतीं दया सर्वभावें करुणा । जेथें मीतूंपणा मावळला ॥४॥
भजन तयां नांव वाटे मज गोड । येर ते काबाड वायांविण ॥५॥
नमन ते नम्रता न देखें गुणदोष । अंअरी प्रकाश आनंदाचा ॥६॥
येर ते दांभिक जाणावे मायावी । विश्वास मी जीवीं न धरी त्यांचा ॥७॥
ध्यान तया नांव निर्विकार निकें । जें विश्वीं माझ्या देखें विठोबासी ॥८॥
अखंड ह्रदयीं तेचि आठवण । साजिरे समचरण विटेवरी ॥९॥
नादीं लुब्ध जैसें आसक्त हरिण । जाय विसरोन देहभाव ॥१०॥
यापरि तल्लीन दृढ राखें मन । या नांवें श्रवण आवडीचेम ॥११॥
व्यवसायीं चित्त ठेवुनी कृपण । लाभाचें चिंतन सर्वकाळ ॥१२॥
यापरि अखंड स्वहित विचारण । करिजे तें मनन सत्वशीळ ॥१३॥
परपुरुषीं जैसी आसक्त व्यभिचारिणी । न लागे तिच्या मनीं कामधाम ॥१४॥
कीटकीं भृंगुटिये जैसें अनुसंधान । निकें निजध्यासन एकविध ॥१५॥
सर्वभावें एक विठठलुचि ध्याये । सर्वांभूतीं पाहे रुप त्याचें ॥१६॥
सर्वांहूइ निराळा रजतमावेगळा । भोगीं प्रेमकळा तेचि भक्ति ॥१७॥
सत्वाचा सुभटु असंग एकटु । वैराग्य उद्‌भटू एकनिष्ठ ॥१८॥
प्रारब्धाचा भोगी नेणें देहस्मृती । अखंड ते धृति निर्विकार ॥१९॥
निर्वासना मन निजलाभें संपूर्ण । नेणें स्वरुपज्ञान विकल्पाचें ॥२०॥
अनुरागेम गोविंद ध्यायिजे एकांतीं । यापरती विश्रांति आणिक नाहीं ॥२१॥
कायावाचामनें हा माझा अनुभव । सांगितला सर्व आवडीचा ॥२२॥
नामा म्हणे हेंहि वोलविलें तेणें । उदार सर्वज्ञें पांडुरंगें ॥२३॥

१६
भक्त भागवत बहुसाल ऐकिले । बहु होऊनि गेले होती पुढें ॥१॥
परि नामयाचें बोलणें नव्हे हें कवित्व । हा रस अद्‌भुत निरुपमु ॥२॥
हे सुखविश्रांति नाहीं हो कल्पांतीं । विचारावें संतीं दूरदृष्टि ॥३॥
होतू शास्त्रवक्त्ते व्युत्पत्तीचे माथे । होतू बहु श्रोते बुद्धिवंत ॥४॥
होतू कर्मनिष्ठ विधीचे उद्‌भट । होतू सर्वश्रेष्ठ पूज्य लोकां ॥५॥
होतू कलावंत कवित्व कुशल । होतू का वाचाळ चतुरतेचे ॥६॥
होतू कां पाठक होतू कां साधक । होतू कां वाचक ग्रंथकार ॥७॥
होतू आत्मज्ञानी होतू निजध्यानीं । होतू कां विरक्तत सर्व संगीं ॥८॥
होतू योगयुक्त होतू जीवन्मुक्त । होतू कां विरक्त सर्व संगीं ॥९॥
ऐसे होतू का सभाग्य संपन्न सर्वज्ञ । परि मी न मनीं तुजविण विष्णुदासा ॥१०॥
हे खूण जाणताम एक पंढरीरावो । रुक्मादेवी नाहो श्रीविठठल ॥११॥

१७
पश्चिमे प्रभास आदि करोनी द्वारका । पाहिल्या सकळिका मोक्षपुर्‍या ॥१॥
पंथीं पावन तीर्थें करुनि सकळिकें । प्रक्षाळलीं पातकें वासनेचीं ॥२॥
परी पंढरीचें प्रेम नामयाचे जीवीं । माउलीं आठवी पांडुरंग ॥३॥
जीवन्मुक्त दोन्हीं भक्त आणि ज्ञानी । परतोनि तेथोनि येते मार्गीं ॥४॥
तृषाकांत वनीं होतसे पीडनी । पडलें चिंतवणीं जीवनालागीं ॥५॥
तंव दृष्टि एक कूप देखिला अवचिता । उदक तेथें पाहतां न लगे अतु ॥६॥
कवणेपरी येथें करुं रिघवणी । प्राण संतर्पणी वांचवावे ॥७॥
मग त्या नाम्याप्रती बोले ज्ञानदेवो । मज एक उपावो साध्य असे ॥८॥
लघिमेचे लाघव करुनि ते अवसरीं । उतरोनि भीतरीं घेतलें उदक ॥९॥
घेऊनि उदक निघाला बाहेरी । मग म्हणे अवधारी नामदेवा ॥१०॥
आणोनि उदक देईन तुझ्या हातीं । न दिसे अनुगति आणिक कांहीं ॥११॥
पडिल्या संकटीं विचारावें मनीं । सांडावी आयनी अभिमानाची ॥१२॥
आत्मा तो विठठल सर्व निरंतरीं । आज्ञा दे झडकरि वेळु जाला ॥१३॥
आत्मा तो विठ्ठलु असताम सर्व देहीं । माझी काय नाहीं चिंता त्यासी ॥१४॥
नामा म्हणे धीर करावा नावेक । दावीन कवतुक स्वामीजवळी ॥१५॥

१८
मग लावूनियां नेत्र निर्धारु पैं केला । ह्र्दयीं आठविला केशीराज ॥१॥
तूं इष्ट मित्र बंधु सोयरा जननी जनकु । नेणें मी आणिकु तुजवांचोनी ॥२॥
येई पंढरीराया मजलागीं धांवतु । झणीं पाहासी अंतू कृपाळुवा ॥३॥
तुझिये भेटीची बहु खंती वाटली । आसुवें दाटलीं नेत्रकमळीं ॥४॥
धीर न धरवे जीवा पोकारितो धांवा । ये माझ्या केशवा मायबापा ॥५॥
कायावाचामनेम विनटलों चरणासी । तो मी शरण आणिकांसी जाऊं कोणा ॥६॥
जन्मोनी पोसणा तुझाची म्हणती । मोकलितां अंतीं लाज कोणा ॥७॥
अनाथा कैवारी नामाची आयणी । वर्णिजे पुराणीं कीर्ति तुझी ॥८॥
तें काय लटकी वाणी करशील आजी । अजुनी तुज माझी करुणा न ये ॥९॥
गजेंद्राकारणें ज्या वेगीं धांवणें । केलें तंव स्मरणें कळवळोनी ॥१०॥
द्रौपदीचे आकांतीं येसी सोडविणें । तें मजकारणें विसरलासी ॥११॥
येतां निरविलें ज्ञानदेवाप्रती । दिधला त्याचे हातीं हात माझा ॥१२॥
तो तूं कैसा मजलागीं करशील उदास । धांव कासावीस थोर जालों ॥१३॥
सर्वभावें तू मजलागीं लोभापर । मी तुझा डिंगर आवडता ॥१४॥
नामा म्हणे हांसे जालें पिसुणाचें । न करी मज दीनाचें अव्हेरण ॥१५॥

१९
तंव निजभुवनीं सुखें पंढरीनाथ । नित्य जीवीं आर्त निजहक्तांचे ॥१॥
कृपेचा वारेसु होता देवापोटीं । तेचि करी गोष्ट रुक्माईसी ॥२॥
क्षेम माझा नामा यावा एक वेळां । मग मी जीवावेगळा जाऊं नेदी ॥३॥
आजि माझा डावा कां लवतो लोचन । करितसे स्फुरण वामबाहू ॥४॥
उद्वेग उपसर्ग वाटती जीवाशीं । कवना जिवलगाशीं कष्ट होती ॥५॥
वाजतां पैं वारा न लागावा राजसा । माझ्या विष्णुदासा भाविकासी ॥६॥
वाटे तानभूक जाली त्या पीडणी । तरीच माझ्या मनीं ऐशी दशा ॥७॥
तंव ती विश्वमाता विचारी नावेक । अवचिता शोक पडिला कानीं ॥८॥
म्हणे तृषाक्रांत नामा करितसे धांवा । वेगीं जाऊनि देवा सांभाळावें ॥९॥
तंव तो आर्तबंधु ऐकोनि वचन । मनाचेनि मनें वेगू केला ॥१०॥
तंव गडगडित कूप उदकें वोसंडला । कल्पांतीं खवळला सिंधु जैसा ॥११॥
ज्ञानदेव म्हणे जालें अभिन्नव । कैसा ऋणिया देव केला येणें ॥१२॥
सावध करोनिया दिलें आलिंगन । जीवें निंबलोण उतरिलें ॥१३॥
तो येरें चरणावरी ठेवियेला माथा । म्हणे माझे आहे चिंता विठोबासी ॥१४॥
नामा म्हणे माझे बहु लळे पुरविले । कैं देखेन पाउलें विटेवरी ॥१५॥

२०
योगी परम ध्यानीं बैसलिया जाणा । कांहीं या रे मना विश्रांति नुपजे ॥१॥
तुजवीण दुसरें कांहींच नाठवे । लागली तुझी सवे विष्णुदासा ॥२॥
कवण कुळीं तूं जन्मलासी नामा । केशव परमात्मा तुज जवळी ॥३॥
धेनु वसे वनीं वत्स असे घरीं । चित्त तयावरी ठेवुनी चरे ॥४॥
ते तया देखोनी संतोषली मनीं । तैसा तुझ्या गुणी वोल्हावलों ॥५।
तीर्थयात्रें जाणे न लगे कांहीं करणें । ऐकोनी तुझें गाणें सुखरुप ॥६॥
वेडावल्या श्रुतिस्मृति आणि पुराणें । योगियांची ध्यानें विसर्जिलीं ॥७॥
तुझें प्रेम सांडावें आणि मनें कोठें जावें । जावोनियां पाहावें काय कोठें ॥८॥
समाधिसोहळा लय लक्ष वैराग्य । आम्हांलागीं भाग्य आणियेलें ॥९॥
ऋषि गणगंधर्व ब्रह्मादिक सर्व । लक्षिताती ठावो अरुपाचा ॥१०॥
तो तुवां आम्हां सन्मुख उभा केला । चरणासी लागला ज्ञानदेव ॥११॥

२१
तीर्थे करोनी नामा पंढरीये आला । जिवलगा भेटला विठोबासी ॥१॥
सद्‌गदित कंठ वोसंडला नयनीं । घातली लोळणी चरणावरी ॥२॥
शिणलों पंढरिराया पाहें कृपादृष्टी । थोर जालों हिंपुटी तुजविण ॥३॥
अज्ञानाचा भाग होता माझे मनीं । हिंडवलें म्हणोनि देशोदेशीं ॥४॥
परि पंढरीचें सुख पाहतां कोटि वाटे । स्वप्नींही परि कोठें न देखेंची ॥५॥
उदंड तीर्थाची ऐकों जाय प्रौढी । परि चित्त माझें वोढी चंद्रभागा ॥६॥
म्हणोनि चरणांची ठाकोनि साउली । आलों मज सांभाळीं मायबापा ॥७॥
तया देवाची वास न पाहती माझे नयन । न करिती पूजन कर त्यांचे ॥८॥
तेणें पंथें माझे न चलती चरण । नाइकती श्रवण कीर्ति त्यांची ॥९॥
कटी तटीं जेणें कर नाहीं ठेविले । न देखें पाउलें विटेवरी ॥१०॥
त्यांते म्हणतां देव लाजे माझे मन । ते कष्ट दारुण कवणा सांगू ॥११॥
जये गांवीं नाहीं वैष्णवांचा मेळु । न देखे सुकाळु हरिकथेचा ॥१२॥
कुंचे गरुड टके न देखों पताका । त्या देवाची शंका वाटे थोर ॥१३॥
हें जेथें न देखें तेथें खंती वाटे जीवीं । नामा म्हणे आवडता प्राण माझा ॥१५॥

२२
केशव म्हणे नाम्या खंती वाटे माझ्या मनीं । निद्रा न लगे नयनीं पाहताम वाट ॥१॥
तुजविण उदास वाटे ही पंढरी । न पडे क्षणभरी विसरु तुझा ॥२॥
डोळियां वेगळा नवजें कोठें दुरी । चित्त मजवरी ठेवुनि राहे ॥३॥
तुज माझी सवे मज तुझी आवडी । गुळासी न सोडी गोडी जैसी ॥४॥
तैसे तुम्ही आम्ही एकमेकांमाजीं । विचारिताम सहजीं दुजें नाहीम ॥५॥
येतया जातया पुसे तुझी गोष्टी । म्हणे माझें नामें दृष्टि पडिलें होतें ॥६॥
वाटे तहानभूक पीडिल्या जाणें कोण । एका मजविण गूज त्याचें ॥७॥
रात्रदिवस खेद करुनि आपुल्या जीवा । असेल माझा धांवा पोकारीत ॥८॥
मजवीण कोणाचिये साउलीं बैसेल । कोण त्या पूसेल शीणभागु ॥९॥
संपांपासीं सांगे शिणले मजविण । कंठीं धरिला प्राण मजलागीं ॥१०॥
धरुनीं हनुवटी दिधलें आलिंगन । कुरवाळोनी वदन नेत्र पुशी ॥११॥
मग काढोनी कंठीची सुमनतुळशीमाळा । घातलिसे गळां नामयाच्या ॥१२॥
सर्वांसुंदर पाहे कृपादृष्टी । पुसे जीवींची गोष्टी कृपासिंधू ॥१३॥
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान खेचर । नरहरि सोनार आदिकरोनी ॥१४॥
समस्त भक्त मिळोनी लोटांगणीं येती । आलिंगन देती नामयासी ॥१५॥
अनिवार सुमनें वर्षती सुरवर । गगनीं जयजयकार शब्द होती ॥१६॥
ऋषिगण गंधर्व मिळोनि सकळिक । येती दृष्टिसुख घ्यावयासी ॥१७॥
रुक्माई आरती घेऊनी आली वेगें । ओंवाळिले दोघे देवभक्त ॥१८॥
कवतुकें नाम्याची धरिली हनुवटी । पाहे कृपादृष्टी घडिये घडिये ॥१९॥

२३
केशव म्हणे नाम्या धन्य तुज फावलें । बरवें तुवां केलें आत्महित ॥१॥
पुण्यपावन तीर्थें पाहिलीं सकळिक । प्रक्षाळिलीं पातकें वासनेचीं ॥२॥
धन्य तुवाम केलें जन्मोनि सार्थक । शोक मोह दुःख निवारिलें ॥३॥
तीर्थयात्रा सफळ व्हावया संपूर्ण । करी का उद्यापन विधियुक्त ॥४॥
केलिया कष्टाचेम होईल सार्थक । सांगेन तें ऐक वचन माझें ॥५॥
महा मुक्तिक्षेत्र वैकुंठ महीवरी । विख्यात पंढरी भूवैकुंठ ॥६॥
एक शीत अन्न अर्पे द्विजामुखीं । राहे सदा सुखी कल्पवरी ॥७॥
क्षेत्रवासी भावें पूजावे ब्राह्मण । षड्रस भोजन द्यावें त्यांसी ॥८॥
सुगंध चंदन सुमन तुळसीमाळा । समर्पी तांबुला सदक्षिणा ॥९॥
ऐसें बोलोनियां देवें नामा धरियेला करीं । राउळभीतरीं घेउनि गेले ॥१०॥
मग रुक्माईसी सांगे वैकुंठीचा राणा । आजी आराधना नामयाची ॥११॥

२४
तंव ते जगन्माता म्हणे जी कृपावंता । कर्ता करविता कोण याचा ॥१॥
हा तुमचा दास आहे अंतरंग । काय या उद्वेग करणें असे ॥२॥
सर्व भार याचा लागे चालवणें । ऋणवई केलें येणें जन्मोजन्मीं ॥३॥
तुम्हांपरतें यासी जिवलग सोयरे । कोण आहेत दुसरे लोभापर ॥४॥
दृढ चरण धरोनि राहिला अंतरीं । जालासे अधिकारी सर्वस्वाचा ॥५॥
जन्मोनिया येणें जोडिलें जें कांहीं । तितुकें तुमच्या पायीं निक्षेपिलें ॥६॥
म्हणोनि याचें कोड करावें परिपूर्ण । व्हावें पैं उत्तीर्ण ऋणियाचें ॥७॥
मायबापें याची सखी जिवलग । सांडोनि तुमचा संग धरिला सुखें ॥८॥
म्हणोनि याचें हित लागे विचारावें । उचित करावें देवराया ॥९॥
आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा । करणें हे गोपाळा ब्रीद तुमचें ॥१०॥
रुक्माई म्हणे हा भाग्यवंत नामा । न कळे याचा प्रेमा नित्य नवा ॥११॥

२५
आतां जावें वेगीं नामया घेऊनि । सांगावीं आवंतणी ब्राह्मणांसी ॥१॥
सकळकामपूर्ण असती तुमच्या पायीं । विचारावें कांहीं न लगे देवा ॥२॥
काय काय न लभे तुमचे कृपादृष्टी । सदा सुखवृष्टी हरिच्या दासां ॥३॥
नामयाचा हात धरोनि पंढरीनाथ । निघाले अक्षत द्यावयासी ॥४॥
निवृत्ति ज्ञानेश्वर जनमित्र सोपान । सांवता जाल्हण घेऊनि सरिसे ॥५॥
चोखामेळा बंका काठीकर पुढें । दोन्हीं बाही देव्हडे सनकादिक ॥६॥
नामयाचे पाठीं चाले केशीराज । लागावया रज चरणींचे ॥७॥
आपुल्या दासाचा सिद्धि न्यावा पणु । म्हणोनि यजमानु जाला देव ॥८॥
तेणें मिसें करितसे क्षेत्रप्रदक्षिणा । प्रार्थित ब्राह्मण परम प्रीति ॥९॥
ऐसा अनाथांचा नाथ दीनाचा गोसावी । आवडी नित्य नवी सेवकाची ॥१०॥
तो या नामयाचा सुखाचा शृंगारु । रुक्मादेविव्रु श्रीविठ्ठल ॥११॥

२६
तंव अध्यात्मिक पंडित अग्निहोत्री । एक म्हणविती श्रीत्री सदाचार ॥१॥
आम्हांसी तें नाहीं तुमचें स्वरुपज्ञान । अपूर्व दर्शन देखिलें आजी ॥२॥
सुखाचेम पारणें करविलें या रुपें । तेणें त्रिविधताप निवारले ॥३॥
कवण वृत्ति काय चालविजे व्यापार । योजिलें बिढार कवणें ठायीम ॥४॥
आजिचें निमित्त काय उपस्थित । ऐकोनि पंढरीनाथ बोलते जाले ॥५॥
माझी कुळवृत्ति हरिदासां ठाउकी । मज यासी ओळखी निकट असे ॥६॥
मज असंगा संगु सर्वकाळीम याचा । अनंत जन्मांचा ऋणानुबंध ॥७॥
साक्ष तुमचे चरणा करुनि बोले वाचा । मी मैत्र नामयाचा अंतरंगु ॥८॥
करोनियाम स्नानविधी यावें शीघ्रवत । करावें सनाथ कृपादृष्टीं ॥९॥
बिढार तरी असे राउळ्भीतरीं । नांव सांगों तरी अनंत जाणा ॥१०॥
जीवींचें गुजगौप्य संतांसी पुसावें । निःसंदेह यावें भोजनासी ॥११॥
ऐसी ते अमृतवाणी ऐकोनि श्रवणीं । आनंदले मनीं भूदेव ते ॥१२॥
आज्ञा देती देवा जावें निजमंदिरा । शीघ्रवत करा पाकसिद्धी ॥१३॥
मग रुक्माईसी सांगे सकळ विवंचना । प्रार्थिले ब्राह्मणां सकळिकांसी ॥१४॥
कर्मठ अभिमानी नोळखती मज । देखिनियां चोज वाटे त्यांसी ॥१५॥
कुळवृत्ति नाम पुशिलें मज तिहीं । सांगितलें म्यांही सर्व त्यांसी ॥१६॥
सांगाती संतांचा मी मैत्र नामयाचा । अनंत जन्मांचा निकट म्हणोनी ॥१७॥
बिढार तरी असे राउळभीतरीं । सांगे खूण परी न कळे त्यांसी ॥१८॥
नाम तरी अनंत दाविला संकेत । परी नेघे त्यांचें चित्त आठवण ॥१९॥
तंव ते विश्वमाता म्हणे जी कृपानिधी । सदा भेदबुद्धि त्यांचे ठायीं ॥२०॥
विद्या वयसा जाती कुळाचा अभिमान । त्या कैचे चरन प्राप्त तुमचे ॥२१॥
उदार चक्रवतीं भक्तांचा विसावा । त्याच्या निजभावा वेळाईतु ॥२२॥
तो भाग्यें जोडला वैकुंठीचा ठेवा । उजरीं जाली दैवा नामयाच्या ॥२३॥

२७
तंव अणिमादि सिद्धि उभ्या महाद्वारीम । तिहीं सर्व सामोग्री सिद्ध केली ॥१॥
सडासंमार्जनें गुढिया तोरणें । शृंगारिलीं भुवनें परिचारिकीं ॥२॥
म्हणती काय पुण्य केलें येणे विष्णुदासें । देवा लोभ पिसें लावियेलें ॥३॥
द्वारीं दिपावळी चौकरंग माळा । अभिनव सोहळा आरंभिला ॥४॥
हरुषें मंगळ तुरे वाजती विनोदें । भक्त जयजय शब्देम गर्जताती ॥५॥
मंगळ मार्जन नामयातें करविलें । मग तें आरंभिलें पुण्याहवाचन ॥६॥
देवे अंगवस्त्रें आपुलेनी हातें । वाहिलीं अनंतें विष्णुदासा ॥७॥
सत्यभामा राही रुक्माई जननी । वेगीं अक्षवाणी घेऊनि येती ॥८॥
आनंदें नरनारी कवतुक पाहती । जीवें ओवाळिती नामयासी ॥९॥
आपुलिया दासाचा करी समारंभु । दीनानाथ प्रभु कृपसिंधु ॥१०॥
धन्य हा नामा म्हणती सकळ लोक । नेणती याचें सुख ब्रह्मदिक ॥११॥

२८
मग जाला स्वयंपाक स्नानविधि सारा । सकळां हांकारा जाणविला ॥१॥
आले महाद्वारीम दिधलीं आसनें । पूजा नारायणें आरंभिली ॥२॥
तंव ठकलों म्हणती देव पहा हो कैसें जालें । सर्व सुख नेलें इहीं भक्तीं ॥३॥
रत्नजडित पाट सत्वरी आणिले । वरी द्विज बैसविले पृथक्कारें ॥४॥
प्रक्षाळोनि चरण पुसिले पीतांबरें । मस्तकीं आदरें तीर्थ वंदी ॥५॥
कस्तुरीचे टिळे दिव्य चंदन उटी । घातलिया कंठी तुळशीमाळा ॥६॥
दशांग धूप रत्नाचा दीपक । ओवाळी नायक वैकुंठींचा ॥७॥
दोही बाही पंक्ति मांडिल्या देव्हडी । राही रुक्माई परवडी वाढितसे ॥८॥
चतुर्विध अन्नें आथिलीं बहुगुणें । षड्र्स पक्वान्नें सर्वांठायीं ॥९॥
मग संकल्प सोडिला नामयाचे करें । भक्त जयजयकारें गर्जिन्नले ॥१०॥
भोक्ता नारायण लक्ष्मीचा पती । म्हणोनि प्राणाहुती घेतल्या वेगीं ॥११॥
भर्ता भोक्ता कर्ता करविता आपण । सहज तेथें पूर्ण सकळ काम ॥१२॥
विश्वंभर कृपादृष्टि न्याहाळीत । प्रार्थना करीत ब्राह्मणांची ॥१३॥
देखोनि ते समृद्धि हरिखले द्विज । जाले नवल चोज पहा कैसें ॥१४॥
कोण हा गृहस्थु केव्हडा भाग्यवंतु । नेणए अद्‌भुतु महिमा याचा ॥१५॥
ऐसे जेविले आनंदे धाले परमानंदें । मुखसुद्धि गोविंदें दिधली करीं ॥१६॥
कर्पूरेंसहित समर्पिले विडे । कर जोडोनी पुढें विनवीतसे ॥१७॥
ऐसा भक्तजन कृपाळू दीनाचा दयाळु । आनंदें गोपाळु उभा असे ॥१८॥
तया नामदेवें भुलविलें लोभें । वेडावले उभे चिदानंद ॥१९॥

२९
सकळिकां नकस्कार करुनी यादवरावो । सांगे जीवींचा भावो तयांप्रती ॥१॥
तुमचे कृपादृष्टि करावें भोजन । येणें होईल संपूर्ण व्रतसिद्धी ॥२॥
हेचि आवडी आहे बहु माझ्या जीवीं । ते आजी गोसावी पूर्ण कीजे ॥३॥
क्षण एक बैसावें स्वस्थ अंतःकरणें । संकल्पिलें नारायणें तुळसीदळ ॥४॥
संतुष्ट मानसें यातें अंगिकारा । मग निजमंदिरा जावें स्वामी ॥५॥
आजि तुमचा लाभु जाला भाग्य योगें । नामयाच्या प्रसंगें घडली सेवा ॥६॥
तुम्ही ब्रह्मबीज ब्रह्मादिकां पूज्य । सांभाळिले मज कृपादृष्टी ॥७॥
मज निरालंबासी करोनी अवलंबन । निष्कामासी पूर्ण केलें काम ॥८॥
अकर्ता असंगु तुमचेनि कृतार्थ । जालों पैं यथार्थ वचन माझें ॥९॥
मग ते चतुर्विधा महामंत्रस्वरें । द्विज जयजयकार करिताती ॥१०॥
विजय सर्वकाळ व्हावें पुढतो पुढतीं । आशिर्वाद देती मंत्राक्षता ॥११॥
पितांबराचे अचळीं घेउनी मंत्राक्षता । घालितसे माथा नामयाच्या ॥१२॥
हेंचि तुझें प्रेम राहो हें चिरंतन । मुखीं नाम ध्यान ह्रदयी सदा ॥१३॥
तंव म्हणती धरामर तुम्ही श्रमलेति थोर । लागला उशीर भोजनांसी ॥१४॥
सर्वाम ठाईं तुम्ही सर्वच होउनी एक । कारण सार्थक केलें निकें ॥१५॥
स्वामीचा आदर सांगतां अभिनव । नम्रता गौरव निरुपम ॥१६॥
अकल्प आयुष्य चिरंजीव व्हावें । आम्हां सांभाळावेम पुढतापुढतीम ॥१७॥
आतां संतांचिया पंक्ती सारावें भोजन । करावेम परीपूर्ण जीवींचे कोड ॥१८॥
उच्छिष्ट प्रसाद द्यावा नामयातें । आस करुनि पाहात वास तुमची ॥१९॥

३०
सुवर्णाचें ताट वोगरुनी परिकर । रुक्माईनेम सत्वर आणियेलें ॥१॥
कनक कळस घेऊनि सत्यभामा आली । आपोशन घाली देवराया ॥२॥
सुखाचा सुरतरु भक्त चिंतामणी । पुरवितो आयणी निजभक्ताची ॥३॥
तेथे उद्धव अक्रुर नारद तुंबर । आणिक अपार भक्त येती ॥४॥
महाद्वारीं होतां उभा नामा ठेला । तो जवळी बोलाविला केशिराजें ॥५॥
देवाचा वोरसु देखोनी गौरव । देहीं देहभाव विसरला ॥६॥
निजबोध निवृत्ति राहिली निवांत । ह्रदयीं वोसंडित प्रेमरसें ॥७॥
देखोनी पंढरीनथ धाविन्नला वेगीं । जैसी वत्सालागीं तान्हें धेनू ॥८॥
उचलोनि चहूंभुजी दिलें आलिंगन । आणिलें उमजून देहावरी ॥९॥
धरोनि बाहुवटीं बैसविला ताटीं । स्फुंदताम हिंपुटी होत असे ॥१०॥
कुर्वाळोनि माथा घास घाली मुखीं । तंव तो परलक्षी तन्मय होतु ॥११॥
अंतरीचें गुज बोले कृपासिंधु । करुनि सावधु नामयासी ॥१२॥
म्हणे जिवलगा बोलें सुख गोष्टी । आर्त आहे पोटीं बहु दिवसांचें ॥१३॥
अंतरीचें सुख बाहेरी तूं पाहे । गगना काय आहे पाठीपोट ॥१४॥
तैसा तूं आनंदु आहे पै निर्मळ । चिद्रूप केवळ सदोदित ॥१५॥
तुझें तेंचि माझें माझें तेंचि तुझें । आहे सहजीम सहजें एकविध ॥१६॥
परतोनियां दृष्टि घाली मजवरी । मी तो निरंतरीं तूंचि होसी ॥१७॥
हा तुझा सोहळा पाहें उघडा डोळां । मी तुज जवळां ज्ञानदीपू ॥१८॥
आर्त तुझिये भेटी आले भक्तराणे । सुखाचें पारणें करवी त्यांसी ॥१९॥
परमानंद मूर्ति धन्य हा निर्वृत्ति । सुखाचा सांगाती ज्ञानदेव ॥२०॥
पवित्र हा सोपान परलोकींचें तारुं । करी याचा आदरु भाग्यवंता ॥२१॥
म्हणोनि पंढरीनाथें आश्वासिलें करें । मिठी दिली येरें चरणकमळीं ॥२२॥
नामा म्हणे तुझे कृपेचा वोल्हावा । विश्रांति या जिवा जाली असे ॥२३॥

३१
नामयाचे मुखीं घालुनी कवळु । पुसतसे गोपाळु शिणभागु ॥१॥
जें करकमळ सनकादिकां शिरीं । नामा तिहीं करीं कुरवाळिला ॥२॥
म्हणे सांडी सर्व खंती जीवींची काजळी । विश्रांति मजजवळी आहे तुज ॥३॥
वियोगाचेनि शोकें शिणलासी मार्गीं । देह मजलागीम वाळविला ॥४॥
कोमाईलें वदन निडारला नयनीं । नेणें कोणी तुझी तानभूक ॥५॥
गेलासी जवळुनी ज्या दिवसापासोनी । न दिसे माझें कोणी आवडतें ॥६॥
धीर न धरवे जीवा पाहें दाही दिशा । माझा विष्णुदास येईल केव्हां ॥७॥
तुज पाहे गरुडपारीं पाहे महाद्वारीं । पाहे भीमातीरीं चंद्रभागे ॥८॥
पाहे पद्मतीर्थीम पाहे वेणूनादीं । नलगे तुझी शुद्धी खंत वाटे ॥९॥
अनुदिनीं भोजन करितां उदकपान । तेव्हां आठवण होय तुझी ॥१०॥
मी म्हणे धांवत येसी न धरत । प्रसादाचें आर्त बहु तुज ॥११॥
धांवोनियां येसी आलिंगन देसी । पुसेन सांगसी सुख गोष्टी ॥१२॥
तेणें हर्षें निघती डोळियासी दोंदें । ह्रदय माझें कोंदे करुणारसें ॥१३॥
आवडतें आळुकें जननियेचें बाळ । जाण तें कृपाळ भूक त्याची ॥१४॥
तैसा पंढरीनाथ मोहें वोसरला । नाम्यातें पाजिला प्रेमपान्हा ॥१५॥

३२
ऐसी ते जेवणीं ब्रह्मरसधणी । पुरविली आयणी निजभक्तांची ॥१॥
नाम्याचें उच्छिष्ट स्वीकारिलें देवें । कवतुक अवघें पाहती द्विज ॥२॥
म्हणती आम्हां येणे कैसी केली भाव । बुडविलें सर्व क्रियाकर्म ॥३॥
नेणवे हा कोण दिसे सुलक्षण । नव्हे क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र ॥४॥
चहूंवर्णा वेगली दिसे याची लीला । विस्मृति सकळां पडली कैसी ॥५॥
निर्धारें नाम्याचा होय मायबापु । सोडविलें संकल्पू त्याच्या हातीं ॥६॥
कायावाचाअमनें लोभ याचेवरी । घातलिया शिरीं मंत्राक्षता ॥७॥
एक म्हणती जाले होते ते निर्माण । आतां आपुलें आपण गौप्य करा ॥८॥
लौकिकीं ही मात प्रकट करा झणीं । न बोलावी कोणी कोणापाशीं ॥९॥
एक म्हणती आतां यासीच वाळावें । आपुलें टाळावें लोकनिंद्य ॥१०॥
अज्ञानासे दोष नाहीं प्रत्यवाय । शास्त्रीं हा उपाय सिद्ध असे ॥११॥
आत्मशुद्धिलागीं करा विचारणा । करा मंत्रस्नाना त्रिपदा जप ॥१२॥
म्हणोनि सत्वर चालिले अवघे । प्रार्थुनियां देवें बोलाविलें ॥१३॥
संकोचित मनें दिसती कवण्यागुणें । कोमाईलीं वदनें सकळिकांची ॥१४॥
काय शंका वाटे तुमच्या मनीं स्वामी । ते कृपा करुनि सांगा मज ॥१५॥
मनाचें मवाळ तुम्ही ब्रह्मबीज । गौप्य नये गुज करुं कांहीं ॥१६॥
मी तुम्हां सकळांचें असे कृपापात्र । सांगा जीवीचे आर्त करीन पूर्ण ॥१७॥
मग समर्पोनि दक्षिणासहित तुळशीदळ । वरी त्या पुण्यजळ प्रोक्षूनियां ॥१८॥
चरणावरी नामा घालोनि निरवी । म्हणे कृपा असों द्यावी याजवरी ॥१९॥

३३
जातीचे हे शिंपी विश्व जाणे यातें । प्रत्यक्ष सांगाते जेवविलें ॥१॥
उच्छिष्ट निजमुखीं स्वीकारिलें याचें । उरलें तें तुम्हां कैचें क्रियाकर्म ॥२॥
न कळे हा निर्धार भ्रांति वाटे आम्हां । काय तुमचा नामा अंगभूत ॥३॥
नवल हे आवडी लौकिका वेगळी । बुडविले सकळीं समूळ धर्म ॥४॥
कोणा लोभें तुम्हां लावियेला चाळा । कृपेचा कळवळा निरोपमु ॥५॥
विचारिता तुम्ही आहां वेषधारी । लीला वोडंबरी दिसे तुमची ॥६॥
वर्णाश्रमधर्म न दिसे तुमच्या ठायीं । निर्धारुचि कांहीं न कळे आम्हां ॥७॥
वंद्य निद्य तुम्हां न दिसेचि कोणी । दृष्टी दुजेपणीं न पडे तुमची ॥८॥
विश्व आपरुप दिसे तुम्हां सर्व । नेणवे हे माव ब्रह्मांदिका ॥९॥
आम्हीं विश्वाअसलों वरवेषां तुमच्या । परी भाव अंतरीचा न कळे कांहीं ॥१०॥
आपुलें स्वहित देखोनि आपण । पाप अथवा पुण्य विचारावें ॥११॥
सर्वभावें करुनि विधीतें पाळावें । सर्वीं सांभाळावें वेदवचन ॥१२॥
वर्णाश्रमपरत्वें बोलिले जे धर्म । तें तें विहितकर्म आचरावेम ॥१३॥
स्वामींचे वचन स्वामीनीं पाळावें । यश मिरवावें उभयलोकीं ॥१४॥
तरी हा तुमचा जिवलग नामा । निर्धारितां आम्हां कळों आलें ॥१५॥

३४
नामयातें आम्हीं जेवविलें सांगातेम । हा दोष आम्हांतें ठेवा झणीं ॥१॥
सर्वत्र चाळक एकचि चैतन्य । वंद्य निंद्य कोण म्हणे स्वामी ॥२॥
पुण्यपाप बाधा आम्हां नाहीं कदा । असो शुद्धबुद्धा निरंतर ॥३॥
देह म्हणाल जरी वोडंबर पांचांचें । अंबरीं आभासाचें अभ्र जेवीं ॥४॥
नामा ऐसें नाम कवणिया अवयवां । सांगा तुम्ही देवा साच करोनी ॥५॥
तेजीं कीं जीवनीं गगनीं कीं पवनीं । कीं दोष धरणीमाजीं होता ॥६॥
तो तुम्हांसी गोचरु जाला कवणें युक्ति । हे खूण निरुती सांगा मज ॥७॥
तुम्हीं वेदवक्ते सर्वशास्त्र द्रष्टे । परि नाहीं आत्मनिष्ठे पावलेती ॥८॥
भेदभ्रम तुमचा नाहीं मावलला । भ्रमुची उरला संदेहेसी ॥९॥
जे वेळीं संकल्प सोडिला पैं येणें । तुम्ही आपोशनें घेतलीं कैसीं ॥१०॥
ते वेळीं नाहीं केली ही विचारणा । अधिकार अन्ना आहे कीं नाहीं ॥११॥
याचिलागीम तुम्हां प्रार्थुनी खूण सांगे । नामयाच्या प्रसंगें घडली सेवा ॥१२॥
आशिर्वद तुम्हीं दिल्या मंत्राक्षता । त्या त्याचे माथा टाकियेल्या ॥१३॥
मज निरालंबासी तुम्हीं करोनि अवलंबन । निष्कामासी पूर्ण केलें काम ॥१४॥
हें माझें बोलणें तुम्हीं ऐकोनि सकळिकीम । परी अझुनी ओळखी न धरा माझी ॥१५॥
निःसंदेह भोजन केलें आधि तुम्हीं । उरले शेष आम्हीं स्वीकारिलें ॥१६॥
यासी विधियुक्त कोण प्रायश्चित । सांगा कोण ग्रंथ साच करुनी ॥१७
या हरिदासाचे रज आणि तुमचें चरणतीर्थ । तेणेंचि पुनीत तनु माझी ॥१८॥
येरु तुमचा भावो तोचि फळला तुम्हां । नामा तरी आम्हाम निष्कलंकु ॥१९॥

३५
मग केशव म्हणे माझें परिसा वचन । गुज मी सांगेन अंतरीचे ॥१॥
व्रत तप दान सकळ कर्मक्रिया । एक भूतदया असे जेथें ॥२॥
तोचि सत्य मानी भक्त आणि ज्ञानी । न विसंबे निर्वाणीं जीवें त्यासी ॥३॥
ज्ञानाचेम सौभाग्य भक्ति आणि वैराग्य । तयाचेम आरोग्य प्रेमरस ॥४॥
त्यासी संजीवनु सदा संत संगू । त्यावरी अनुरागू वज्रकवच ॥५॥
धर्मअर्थकममोक्षे दृष्टि नाणी । वोळगती आंगणीं मुक्ति चारी ॥६॥
अनुहात गजरु होतसे नामाचा । दीप अलक्षाचा पाजळितु ॥७॥
इंद्रपदादिकें नाशिवंत होती । म्हणोनि आसक्ती न धरावी त्यांची ॥८॥
हे जाणोनि साच न धरावी त्यांची आस । अखंड माझा वास ह्रदयीं त्यांच्या ॥९॥
कामक्रोध वैरी दुराविले दुरी । मज ह्रदयमंदिरीं सांठविलें ॥१०॥
तेणें त्याच्या उच्छिष्टा जालोंसे अधिकारी । ब्रह्मारस सरी न पवी जेथें ॥११॥
म्हणोनि ये संसारी धन्य एक नामा । जेणें माझा प्रेमा अनुभविला ॥१२॥

३६
महा मुक्ति क्षेत्र तीर्थाचें तारक । उपमेसि आणीक नाही दुजें ॥१॥
तें हें पंढरपूर प्रेमाचें भांडार । नामें निरंतर गर्जतसे ॥२॥
येवढें तीर्थ जवळी असतां पै समर्थ । कोण भाग्यहत दैन्य भाकी ॥३॥
जीवन्मुक्त ज्ञानी येथें पुंडलिक मुनि । बैसलासे ध्यानी परलक्षी ॥४॥
योग्यांचे ह्रदयींचे निजध्यान नेटकें । तें जयाचेनि सुखें वेडावलें ॥५॥
पुण्यपावन भीमा दक्षिणवाहिनी । अमृत संजीवनी पुण्यराशी ॥६॥
आनंदरसकुपिका प्रत्यक्ष चंद्रभागा । दर्शनें न या गा गर्भवासा ॥७॥
स्वर्गीम मंदाकिनी लाजोनि राहिली । पाताळीं प्रवेशली भोगावती ॥८॥
सहस्त्रभाग भेणें होउनी भागीरथी । सागरा मिळती जाली वेगीं ॥९॥
भक्तजन भाग्याची कीं सुख आरोग्याची । जें कां वैराग्याची जन्मभूमी ॥१०॥
तेथें हरिखे निर्भर नामा संताचें संगतीं । गीतीं कीर्ति विठोबाची ॥११॥

३७
सकाम निष्काम वाचे जपे नाम । तो माझा परम प्राणसखा ॥१॥
जीवाहूनि आवडता न करी जीवापरता । पूजी परम देवता भावें त्यासी ॥२॥
हे माझी प्रसिद्धि जगीं ब्रीदावळी । हरिदासाचे कुळीं वोळंगे सदा ॥३॥
जन्मोनि ज्याचे कुळीं एक हरिदास । धन्य त्याचा वंश पुण्यशीळ ॥४॥
काया वाचा मनें न विसंबे त्यासी । ते माझ्या दैवासी दैव जाले ॥५॥
नामधारकाचें उच्छिष्ट जेथें पडे । उभा राहोनि पुढें झेली मुखें ॥६॥
तें मज गोमटें सेविताम सुख वाटे । म्हणोनि धाटें मोठें शरीर माझें ॥७॥
बहु कांति पुष्टि यश कीर्ति प्रभा । नित्य नवी शोभा होय तेणें ॥८॥
ते संत सोयरे भेटती जे वेळीं । ते माझी दिवाळी दसरा सण ॥९॥
म्हणोनी नामयातें जेवविलें सांगातें । बहु दिवस होतें आर्त पोटीं ॥१०॥
जालें तें सर्वथा नोहे पैं अन्यथा । पुढतीं सांगा आताम काय करणें ॥११॥

३८
तंव म्हणती द्विज परियेसी गुणनिधी । प्रतिपादिले वेदीं जे जे धर्म ॥१॥
ते ते आचरावे विहित क्रियाकर्म । जें जें वर्णाश्रमें आलें जया ॥२॥
तेचि एक धन्य जगीं देहधारी । असतां संसारीं जीवन्मुक्त ॥३॥
आचार प्रथम ब्राह्मणांचा धर्म । शौच नित्यनेम सत्यवाणी ॥४॥
तप शम भूतदया पूर्ण । अखंड अनुसंधान स्वस्वरुपीं ॥५॥
स्नानसंध्या जप होम अध्ययन विधि । देवतार्चन सिद्धि करुनी भावें ॥६॥
वैश्वदेव आणि अतिथीपूजन । नववें ब्रह्मयज्ञ आवश्यक ॥७॥
संपादुनि हे विधि सारावेम भोजन । त्यावरी श्रवन पुराणाचेम ॥८॥
सर्व काळ व्हावेम मानस । असावा विश्वास वेदवचनीं ॥९॥
तुम्हीं तंव सर्वज्ञ संपन्न चतुर । देखावा विचार विशुद्धीचा ॥१०॥
सांडुनि अभिमान व्हावें शुद्धमती । जोडावी ते कीर्ति उभय लोकीं ॥११॥
जावे चंद्रभागे करावेम मंत्रस्नान । द्यावें हेमदान सत्वशुद्धी ॥१२॥
पुण्यजना एकी क्षेत्रप्रदक्षिणा । करावी पावन उभयकुळें ॥१३॥
ऐकोनी पंढरिरावो बोलते जाले वाचा । आज्ञा ते शिरसा स्वामियांची ॥१४॥
परी काया वाचा मनें मागेन ते द्यावें । माझ्या सांभाळावें नामयासी ॥१५॥

३९
तुम्ही सदाचार महंत ब्रह्मवादी । तुमची वाग्‌नदी ब्रह्मरुप ॥१॥
सत्य वचन जळ पवित्र तें निर्मळ । कृतार्थ तेणें केवळ जालोंसे मी ॥२॥
हा तुमचा विश्वास दृढ आहे मज । तुम्ही माझे पूज्य परम देव ॥३॥
स्नानाचा प्रकार आहे पंचविध । सांगेन विद्‌गद भाव त्याचा ॥४॥
अर्थीं ठेवुनी दृष्टी विवेक घ्यावा पोटीं । प्रत्यया येईल गोष्टी अनुभवाची ॥५॥
उत्तमाहुनी उत्तम सत्य वाग्‌स्नान । यापरतें पावन आणिक नाहीं ॥६॥
काया वाचा मनें हें दृढ धरिजे । हेळाची तरिजे भवसागरु ॥७॥
बाहेजु भीतरीं शुद्ध सर्वकाळ । हें दुजें निर्मळ सुद्धस्नान ॥८॥
हें जया सदैवा घडे भाग्ययोगें । मग तया न लगे साधन कांहीं ॥९॥
सकळ इंद्रियांचा करोनि निग्रहो । दंडावा विग्रहो वासनेचा ॥१०॥
हें तिजें निर्मळ घडे जया स्नान । न लगे अनुष्ठान करणें त्यासी ॥११॥
सर्वांभूतीं करुणा हेंचि पैं चवथें स्नान । साधितो सज्जन विरळा कोणी ॥१२॥
त्याचेनि दर्शनें जळती पापराशी । तो सर्वा तीर्थांसी तीर्थरुप ॥१३॥
पांचवें स्नान काया प्रक्षाळावी जळीं । करणें ते आंघोळी लौकिकाची ॥१४॥
काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर । हे दोष दुर्धर देहामाजीं ॥१५॥
विवेक वैराग्य धरावें मानसीं । रहावें संगतीसी संतांचिया ॥१६॥
अनंत जन्माचें हेंचि प्रायश्चित्त । ज्याचे वाचे नित्य रामकृष्ण ॥१७॥
शांति क्षमा दया निजबोध निवृत्ती । अखंड खेळती जयापाशीम ॥१८॥
तो एक संसारीं धन्य शिंपी नामा । आवडता आम्हां जीवाहोनी ॥१९॥

४०
प्रार्थूनि सकळां बोले देवरावो । फेडावा संदेहो वासनेचा ॥१॥
स्नानविधीलागीं जावें चंद्रभागे । संताचेनि संगें आम्ही तुम्ही ॥२॥
बाप भक्तप्रिय कैवारिया मुरारी । लीला वोडंबरी खेळ खेळूं ॥३॥
नामयाचा हात धरोनि करकमळीं । चाले वनमाळी समारंभें॥४॥
नरनारी कवतुक पाहती सकळिक । स्वर्गीं ब्रह्मादिक ठकलें ठेले ॥५॥
सकल संतमेळासहित शारंगधरु । पाठी दळभारु ब्राह्मणांचा ॥६॥
आले चंद्रभागे हरिनाम गर्जत । केला प्रणिपात पुंडलिकसी ॥७॥
प्रक्षाळोनि चरण केले प्राणायाम । बाप सकळ धर्म जनिता स्वयें ॥८॥
समस्त द्विजकुलां करोनी प्रदक्षिणा । आरंभिले स्नानविधि देवें ॥९॥
चाचर कुरळ केश रुळती पाठीवरी । पितांबरधारी शामतनू ॥१०॥
सुंदर कमळनयन मुख प्रभाराशी । तें ध्यान मानसीं सनकादिकां ॥११॥
गोमयमृत्तिका आणोनियां देखा । प्रक्षाळुनी उदका वेदमंत्रें ॥१२॥
करुनि प्रयोग सारियेलें स्नान । केला परिधान सोनसळा ॥१३॥
ब्राह्मणाचें तीर्थ मस्तकीं वंदिलें । अभिवंदन केलें हरिच्या दासा ॥१४॥
सारोनियां संध्या नित्य नेम सर्व । पुजिले भूदेव दिधलीं दानें ॥१५॥
म्हणे कृपादृष्टीं मज केलें सनाथ । पुरविलें आर्त ह्र्दयीचें ॥१६॥
येथुनी संशयो न धरावा मानसीं । मानावेम आम्हांसी आत्मरुप ॥१७॥
चालिले सत्वर आले महाद्वारां । आज्ञा द्विजावराम दिधली देवें ॥१८॥
तेथें हरिखे निर्भर नामा निजबोधें । नाचतो आनंदें गरुडपारीं ॥१९॥

४१
समस्त भक्तमंडळीसहित वनमाळी । प्रवेशले राउळीं परमानंदे ॥१॥
राही रखुमाई सत्यभामा वेगीं । देवातें अष्टांगी नमस्कारिती ॥२॥
बाप सुखसिंधु स्वामी आर्तबंधु । प्रीति परमानंदु निजभक्तां ॥३॥
सत्यभामेणें केलें प्रक्षाळण चरणां । रुक्माई विंजना जाणविती ॥४॥
विडा देती राही उभी उजव्या बाही । दृष्टी ठेवुनि पायीम कवळी मनें ॥५॥
शुक सनकादिक नारद तुंबर । करती जयजयकार नामघोषें ॥६॥
आले बंदीजन पढती ब्रीदावळी । ध्यान ह्रदयकमळीं चंद्रचूडा ॥७॥
निवृत्ती ज्ञानेदेव सोपान सांवता । जवळी त्या जनमित्रा बोलाविलें ॥८॥
सकळिक संताम परमानंदे तृप्ती । सारोनि श्रीपति आरोगणा ॥९॥
बैसोनि एकांती पंढरीचा राणा । करितसे विचारणा निजभक्तांसी ॥१०॥
सकळिक ब्राह्मण आणावे भोजना । निरसावी वासना संदेहाची ॥११॥
उठोनि प्रातःकाळी यावेम शीघ्रवत । द्यावया अक्षत ब्राह्मणांसी ॥१२॥
निजबोधे आनंदे हर्षे खेळेमेळे । भोगावे सोहळे स्वानंदाचे ॥१३॥
फेडवी तयाची भेदभरदृष्टी । द्यावी तया भेटी निजरुपाची ॥१४॥
संतसंगतीचा प्रगट व्हावा महिमा । द्यावा भक्तिप्रेमा नामयासी ॥१५॥

४२
सुख सेजेवरि देव विश्रांति पहुडले । विश्रांतीसी गेले सकळ भक्त ॥१॥
ब्रह्मवीणा करीम घेऊनि ब्रह्मसुत । जाणवी एकांत नारदमुनी ॥२॥
बाप पंढरीनाथ सुखाचा सुखसिंधु । नित्य नवा आनंदु सोहळा करी ॥३॥
विश्रांति विसांवा जें विश्वमंगळ । तें नाम निर्मळ विठोबाचें ॥४॥
तो भक्तशिरोमणी वैराग्य पुतळा । गातो प्रेमकळा धरुनी कंठीं ॥५॥
तेणें श्रवनामृतें ह्र्दय कोंदाटलें । प्रेमाचे सुटले पाझर नयनीं ॥६॥
हर्षे निर्भर दोनी देव नारदमुनी । प्रीति आलिंगनी एकमेकां ॥७॥
जाती चंपक सुमनें माजीं तुळसीमिश्रित । दिधल्या त्या उचित कंठीं माळा ॥८॥
नमस्कार करुनि केलें विसर्जन । भरलें त्रिभुवन ब्रह्मरसें ॥९॥
मग चालिले तेथोनि ऋषी नारदामुनी । ह्रदयीं संजीवनी कृष्णनाम ॥१०॥
तेणें त्या विश्रांती नित्य तृप्ती मनीं । नामा जीवें चरणीं विनटला ॥११॥

४३
जीवींचे गुज राही रुक्माईसी पुसे । न धरवे मज हांसे नवल वाटे ॥१॥
काय अभिश्राप आला देवराया । केली आपणया आत्मशुद्धी ॥२॥
हें मज बाई सत्य सांगा वाणी । कवणें चक्रपाणि भुलविलें ॥३॥
सूर्य आणि अंधारु वर्ते एके ठायीं । हें भूतभविष्य नाहीं वर्तमान ॥४॥
ऐसें हें अघटित जरी घडेल प्रसंगीं । तरीच दोष संसर्गीं देवराया ॥५॥
अग्निमाजी बीजें पाल्हेजती सुरवाडें । कीं बुडालें सांपडे लवण जळीं ॥६॥
ऐसें हें अभिनव जरी घडेल प्रसंगीं । तरीच संसर्गीं पडती देवो ॥७॥
ज्योतीसी अळूमाळु मिळाल्या कर्पुरी । पुढती त्यासी उरीं उरे जरी ॥८॥
ऐसें होय जरी या त्रिभुवनामाझारीम । तरीच केशिराजीं वसती दोष ॥९॥
तरी हें कळे माते सांगावेम साचार । सर्वज्ञ चतुर वडील तुम्ही ॥१०॥
रुक्माई म्हणे या नामयाचे चाडे । अनंत पवाडे केले देवें ॥११॥

४४
रुक्माई म्हणे परियेसी वो आरजे । सांगेन सकळ जें वर्म तुज ॥१॥
अनाथा माहेर एक चक्रपाणि । बहु दिनालागोनी लोभापर ॥२॥
म्हणोनि भुलला देव नाम्याचेनि लोभें । कर्मे शुभाशुभें अंगिकारी ॥३॥
आवडीचा वोरसु न करी कायकाय । हा प्रसिद्ध अनुभव आहे लोकां ॥४॥
विषम विषयसुख विषयाचेम गळालें । तयाचे सोहळे करिती लोक ॥५॥
आंधळे पांगुळे मुके अनर्गळ । परी जीवापरिस बाळ पढियें मातें ॥६॥
अंतरीच्या कळवळें खेळवी लाडेंकोडें । परि विलासाचे नावडे चोख चांग ॥७॥
प्रीतीच्या पडिभरेम नेघे पैम विकृती । देखोनि विश्रांति थोर मानी ॥८॥
म्हणे माझे आळीकर दिठावेल झणीं । इडापीडा घेउनी वदन चुंबी ॥९॥
स्नेहाच्या संभ्रमें नेणे लोकलाज । उचलोनि भुज घाली कंठीं ॥१०॥
तनुमनप्राणांची करुनी ओंवाळणी । जावें हें माझेनि म्हणे जीवें ॥११॥
तैसीच परी आहे या विठठलाच्या ठायीं । चित्त याच्या पायीं ठेविलें जेणें ॥१२॥
न पाहे तयाचें जाती कुळ कर्म । वर्णाश्रमधर्म शुद्ध वाणी ॥१३॥
अनंत जन्मांच कायामनेंवाचा । आहे या दोघांचा ऋणानुबंधौ ॥१४॥
तो नकळे न सुटे कोणिये कल्पांती । जिवलग सांगाती जाला नामा ॥१५॥

४५
मग नारदातेम पुसे सत्यभामा देवी । विस्मयो माझ्या जीवीं अति वाटे ॥१॥
सांडोनियां थोरी देव मुगुटमणी । नाचतो कीर्तनीं संतांपुढे ॥२॥
तरी कोणिये जन्माचें काय काय याचें । घेतलें नाम्याचे ऋण देवें ॥३॥
एका पुंडलिकाचेनि पांगें येणें हो श्रीरंगें । अठ्ठावीस युगें उभ्या गेलीं ॥४॥
न पाहे परतोनी अझुनी पाठिमोरा । न बोले निष्ठुरा वचन कांहीं ॥५॥
तरी कोण प्रीति देव कोण्या ऋणानुबंधें । राखितो आनंदें बळिचें द्वार ॥६॥
विकिला पायिक कायामनें वाचा । जाला पांडवांचा वेळाइतु ॥७॥
जें जें जया आवडे तें तें धरोनी रुप । पाववी संकल्प सिद्धी त्यांचे ॥८॥
एकला एकटु एकलेनि जीवें । भक्तांचे करावेम सकळ काज ॥९॥
ऐसे भक्त अपार आहेत भूमंडळीं । किती लागावळी असेल त्यांची ॥१०॥
म्हणोनि माझ्या जिवीं वाटे थोर खंती । स्वामीतेम शिणविती युगायुगीं ॥११॥
भक्तांचे आवडी त्यजिलें वैकुंटभुवन । चित्तीं अमृतपान न वाटे गोड ॥१२॥
अखंड आवडे संतांची संगती । बैसोनि एकांतीं घेती सुख ॥१३॥
ऐसी इहीं चाळविलें वैष्णवीं । आमुचे घर गोसावीं भुलविलें ॥१४॥
त्यां सकळहुनि पढियंता देवा एकु नामा । भक्तिभावें प्रेमा दिधला त्यासी ॥१५॥

४६
तंव म्हणती नारदमुनि परियेसी वो माते । सांगेन मी तूतें सत्य मानी ॥१॥
हा निर्विकल्प देव येतसे रुपा । करावया कृपा भक्तजनां ॥२॥
हा शरणांगता वत्सलु अनाथा कृपाळु । मिरवी दीनदयाळु ब्रीद जगीं ॥३॥
म्हणोनि जन्मकर्मे असंख्यात जगीं । केलीं याचलागीं नारायणें ॥५॥
अंबऋषीचें येणें सोसले गर्भवास । राखितो उदास बळिचें द्वार ॥६॥
विकिला पाइकु कायामनें वाचा । जाला पांडवांचा मोलेंविण ॥७॥
गोकुळीं नंदाचीं राखिलीं गोधनें । प्रीति उच्छिष्ट खाणें गौळियांचें ॥८॥
विघ्न पडे तेथें आपणां वोडवी । संकटीं सोडवी माझीं म्हणोनी ॥९॥
सांडोनि अभिमान न्यून कामें करी । जालासे अधिकारी दास त्याचा ॥१०॥
आज्ञा वाहे शिरीं जीवीं जतन करी । मानिलीं सोयरी जिवलगें ॥११॥
एके अपमानिती दावेवरी बांधिती । उपहास करिती हर्ष मानी ॥१२॥
केले अपराध नेघे अपुले चित्तीं । दुणावितो प्रीति नित्य नवी ॥१३॥
ऐसे ब्रह्मांडनायकु देवा मुगुटमणी । हे त्याची करणी ख्याती जगीं ॥१४॥
आम्ही सकळ भक्त याचे पूर्ण अंशु । चरणींचा सौरसु नामयासी ॥१५॥

४७
निज गुज रुक्माई पुसे पंढरीनाथा । ठेवुनियां माथा चरणावरी ॥१॥
सर्वांहुनि पढियंते काय स्वामितातें । तें मज निरुतें सांगा स्वामी ॥२॥
हे माझ्या जीवींचि फेडावी आशंका । ब्रह्मांडनायका कृपाळुवा ॥३॥
न रिगे तुमचें चित्त योगियांचे ध्यानीं । वैकुंठभुवनी प्रीति नाहीं ॥४॥
तेथिंचे सुखभोग सकळ विलास । नावडती उदास कवण्या गुणें ॥५॥
सायोज्यता मुक्ति आपुली देऊनी । ज्ञानी ते निर्गुणीं बुडविले ॥६॥
त्याहुनि जिवलग कोण तुमचे सखे । जे त्याचेनि पैं सुखें वेडावलेती ॥७॥
चतुरानना ऐसा स्तवितां चतुरपणें । अठराही पुराणें वेद चारी ॥८॥
परि तेही उबगली म्हणती नेती नेती । शिणलीं वेवादती साहीजणें ॥९॥
ऐकुनि पंढरीनाथ बोले रुक्माईसी । तूं कां वो नेणसी गुज माझें ॥१०॥
कायावाचामनें सर्व निरंतरी । आहे नाम्यावरी लोभ माझा ॥११॥

४८
जीवींचे गुजगौप्य सांगेन वो तूतें । ऐक एकचित्तें मनोधर्मे ॥१॥
आवडते हे माझे भक्त परम सखे । जे सबाह्य सारिखे सप्रेमळ ॥२॥
त्यापरिस थोर नाहीं मन दुजें । मज त्याचेनि काजें नांवरुप ॥३॥
भक्त सर्वांहोनि पढियंते माझिया हो जीवा । भक्त हा विसावा ज्ञानियांचा ॥४॥
भक्त योगियांच्या सुखाचा श्रृंगारु । भक्त अलंकारु वैराग्याचा ॥५॥
भक्त वो माझिया जीवीचें निजध्येय । भक्त परमप्रिय कुळदैवत ॥६॥
भक्तसंर्गेसुर्खें विश्रांति विसांवा । भक्त माझा ठेवा सर्व धन ॥७॥
भक्त हे माझिया भाग्याचें भूषण । भक्त ते निधान निक्षेपीचें ॥८॥
भक्त यश कीर्ति भक्त सुख मूर्ति । भेटे तरी पुरती सकळ काम ॥९॥
भक्त माझ्या सर्व सुखाचा अधिकारी । भक्तचिया घरीं वस्ती माझी ॥१०॥
मज आणि भक्तां नाहीं वेगळिक । घ्य्वावें सर्व सुख भक्तें माझें ॥११॥
भक्तें नाम घ्यावें भक्तें रुप घ्यावें । भक्तें मुख पहावें घडिये घडिये ॥१२॥
भक्तें नाम घ्यावें भक्तें रुप घ्यावें । भक्तें आलिंगन द्यावें मज ॥१३॥
धर्मअर्थकाममोक्ष मुक्ति चारी । देतां न धरी करीं भक्त माझा ॥१४॥
भक्त न मागे कांहीं न घाली मज भार । मजहुनि उदार भक्त माझा ॥१५॥
पत्रपुष्प फळ जळ तें सर्वभावें । भक्तांचे मज व्हावें भलतैसें ॥१६॥
आस करुनी वास पाहे घडिये घडिये । भक्ताचें तें पढिये सर्व मज ॥१७॥
तरी मी भक्तांचा कीं भक्त आमुचे । सोईर निजाचे एकमेक ॥१८॥
म्हणोनि नामयाचे आर्त थोर जीवा । जवळोनि जवजावा दूर कोठे ॥१९॥

४९
तंव ते सकळ आले शीघ्रवत । आनंदें गर्जत नामघोषें ॥१॥
प्रेमें उचंबळत अंतरीं बोधले । सप्रेंमे लोटले चरणांवरी ॥२॥
त्या सुखाचा आनंदु न वर्णवे वाचे । एवढें भाग्य कैचें बोलावया ॥३॥
आलिंगोनि देवें धरिलें ह्रदयकमळीं । सादर सांभाळी कृपादृष्टी ॥४॥
श्रीमुखाची वास पाहती वेळोवेळां । जाला एकवळा आनंदाचा ॥५॥
मग उदार चक्रवर्ति सर्वज्ञाचा रावो । सांगे जीवींचा भावो रुक्माईसी ॥६॥
केला चंद्रभागें संकल्प संपूर्ण । तो व्हावा उत्तीर्ण सर्वभावें ॥७॥
क्षेत्रवासी द्विज सुशील सदाचार । जे पुण्यसागर भूदैवत ॥८॥
ज्यांचेनि दर्शनें पाप ताप जाय । यशकीर्ति होय चरणर्तीर्थें ॥९॥
तरी ते प्रार्थुनियां आजी आणावे त्रिभुवना । द्यावें त्या भोजना भक्तिभावें ॥१०॥
तेणें सकळ काम होतील परिपूर्ण । घ्यावें आशीर्वचन ब्राह्मणांचें ॥११॥
तंव म्हणे रुक्माई ब्रह्मांडनायका । अक्षत सकळिकां द्यावी देवा ॥१२॥
सकळहि सिद्धि असती सदोदित । कर जोडुनि तिष्ठत सकळ काम ॥१३॥
हांसोनि पंढरीनाथ बोले कवतुकें । जिवलगा आईके विष्णुदास ॥१४॥
पुढती कवतुक करणें तुजलागीं । नामयासी वेगीं कळली खूण ॥१५॥

५०
केशव म्हणे नाम्या सुखाच्या निधाना । दे रे आलिंगना आवडत्या ॥१॥
जिवलगा जवळोनि नवजे कोठें दुरी । वाटे तुज अंतरीं घालावासी ॥२॥
न पुरे माझें आर्त घेतां तुझें सुख । मज नित्य तृप्ति भूक वाटे थोरी ॥३॥
उत्कंठित चित्त अखंड तुजकारणें । तुज देखिल्या पारणें होय नयना ॥४॥
अनंत जन्माचा हा ऋणानुबंधू । तरीच प्रीतिवादु न तुटे तुझा ॥५॥
तुवां मजलागोनि देह कर्वतीं दिधले । उग्र तप साधिलें जन्मोजन्मीं ॥६॥
त्यजोनि सर्व माया चित्त निरोधिलें । ह्रदयीं मज बांधिलें वश्य करोनी ॥७॥
तुज काय देईजे उतराई होईजे । ऐसें न देखिजे त्रिभुवनीं ॥८॥
शरीर प्राणाचें त्वां देऊनि बळिदान । केलें पैं निवणि भक्तराया ॥९॥
करावें म्यां दास्यत्व आपुलेंनि अंगें । तुज तरी कांहीं नलगी देणें घेणें ॥१०॥
नामा म्हणे देवा तूं दीनाचा कैवारी । म्हणोनि मजवरी करिसी मोहो ॥११॥

५१
भक्तजनवत्सल सुखसिंधुराशी । निर्भर मानसीं परमानंदें ॥१॥
सरिसे सकळ भक्त घेउनि पंढरिनाथ । चालिले अक्षत द्यावयासी ॥२॥
बाप तो कवतुकीं अनाथाचा नाथ । भोगिया श्रीमंत खेळू खेळे ॥३॥
तंव ते उदित भाग्य भाग्यवंत । दर्शनाचें आर्त होतें त्यासी ॥४॥
सकळही मिळोनि गेलें कुंडलतीर्थीं । तंव आले कमळापति दर्शनासी ॥५॥
तेथें देखोनियां सकळांचा मेळा । केला द्विजां सकळां प्रणिपातु ॥६॥
सांडोनि देहबुद्धि निःसंदेह व्हावें । कृपा करोनि यावें भोजनासी ॥७॥
पाळावें आपुल्या दिधल्या सत्यवचना । करावी वासना तृप्त माझीं ॥८॥
स्नानसंध्या विधि सारोनि समस्त । यावें शीघ्रवत नैवेद्यासी ॥९॥
ते निवाले दर्शनं तृप्त जाले मनें । परिसोनि वचनें अमृतोपम ॥१०॥
आम्ही तरी आश्रित हेंचि जाणा सत्य । आशिर्वाद नित्य देतों तुम्हां ॥११॥
सर्वभावें आमुचा करावा सांभाळ । स्वामी दीनदयाळ विश्व बोले ॥१२॥
तुम्ही महाराज राजराजेश्वर । पाहावें निरंतर कृपादृष्टी ॥१३॥
तुमचा हा आदर निरुपम सर्वथा । दिधलीसे मान्यता वेदवचना ॥१४॥
तें भाष्य आपुलें जतन सर्वभावें । साक्ष करुनी द्यावें प्रेम नाम्या ॥१५॥

५२
बाप आर्तबंधु सकळ जीवनकंदू । भक्तांचा सुखसिंधु पंढरिरावो ॥१॥
हर्षे निर्भर चित्तीं आले निजभुवना । सांगे विवंचना रुक्माईसी ॥२॥
धन्य दिवस जाला आजि सोनियाचा । सोहळा भक्तांचा आरंभिला ॥३॥
प्रार्थिलें ब्राह्मणां भोजनालागुनी । येताती सारोनि स्नानविधी ॥४॥
आजीचें कवतुक पाहावें अभिन्न । हांसोनियां देव बोलते जाले ॥५॥
तंव म्हणे रुक्माई अहो जी पूर्णकामा । स्वामी मेघश्यामा कृपानिधी ॥६॥
त्यांचें पूर्व पुण्य आजि आलें फळा । देखिले गोपाळा चरण तुमचे ॥७॥
तंव ते नित्य नेम सारोनि आपुले । वेगीं द्विज आले राउळांगणा ॥८॥
नमस्कारुनि देवें बैसविलें आसनीं । पूजा चक्रपाणि आरंभिली ॥९॥
चरण प्रक्षाणुनी गंध तुळसीमाळा । घातलिया गळां ब्राह्मणाच्या ॥१०॥
उजळोनि दीपक ओंवाळिले प्रीति । मग ते पात्रपंक्ति मांडियेल्या ॥११॥
रत्नजडित सकळां सुवर्णाचीं ताटें । षड्रस बरवंटे तयामाजीं ॥१२॥
विस्तारोनि वेगीं ओगरिलीं चांगें । संकल्प श्रीरंगें सोडियेला ॥१३॥
देउनि आपोशन अमरचूडामणी । प्रार्थितो जोडोनि करकमल ॥१४॥
कवळोकवळी घ्यावें नाम अच्युताचें । भोजन भक्ताचें सुखरुप ॥१५॥
ऐसे जेविले आनंदे धाले परमानंदें । मुखशुद्धि गोविंदें समर्पिली ॥१६॥
रत्नाचे दीपक उजाळोनि आरती । साष्टांग श्रीपति नमस्कारिलें ॥१७॥
जोडोनि दोन्ही कर विनवितो श्रीरंग । आजीचा प्रसंग पुण्यकाळ ॥१८॥
आम्हां तुम्हां भेटी जाल्या सुखगोष्टी । भरली सकळ सृष्टी परमानंदें ॥१९॥
अवघें संतजन आमुचे सांगाती । जेवूं एका पांती सरिसे आम्ही ॥२०॥
म्हणोनि सकळिकां पाचारिलें देवें । कवतुक अवघे पाहाती द्विज ॥२१॥
ब्रह्मादिक देव तिष्ठत पाहाती व्योमीं । वंचलों रे आम्ही भक्ति सुखा ॥२२॥
सर्वप्रेम देउनि निवविला नामा । ऐसें भाग्य आम्हां कैसें आतां ॥२३॥

५३
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान सांवता । जनमित्र पढियंता जिवलगू ॥१॥
आसंद सुदामा विसोबा खेचर । नरहरी सोनार आदिकरुनि ॥२॥
बाप आर्तबंधु कृपाळू दीनाचा । अभिमाअन भक्तांचा न संडी कदा ॥३॥
चोखमेळा बंका भक्तवत्सल लाडका । तो बोलविला देखा आरोगणें ।४॥
वैराग्याचा मेरु तो गोरा कुंभारु । आवडता डिंगरु केशवाचा ॥५॥
ऐसें थोरसानेम सकळ भक्त राणे । देवें आरोगणें बोलावले ॥६॥
सधूप आणि दीप तुळशीच्या माळा । पूजिलें सकळां देवरायें ॥७॥
तंव राही रखुमाबाई सत्यभामा सती । विस्तारोनि आणिती विविध बोणी ॥८॥
भोंवती भक्तमंडळी मध्यें वनमाळी । शोभे नथमंडळीं चंद्र जैसा ॥९॥
सकळांमुखीं कवळ देतसे निजकरें । उच्छिष्ट पितांबरें सांवरितो ॥१०॥
त्या सुखाचा पारु देखोनी वैकुंठीं । होती लूलूमिठी सुखराशी ॥११॥
ऐसें तें भोजन जालें खेळेमेळें । ब्रह्मरसें धाले सकळ भक्त ॥१२॥
तंव विमानें आकाशीं दाटले सकळ । करिती कल्लोळ पुष्पवृष्टी ॥१३॥
तें देखोनी द्विजवर पडिले चिंतवनी । म्हणती पैं जाली हानी जीवित्वाची ॥१४॥
नव्हे हा ज्ञानमार्ग नव्हे हें वैराग्य । नवल भक्तिभाग्य आवडीचें ॥१५॥
एक म्हणती हा पांडुरंग होय साचें । येव्हढें भाग्य कैचे मानवियां ॥१६॥
हा नव्हे गुणिवंतु क्रियाकर्मातीतु । यासी प्रायःश्चितु काय घडे ॥१७॥
नाहीं यासी आप नाहीं यासी पर । नाहीं या आचार जातिकूळ ॥१८॥
षड्रमार्ग संबंध नाहीम याच्या ठायीं । विकल्पाचें नाहीं वळण कदाम ॥१९॥
कृपेचा कोंवळ सोयरा दीनांचा । उदार मनाचा लोभापर ॥२०॥
अनुसरे त्याचेम मायाजाळ तोडी । बैसणें तो मोडी संसाराचे ॥२१॥
या नामयाची माता आम्हां तुम्हां देखतां । शिणली वेवादतां नानापरी ॥२२॥
नेदी तिच्या हातीं घातिला पाठीसी । धरिला जीवेंसी माझा म्हणुनी ॥२३॥
देहाचा विसरु याच्या रुपाच्या दर्शनें । चरणाचेनि स्मरणें चित्त निवे ॥२४॥
सुख गोष्टी यासी केलिया एकांत । तेणें पुरतसे आर्त जन्ममरणा ॥२५॥
ऐसें त्याचें बोलणें ऐकोणि पंढरिनाथें । दिलें सकळिकांतें अभयदान ॥२६॥
मग निजरुप दाविता जाला तयावेळीं । नामा ह्रदयकमळीं आलिंगिला ॥२७॥

५४
तंव दिव्य रत्नमणि मस्तकीं किरीटी । मळवट लल्लाटीं कस्तुरीचा ॥१॥
माथां मोरपिसावेठीं कुंडलें गोमटीं । पाहात कृपादृष्टी निजभक्ताम ॥२॥
तो पुंडलिकाचा ठेवा पूर्वपुण्यराशी । वैकुंठनिवासी देवरावो ॥३॥
वदन निर्मळ भाव सुस्मित वेल्हाळ । दर्शनी रत्नकीळ तेज फांके ॥४॥
त्या सुखाचे अधिकारी भक्त सप्रेमळ । ह्रदयीं सर्वकाळ हरिचे ध्यान ॥५॥
कौस्तुभ वजयंती पदक ह्रदयावरी । शोभत साजिरी तुळसीमाळा ॥६॥
श्रीवत्सलांछन प्रीतीचें भूषण । चर्चिला चंदन श्यामतनु ॥७॥
शंखचक्र करीं ते कर कटावरी । पितांबरधारी जलदनीयल ॥८॥
तेणें दिव्य तेजें ब्रह्मांड धवळलें । प्रकाशें लोपलें दिग्मंडळ ॥१०॥
सकळ संत द्विज देखती चतुर्भुज । शंख चक्रांबुज गदापाणि ॥११॥
कीटकपक्षी पशुपाषाण तरुवर । देखती द्विजवर विठठलरुप ॥१२॥
परमानंद बोधें निवाले आनंदें । भेदाभेद द्वंद्वे विसरोनि गेलीं ॥१३॥
एकाविण दुजें तेथें न दिसे पैं आन । नाहीं आठवण देहभावा ॥१४॥
सबाह्य कोंदली अवघी विठठलमूर्ति । सुखाची विश्रांति योगियांच्या ॥१५॥
प्रेमें वोसंडत सकळ भक्तजन । देती आलिंगन एकमेकाम ॥१६॥
हर्षे निर्भर चित्तीं आनंदें गर्जती । पावले विश्रांति सकळ द्विज ॥१७॥
ऐसा ब्रह्मानंद सोहळा भोगवी सकळां । आपुल्या प्रेमळा निजदासा ॥१८॥
करोनि सावध वैकुंठींचा राणा । नामा घाली चरणावरी त्यांच्या ॥१९॥

५५
बाप भक्तप्रिय पाहे कृपादृष्टी । करितसे सुखगोष्टी ब्राह्मणांसी ॥१॥
सर्वभावें शरण सर्वकाळी मज । ते हे भक्तराज सखे माझे ॥२॥
याचेनि उपकारें दाटलों संपूर्ण । भक्तपराधीन जालों तेणें ॥३॥
निवृत्ति ज्ञानेश्वर आणि हा सोपान । हे मुगुटमणी जाण सत्वमूर्ति ॥४॥
सर्वभूतीं भजती सर्वभावें सर्वथा । केला पैं अपैता त्याचे बुद्धी ॥५॥
हा जनमित्र जिवलग आमचा सोयरा । सांडिला संसारा ओवाळुनी ॥६॥
माझे नामीं दृढ धरोनि विश्वास । अखंड उदास देहभावीं ॥७॥
जिवाहोनी पढियंता हा भक्त सांवता । निर्धार सांगतां नवलाव याचा ॥८॥
ह्रदय विदारोनि आपुलेनि हातें । ठाव दिला मातें लपावया ॥९॥
बारा दिवसांचा हा भक्तवत्सला । माये सांडियेला वेणुनादीं ॥१०॥
म्हणती वो माझा त्या दिवसापासोनि । नेणें मजवांचून आणिक कांहीं ॥११॥
हा विसोबा खेचर आणि नरहरि सोनार । हा गोरा कुंभार अंतर्निष्ठ ॥१२॥
समाधिस्थ सदा निवालें पैं चित्त । सबाह्य देखत मजलागीं ॥१३॥
सुखाचा सुजणा आसंद सुदामा । हा माझा आत्मा आवडता ॥१४॥
घरदार संसार त्यजिला मजकारणें । तोडिलें पैं येणें मायाजाल ॥१५॥
चोखामेळा बंका भक्त परमसखा । विसोबा हा देखा प्राण माझा ॥१६॥
त्यजुनि सर्व संग एकविध भावें । अनुसरले जिवें माझे ठायीं ॥१७॥
ऐसें या भक्तांचे सांगतों उपकार । आहेत बहुत फार कल्पकोडी ॥१८॥
त्या सकळांच्या चरणींचा रजरेणु माझा नामा । भक्तिभाव प्रेमा दिधला त्यासी ॥१९॥

५६
तंव ते भाग्याचे सागर विनविती द्विजवर । म्हणती तूं माहेर जोडलासी ॥१॥
चरणींचा वियोग न व्हावा सर्वथा । तोडावी ममता प्रपंचाची ॥२॥
नलगे मोक्षमुक्ति नलगे धनसंपत्ती । देई सत्संगती जन्मोजन्मीं ॥३॥
वेदशास्त्रपठणें वहिर्मुखवनें । केली अभिमानें छळणबुद्धी ॥४॥
धिक्‌ तें जाणपण धिक्‌ तो सन्मान । नाहीं प्रेमखूण कळली तुझी ॥५॥
कुळाचेनि अभिमानें अंतरलों गा तेणें । पूर्ण देहाभिमानें भुलोनियां ॥६॥
हें सकळ तुझी माया भुललों पंढरिराया । म्हणोनि जन्म वायां गेलें होतें ॥७॥
अपराधांच्या कोडी घडल्या पैं आमुतें । निषेधिलें तूतें मायबापा ॥८॥
परी त्वा दीनानाथें ब्रीद सत्य केलें । आम्हां तारियेलें पतितांसी ॥९॥
नकळे काय होतें संचित आमुचें । अनंत जन्माचें पूर्वपुण्य ॥१०॥
तें आजि फळलें तुझिया कृपादृष्टी । भाग्यें जाली भेटी संतजनां ॥११॥
दुर्जय तोडिले माया मोहपाश । केला पैं सौरस आपुल्या रुपीं ॥१२॥
तापत्रय वणवा विझविला अवचिता । दिलें प्रेमामृता जीवन आम्हां ॥१३॥
आतां सर्वकाळ अविट हे दृष्टी । यासाठीं संतभेटी निरंतर ॥१४॥
प्रेमाचा जिव्हाळा नामाची आवडी । मग होत कल्पकोडी गर्भवास ॥१५॥
करता करविता तूंचि पैं एक । ब्रह्मांडनायक सर्वगत ॥१६॥
आमुचे अवगुण न धरावे मानसीं । निरवावें संतांसी माझे म्हणुनी ॥१७॥
तुझिया दासाचें द्यावें पैं दास्यत्व । तयाची वंदावी चरनधुळी ॥१८॥
हेंचि व्रततीर्थ क्रियाकर्म आम्हां । द्यावा नित्य प्रेमा नामयासी ॥१९॥

५७
कृपेच्या सागरेम भक्तकरुणाघनें । देऊन आलिंगनें निवविलें तयातें ॥१॥
सर्गज्ञाचा रावो आत्मा ज्ञानदेवो । सांगेल अनुभवो तुम्हांप्रती ॥२॥
ते खूण अंतरीम धरा सर्वभावें । दृढ धरोनि जीवें जतन करा ॥३॥
न लगे तीर्थाटन काया क्लेष जाण । न लगे अनुष्ठान करणें बहू ॥४॥
न लगती सायास करणें उपवास । धरावा विश्वास संतसंगेम ॥५॥
न लगे वज्रासनीं बैसावें नेहटीं । न लगे गिरिकपाटीं करणें वास ॥६॥
न लगे उग्रतप नानामंत्र जप । भेणें जाय पाप संतसंगें ॥७॥
न लगे भस्म उधळनें वाहनें जटाभार । न घालावा पसार लोकाचारीम ॥८॥
सर्वभूतीं करुणा जिव्हे नामस्मृती । मन येईल निवृत्ति आपेंआप ॥९॥
क्रियाकर्मधर्म प्रेमेंविण खटपटा । करितां आला वीट दीर्घ दोषाचा ॥१०॥
साधनावांचुनी मार्ग सोपा जाण । करावें कीर्तन रामकृष्ण ॥११॥
सर्वकाळ कथा संतांची संगती । वाचे नाम कीर्ति सर्वकाळ ॥१२॥
तो हा राजमार्ग सर्वांहोनी चांग । सदा संतसंग वाचें नाम ॥१३॥
संकल्प विकल्प न धरावे मानसीं । मनोभावें संतांसीं शरण जावें ॥१४॥
ज्ञानदेव म्हणे पुढती ऐका एक । सांगेन प्रत्यक्ष अनुभव सिद्ध ॥१५॥

५८
परमामृत सागरु मथुनियां पुरता । काढिला तत्त्वतां ज्ञानबोधु ॥१॥
या सुखाचा पारु जाणते विरळे । घेताती गळाळे संतजन ॥२॥
प्रेमाचिये ताटीं वोगरु सुखामृत । हें सुख त्वरित सेवा आधीं ॥३॥
हें सुख सेवितां परमानंद धणी । कृपा संतजनीं केली पूर्ण ॥४॥
ज्ञानाचें अंजन लेईले संतजन । जनीं जनार्दन देखती सदा ॥५॥
नाहीं भिन्न भेद सर्व ब्रह्म एक । ब्रह्मांडनायक अनंत कोटी ॥६॥
दीपांचा दीपक ह्रदय आत्मज्योती । विश्वीं विठ्ठलमूर्ती देखती सदा ॥७॥
हें सुख दिधलें भक्तांसी विश्रांति । नामाची हे ख्याती परमानंद ॥८॥
पढतां नाम मंत्र ब्रह्मचि अवघें । पाहतां अनुभवें वेदमतें ॥९॥
तें हें विठठलनाम वेदाचें गव्हार । जाणती साचार संतजन ॥१०॥
युगें अठ्ठाविस विठठनामें जपतु । हा पुंडलीक भक्तु महामुनी ॥११॥
उघडली मांडूस भक्तिभाव तारुं । विठठल उद्धारु कलियुगीं ॥१२॥
न लगती सायास करणें उपवास । विठठलनामें पाश तुटती जाणा ॥१३॥
आदि ब्रह्म जुनाट जपती सिद्ध मुनी । तें दिलें मंथोनि पुंडलिकें ॥१४॥
केशवनाम मंत्र नामया सांगितलें । विस्तारोनि केलें मंथन ऐसें ॥१५॥

५९
वेदाचें हें सार वैराग्याचें जीवन । चिदाकाशींची खूण परम गुज ॥१॥
जें शुद्धज्ञान गुह्य मोक्षमुक्ति बीज । सकळ मंत्रराज मंगलानिधी ॥२॥
तें या नामयाचें होतें ह्रदयकमळीं । कथां भूमंडळीं प्रकट केली ॥३॥
तें हें विठठनाम साराचेम पैं सार । कलियुगी उद्धार सकळ जनां ॥४॥
जें श्रवणाचें श्रवण मननाचें मनन । जें निजध्यासन निजध्यासाचें ॥५॥
जें विचाराचें सार वृत्तीचा निर्धार । स्वरुप साक्षात्कार उघडा केला ॥६॥
जें भक्तीचें सौभाग्य ज्ञानाचेम आरोग्य । शास्त्राचें तें चांग मथित नाम ॥७॥
नामापरतें थोर नाहीं पैं आणिक । जनांसि तारक हेंचि एक ॥८॥
जें सकळ धर्म जनक पवित्राचें पावन । जें कां अधिष्ठान आनंदाचें ॥९॥
जें योगसिद्धीचें जीवन पीयुष । जेणें पूर्ण आयुष्य कामनेचें ॥१०॥
पुण्यपावन देवा भक्तांचे सोहळे । प्रत्यक्ष गळाले आनंदाचे ॥११॥
भक्तिभावें याचें करितां श्रवण । मग नाहीं दर्शन गर्भवासा ॥१२॥
म्हणोनि कीर्तन करावें आवडी । घ्यावी अर्थगोडी अनुभवें ॥१३॥
नव्हे हें प्राकृत पाठांतर कवित्व । हा उपनिषद मथितार्थ ब्रह्मरस ॥१४॥
जाणीव शहाणीव न करावी सर्वथा । न पहावी योग्यता व्युत्पत्तीची ॥१५॥
हें सात्विकाचें धन भोक्ते संतजन । नामदेवें पूर्ण ग्रंथ केला ॥१६॥

६०
ज्ञानदेव आले काशी । विश्वेश्वर आडवे येती ॥१॥
रामनगरा वेशीपाशीं । भेटी जाल्या उभयतांसी ॥२॥
परस्परें आलिंगन । नामा वंदी उभयचरण ॥३॥

६१
पुढें उभे वेशीपाशीं । त्याला लोटांगण काशी ॥१॥
स्वर्गीम देवा जाल्या भेटी । भोंवत्या पताकांच्या थाटी ॥२॥
नामा म्हणे विठठल बोला । ज्ञानोबासी म्हणे चला ॥३॥

६२
ज्ञानोबाचा हात । प्रेमें धरी विश्वनाथ ॥१॥
ऐसें बोलत चालत । दोघे आले गंगे आंत ॥२॥
ज्ञानोबाचें पायीं । मिठी घाली गंगाबाई ॥३॥
नामा म्हणे सोडा बाई । ज्ञानदेव सर्वांठायीं ॥४॥

“संत नामदेव गाथा” तीर्थावळी अभंग १ ते ६२ समाप्त

“संत नामदेव गाथा तीर्थावळी”


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

संत नामदेव अभंग । संत नामदेव । संत नामदेव महाराज । संत नामदेव माहिती । संत नामदेव माहिती मराठी मध्ये ।
संत नामदेव फोटो । 

संत नामदेव गाथा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *