संत नरहरी सोनार अभंग

सूर्य असे गगनीं – संत नरहरी सोनार अभंग

सूर्य असे गगनीं – संत नरहरी सोनार अभंग


सूर्य असे गगनीं ।
परी दिसतो जीवनीं ॥ १ ॥
मेघ असतो अंबरीं ।
पाणी पडे भूमीवरी ॥ २ ॥
आकाशीं चंद्र तारांगण ।
बिंब दिसे पाण्यांतून ॥ ३ ॥
बिंब पाहतां दर्पणीं ।
बिंबे दिसे त्यांतुनी ॥ ४ ॥
आत्मा अनुभवीं पाहतां ।
देव दिसे हो तत्वतां ॥ ५ ॥
गुरु कृपा होय पूर्ण ।
नरहरी लंपट निशिदिन ॥ ६ ॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका..
संत नरहरी सोनार अँप डाउनलोड करा.
play store

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *