श्री नवनाथ भक्तिसार १ ते ४०

नाथपंथातील शाबरी विद्या

नाथपंथातील शाबरी विद्या :-

नाथपंथाची ओळख शाबरी विेद्येच्या माहितीशिवाय अपुरीच राहील. नाथपंथाचे नुते नाव काढले तरी शाबरी विद्येची आठवण होते. किंबहुना काही लोक या शाबरी विद्येमुळेच नाथपंथाकडे आकर्षित होतात! खरे तर नाथांनी त्यांच्या काळात जीवब्रह्म सेवेसाठी या विद्येचा उपयोग केला. परंतु आज मात्र ही विद्या बर्‍याच प्रमाणात लुप्त झाल्याचे दिसते. फक्त काही हातावर मोजण्याइतक्या नाथपंथीय योग्यांजवळ ती टिकून आहे.गुरु गोरक्षनाथांनी या विद्येचा उपयोग सर्वसामान्यांची दुःखे दूर करण्यासाठीच केला. परंतु ही विद्या म्हणजेच सर्वस्व नव्हे किंवा ते नाथयोग्यांचे अंतिम साध्यही नव्हे असे त्यांनी निक्षून सांगितले आहे. ही मंत्रविद्या म्हणजे ‘क्षुद्रसिद्धी’ आहे असे ते म्हणतात. जीवशिवऐक्य हेच या पंथाचे अंतिम उद्दिष्ट आहे.
शाबरी विद्येतील मंत्राची माहिती पाहण्यापूर्वी या विद्येला ‘शाबरी’ हे नाव का पडले याची थोडीशी माहिती करून घेणे आवश्यक आहे.
त्यासाठी एका पौराणिक कथेची ओळख आपल्याला करून घ्यावी लागेल. ती कथा अशी-
एकदा भगवान शिव ध्यानावस्थेतून जागृत झाले तेव्हा त्यांना समोर गौरीचे दर्शन झाले. त्यावेळी शिवांवर आकृष्ट होऊन गौरीने त्यांची अर्धांगी होण्याची इच्छा प्रकट केली. अन्‌ शिवांनी या गोष्टीला तत्काल मान्यता दिली आणि शिवशंभू संसारी झाले!
आदिनाथ आणि आदिमाया यांचे मंगल मीलन झाले!
परंतु संसार म्हटला की पति-पत्नींचे वाद-विवाद हे आलेच! शिव आणि गौरी यांचेही असेच वादविवाद होऊ लागले आणि रागाच्या भरात शिव कैलास सोडून एका निबिड जंगलात एकांतात येऊन राहिले अन्‌ त्यांनी तिथेच समाधी लावली.
गौरीनं-म्हणजेच पार्वतीनं त्यांचा खूप शोध घेतला. पण छे! ते कुठले सापडतात!
तेवढ्यात नारदमुनी अचानक तिथे आले. गौरीनं आपली व्यथा त्यांना ऐकवली. नारदमुनींनी अंतर्ज्ञानाने शिवांचा शोध घेतला अन्‌ त्यांचे बसण्याचे ठिकाण देवी पार्वतीला सांगितले.
तेव्हा पार्वती त्या ठिकाणी हजर झाली अन्‌ तिथे भिल्लीणीचा वेष घेऊन भगवान्‌ शिवांसमोर संगीतप्रधान नृत्याला सुरूवात केली.
त्या आवाजाने शिवांची समाधि उतरली नि ते समोर पाहतात तो शाबरी वेशात असलेली मूर्तिमंत सौंदर्याने न्हालेली गौरी!
तेव्हा शिवांनी स्मितहास्य करीत तिला विचारलं, ‘शबरी, तू मला माझ्या दिव्य समाधीतून जागृत का केलंस?’
त्यावर शबरी म्हणाली, ‘प्रभो, मला आपणाकडून एका गोष्टीचं मर्म जाणून घ्यायचं होतं.’
‘कोणती गोष्ट?’
‘आपली ही समाधी!’
‘समाधी?’
‘होय, आपण वर्षभर मला सोडून या अवस्थेत कसे राहिलात? सांगाल मला?’
‘अं, सांगेन. पण इथे आत्ता नाही. पुन्हा केव्हातरी.’
‘कधी? आणि कुठे?’
‘अशा ठिकाणी की जिथे मानवाची वस्ती नसेल, ते रहस्य कुणी ऐकणार नाही अशा ठिकाणी.’
पुढे तो विषय तेवढ्यावरच राहिला.
नंतर शिवपार्वती दोघेही पुन्हा कैलास पर्वतावर गेले.
काही दिवसांनी गौरीनं त्या गोष्टीची शिवांना आठवण करून दिली. तेव्हा शिव तिला घेऊन एका निबिड जंगलातील नदीकिनारी आले व ते समाधीचे गूढ तिला शाबरी भाषेत सांगू लागले. कारण शाबरी हीच गौरीची मातृभाषा होती. (गौरी ही भिल्लकन्या होती.)
परंतु ते शाबरी भाषेत सांगितलेले गूढ मत्स्यीच्या पोटात असलेल्या मच्छिंद्रनाथांनी ऐकले! ही गोष्ट शिवांनी अंतर्ज्ञानाने जाणली व मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद देऊन त्यांनी त्यांना हठयोगाचा उपदेश केला व जीवब्रह्माची सेवा करण्यास सांगितले. भगवान शंकरांनी गौरीला सांगितलेली ही शाबरी विद्या आणि त्यातील मंत्र हे शाबरी भाषेत असल्याने नाथपंथात ती ‘शाबरी विद्या’ म्हणूनच प्रसिद्धीस आली.
मच्छिंद्र, जालंधर यांच्याप्रमाणेच ही विद्या गोरक्ष व कानिफ यांनीही जीवब्रह्मसेवेसाठीच उपयोगात आणली.


शाबरी मंत्र व वैदिक मंत्र

शाबरी आणि वैदिक मंत्रात बराच फरक आहे. कारण वैदिक मंत्र हे प्रथम तपश्चर्येने सिद्ध करावे लागतात. परंतु शाबरी मंत्र हे स्वयंसिद्धच आहेत. कारण ती ‘ईश्वरी वाचा’ आहे. तसेच, त्यांच्यामागे नाथसिद्धांची तपस्या आहे. म्हणूनच श्रीगोरक्षनाथांना तपोबल प्राप्त झालेले नसतानाही मच्छिंद्रनाथांनी दिलेल्या संजीवनी मंत्राने त्यांनी मातीच्या पुतळ्याला सजीव केले. हा गोरक्षांच्या मंत्राचा प्रभाव नसून म च्छिंद्रनाथांच्या तपोबलाचा, गुरुअधिष्ठानाचा प्रभाव आहे हे विसरता कामा नये.
तथापि, हे मंत्र स्वयंसिद्ध असले तरी ते एका विशिष्य पद्धतीनेच म्हणावे लागतात.
तथापि, आज दुर्दैवाने शुद्ध स्वरूपात फारच थोडे शाबरी मंत्र उपलब्ध आहेत. शाबरी म्हणून म्हटले जाणारे असे बरेचसे मंत्र बर्भरी आहेत. कारण शाबरी विद्येचा कापालीक तांत्रिक फार दुरुपयोग करू लागल्याने नाथांनी ती लुप्त केली. परंतु त्यानंतर जीवब्रह्मसेवेसाठी ती बर्भरी म्हणून पुन्हा प्रचारात आली. त्यामुळे बहुतेकांजवळही बर्भरी विद्याच आढळून येते व तिलाच ते शाबरी असे म्हणताना दिसतात. काही उच्च श्रेणीच्या नाथपंथी योग्यांजवळच फक्त खरी शाबरी विद्या अस्तित्त्वात आहे. परंतु असे महात्मे साहजिकच फार थोडे आहेत.


शाबरी मंत्राची बीजे

वैदिक मंत्रांप्रमाणेच काही शाबरी मंत्रही ‘ॐ’ ने सुरू होतात. (उदा. ॐ नमो भगवते श्री शरभेश्वराय पक्षिराजाय नवनाथाय ॐ नमो भगवते इं, रूं, क्लीं, वं, गं, नं, वं, कूं, वां, दिनी स्वाहा॥)
परंतु शाबरी मंत्रांची इतर बीजे वैदिक मंत्रांच बीजांपेक्षा फार वेगळी आहेत, ती अशी-
शक्तिरूप : इं, रूं, क्लीं, वं, गं. नं, वं, वां, कूं, वा,
वैष्णवीरूप : ऊं, लीं, श्रीं, हुं.
शैवरूपः ॐ खें खां खुं हुं.
या बीजांची कल्पना येण्यासाठी असाच आणखी एक शाबरी मंत्र हा.


॥ ॐ ऊं, लीं, श्रीं, हुं, फट् स्वाहा ॥

या सर्व मंत्रात नवनाथांचे तपःसार्थ् एकवटलेले आहे व त्यामुळेच ते सिद्धमंत्र बनले असून त्यांचा प्रभाव त्वरित दिसून येतो.


बर्भरी मंत्र

पुष्कळदा शाबरी आणि बर्भरी यांची गल्लत केली जाते. पुष्कळसे कापालिक, कापालिक व बर्भरी मंत्रांचा उपयोग जारण, मारण, तारण व उच्चाटन या साठी करताना दिसतात. नाथपंथातील सुफिपंथीय मुसलान शिष्यांनी ह्या मंत्रात इस्लामी शब्दही घुसडलेले दिसतात. त्यामुळे आज शुद्ध स्वरूपातील खरे बर्भरी मंत्र ही थोडेच उपलब्ध आहेत. तथापि जीव ब्रह्मसेवेसाठी त्यांचाही उपयोग होताना दिसतो.
हे बर्भरी मंत्र नेही ‘ॐ नमोआदेश। गुरुजी को आदेश। या शब्दांनी सुरू होतात.
नुमुन्यासाठी एक बर्भरी मंत्र पहा. हा मंत्र विंचवाचे विष उतरविणसाठी आहे. तो मंत्र असा-

॥ ॐ नमो आदेश। गुरुजीको आदेश। गुरुको फुसकी झोपडी। फुलो सकाई। उतर उतर बिच्चू तुझे काळी मोहिद्दीन तिस्सतीनकी द्वाही । साई गोरखनाथ की दुहाई। गुरुकी शक्ती येरी भक्ती करे मंत्र ईश्वरी वाचा। पिण्ड कच्चा। गुरु गोरख नाथका शब्द सच्चा॥

बर्भरी मंत्रात असेच मंत्र ताप उतरविणेसाठी, शेतात अधिक धान् येणे, विघ्न दूर होणे इ. साठी आढळून येतात.
या मंत्रांची शक्ती ध्वनित असल्यामुळे त्यांचे उच्चार शुद्धच व्हावे लागतात. तसेच, यातील बहुतेक मंत्र कुंभकातच म्हणावे लागतात व यासाठी प्राणायामाची उत्तम माहिती असावी लागते व ती गुरुकडूनच घेणे आवश्क असते.
काही कापालिक मंत्रांच सुरवातीला मुसलानी भाषेतील शब्द आढळून येतात.
उदा. बिस्मिल्ला रहिमानी रहीम ॐ नमोभगवती…. इत्यादी.
अशा अशुद्ध मंत्रांमुळेच या मंत्रांचा प्रभाव कमी होत गेला हे विसरता कामा नये . कदाचित्‌ त्यामुळेच मंत्राच्या जोडीला यंत्रांचा उपयोग होऊ लागला.


शाबरी मंत्र कसे म्हणतात?

कोणतही मंत्राचे फल मिळण्यासाठी तो मंत्र गुरुमुखातूनच घवा लागतो. तसेच, नाथपंथातील बहुतेक मंत्र हे पूरक, कुंभक व रेचक ह्यातच म्हणावाचे असतात. याची नीट कल्पना येण्यासाठी पुढील मंत्र नमुन्यादाखल देतोः
ॐ नमोआदेश। गुरुजीको आदेश। ॐ अरे अरे अंजनी कुमारा। मार मार , जाल जाल, कोट कोट, बंद बंद, पूर्व बंद, पश्चिम बंद, उत्तर बंद, आकाश बंद, पाताल बंद, तिन्हो तालेके देव बंद, गुरुकी शक्ती मेरी भक्ती | खुले मंत्र ईश्वरी वाचा॥
हा मंत्र पूरक, कुंभक व रेचकात असा म्हणावा लागतो.
पूरक – ॐ नमोआदेश गुरुजीको आदेश।
कुंभक- ॐ अरे अरे अंजनी कुामारा, मार मार, जाल जाल, कोट कोट, बंद बंद, पूर्व बंद, पश्चिम बंद, उत्तर बंद, दक्षिण बंद, आकाश बंद, पाताल बंद, तिन्हो तालेके देव बंद.
रेचक : गुरुकी शक्ती मेरी भक्ती खुले मंत्र ईश्वरी वाचा॥
वरील मंत्रात हनुमंताची स्तुति असून हा मंत्र नियमित म्हटला तर हनुमंत प्रसन्न होऊन आपल्या कार्यात मदत करतात. नाथपंथातील तांत्रिक साधनेत हनुमंताला फार महत्व असून अनेक शाबरी मंत्रात हनुमंताचे नाव आपल्याला आढळून येते. नमुन्यादाखल काही शाबरी मंत्र पाहू या .


काही प्रभावी शाबरी मंत्र

(१) विघ्न दूर करण्याचा मंत्र – ॐ नमोआदेश। गुरुजी को आदेश। पहिला गण गणपती। चौदा विद्यांचा सारथी । जती सती कैलासपती। बलभीम मारुती। आले विघ्न निवारी। साई गोरखनाथ की द्वाही। गुरुकी शक्ती मेरी भक्ती चले मंत्र ईश्वरी वाचा। पिण्ड कच्चा गुरु गोरखनाथका शब्द सच्चा॥
(२) श्री हनुमान मंत्र – पुढील मंत्राने स्वतःबरोबरच दुसऱ्याचेही रक्षण करता येते. तो मंत्र असाः
ॐ नमो आदेश। गुरुकी शिवायै चार चक्र हनुमंत वीर बारा चक्र नारसिंह वीर दोन चक्र अगीयाबेताल मुख बंगले हिंगलात पीठ पाछे क्षत्र क्षत्रपाल मस्तकी चंद्र सूर्य सारथी जो कोई हमे मारमार करता सो हमारे डावे पाव पडता, भूत, पतित, दृष्ट, मूठ, बंध, ताप, तीजारी, टोनाटाना, चेटा, चेटी जो कोई हमे करे उसकी उसपर पडे उलट थी पलट काया गोरख कहे इस पिण्डका रक्षपालवीर हनुमंत राखे, मेरी भगत गुरुकी सगत, फुरो मंत्र ईश्वरी वाचा॥
(३) व्यापारवृद्धीसाठी मंत्र- ॐ श्रीं श्रीं परमांसिद्धि श्रीं श्रीं ॐ॥ (हा मंत्र १००० वेळा म्हटलानंतर सिद्ध होतो. तनंतर तो दररोज १०८ वेळा म्हणावा.)
(४) ताप उतरण्यासाठी मंत्र – श्रीकृष्ण बलभद्रश्च प्रद्युम्न अनिरुद्धकः तस्य स्मरण मात्रेण ज्वरो याति दशोदिशः॥ (३ वेळा रोग्याने स्वतः उच्चार करावा)
(५) डोके दुखीवर मंत्र – हजार घर घालै एक घर खाय , आगे चलो तो पीछे जा, फुरो मंत्र ईश्वरी वाचा॥ (रोग्याच्या डोळ्यास हाताने धरून मंत्र म्हणून ७ वेळा फुंकावे.)
(६) बाधिक व्यक्तीसाठी मंत्र – जे घर बाधिक आहे किंवा एखाद्या व्यक्तीला काही बाधा असेल तर त्यासाठी पुढील प्रभावी मंत्राचे पठण ३,५, ७ किंवा ११ वेळा करावे, तसेच वरील मंत्र म्हणून हातातील सिद्ध विभूती बाधिक व्यक्तीवर फेकावी तो मंत्र असा-
बावन वीर छत्तीस जंजीर। आग्या वेताळ मसण्या वीर। बावन वीर छत्तीस जंजीर। आग्या वेताळ मसण्या वीर। खाता बोल त्याचा जीव बंधू। मार त्याचा हात बांधू। नऊ नाडी बांधू। बहात्तर कोटी कत्यायन को बांधू। बांधू न बांधू। तो आण काळ भैरवाची आण गुरुची। आण माझी गुरुकी शपथ मेरी भगत फुरो मंत्र ईश्वरी वाचा गुरुगोरखनाथका शब्द जुगो जुग साचा॥
असे शाबरी मंत्र अनेक आहेत. परंतु त्यातील बरेच मंत्र अशुद्ध स्वरुपात प्रचारात असल्यामुळे त्यांचा व्हावा तसा उपयोग होत नाही. तसेच ते मंत्र प्रथम सिद्ध करून घ्यावे लागतात. साधकाचे नेहमीचे आचरणही अतिशय शुद्ध लागते. यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे ते गुरुमुखातूनच प्राप्त व्हावे लागतात. या मंत्रांचा अनुभव न येण्यामागे आणखी बरीच कारणे आहेत. तथापि आजही काही आचरणशुद्ध नाथामार्गी साधकांकडे या मंत्रांच सहाय्याने अजूनही काही अघटित घटना घडू शकतात हेही मान्य करावे लागेल. अर्थात त्यांची संख्या फारच थोडी आहे.


शाबरी कवच

या  शाबरी मंत्रांप्राणेच शाबरी कवचाचाही खूप उपयोग होतो. या  कवचाचा उपयोग अरिष्टनिवारण, शत्रुनाश, विजप्राप्ती, पुमुत्रप्राप्ती, पूर्णामुष् इ. कर्या या साठी केला जातो व बरच लोकांना तच पठणाचा फादा झालचे दिसते.

हे शाबरीकवच श्रीदत्तात्रे व नवनाथ यांच्या फोटो वा मूर्तीसमोर बसून वाचावे. महत्वाच्या कार्यासाठी ३,५,७,९ वा ११ वेळा त्याचे रोज वाचन करावे. त्वरित फल हवे असेल तर ते रोज १५ , १९ वा २१ वेळा असे ११ ते २१ दिवस (कार्याच्या स्वरुपानुसार) वाचावे. याचे पाठ विषमसंख्येतच करावेत असे म्हणतात. प्रवासात असताही त्यात खंड पडू देऊ नये.


सर्वारिष्टनाशक  श्रीशाबरी कवच

श्रीशाबरी विद्या ही भगवान् शंकरांपासून प्रसृत झाली व त्यानंतर श्रीमच्छिंद्रनाथ, श्रीगोरक्षनाथ इत्यादी नऊ नाथांनी या विद्येच्या जोरावर अनेक अघटित कृत्ये केली. शाबरी हे पाव-तीदेवीचेच एक नाव असून नवनाथांनी तपश्चर्येच्या द्वारे  तिला प्रसन्न  करून घेतले. ‘शाबरी कवच’हे नाथ संप्रदायात प्रसिद्ध  असून त्याच्या अनुष्ठानांच्या द्वारे भूतबाधा, दैवीप्रकोप, सांसारिक आपत्ती , दारिद्रय संकटे दूर होउुन साधकावर नवनाथांची कृपा होते यात संशय नाही.
महत्वाच्या कार्यासाठी या कवचाची रोज ३, ५, ७, ९ किंवा ११ अशी पारायणे करावीत. त्वरित फलप्राप्तीसाठी १५, १९, २१ वेळा याचे रोज न चुकता भक्तीभावाने व एकग्रचित्ताने वाचन करावे. प्रवासात असतानाही या वाचनात खंड पडू देउु नये. तसेच हे अनुष्ठान सुमुहूर्त  पाहून सुरू करावे. अनुष्ठनाला बसण्यासाठीमृगासन घ्यावे. महत्वाच्या कामासाठी अनुष्ठान करावयाचे झाल्यास अनुष्ठानकालात अभक्ष्य भक्षण व अनृत (खोटे) भाषाण वर्ज्य करून पूर्ण ब्रह्मचर्य पाळावे व नवनाथांची मानसपूजाही अवश्य करावी. नित्य अनुष्ठान करण्यासाठी एव्हड्या  कडक नियमांची अर्थातच  आवश्यकता नाही. तथापि साधकाने साधकासारखेच वागणे केव्हाही इष्ट होय !


इच्छित कार्यपूर्ती साठी शाबरी मंत्र

महत्वाचे  कार्य  सफल होण्यासाठी पुढील शाबरी मंत्राचा उत्तम उपयोग होतो. मंत्र असा

ॐ नमो महाशाबरीशक्ती  मम अरिष्टं निवारय निवारय ।
मम अमुक  कार्य  सिद्धं सिद्धं  कुरु कुरु स्वाहा ।।

(अमुक  शब्दाच्या जागी आपल्या कार्याचा  उल्लेख करावा.) मात्र, यासाठी प्रत्येक  राशीपरत्वे बीजमंत्र कोणते याची माहिती असणे आवश्यक  आहे. हे बीजमंत्र पुढीलप्रमाणे:-

राशीपरत्वे बीजमंत्र जपविचार
मेष : ॐ ऐं, क्लीं, सौ: तूळ : ॐ र्‍हीं, क्लीं, श्रीं
वृषभ : ॐ र्‍हीं, क्लीं, श्रीं वृश्चिक : ॐ ऐं, क्लीं, सौ:
मिथुन : ॐ श्रीं, ऐं, सौ: धनु :ॐ र्‍हीं, क्लीं, सौ:
कर्क :ॐ ऐं, क्लीं, श्रीं मकर :ॐ ऐं, क्लीं, र्‍हीं, श्रीं, सौ:
सिंह :ॐ र्‍हीं, श्रीं, सौ: कुंभ : ॐ र्‍हीं, ऐं,क्लीं, श्रीं
कन्या : ॐ श्रीं, ऐं, सौ: मीन :ॐ र्‍हीं, क्लीं, सौ:
उदाहरणार्थ -: धनु राशीची व्यक्ती विवाह होण्याकरिता विधी करीत आहे; तेव्हा त्या व्यक्तीने आपला बीजमंत्र घेउुन, म्हणजे ॐ, र्‍हीं, क्लीं, सौ: हा मंत्र घेउुन, त्याचे पुढे वर विदित केलेला जपमंत्र म्हणजे ॐ नमो महाशाबरीशक्ती मम अरिष्टं निवारय निवारय मम (जपमंत्रांतील अमुक या शब्दाऐवजी, इच्छित कार्याचे नाव म्हणजे विवाह हा शब्द घालून जपकमास सुरूवात करावी.) विवाहाकार्य सिद्धं सिद्धं कुरु कुरु स्वाहा. षाचप्रमाणे इतर राशींच्या व्यक्तीनीही आपला बीजमंत्र व अमुक ह्या शब्दाचे ठिकाणी कार्याचे नाव घेउुन संकल्पित जप करावा.


।। अथ शाबरीकवचप्रारंभ: ।।

आचम्य प्राणायानम्य (असे म्हणून पुढील चार बीजमंत्रानी, तीन वेळा डावे हातात पाणी संध्येची पळी घेउुन तिने उजवे हातात पाणी घेउुन प्यावे.)

ॐ ऐं । आत्मतत्वाय स्वाहा ।। ॐ क्लीं । विद्यातत्वाय स्वाहा ।।
ॐ सौ: ।शिवतत्वाय स्वाहा ।।
ॐ, ऐं, क्लीं, सौ: । सर्वतत्वाय । न मम ।।
अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपिवा ।।
य: स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर:सुचि: ।।

(डावे हातांत संध्येच्या पळीत पाणी घेउुन, ते पाणी विदित केलेल्या मंत्राने, मस्तकावर व पूजेचे सर्व साहित्यावर सिंचन करणे.)

।। अपसर्पन्तु ते भूता ये भूमिसंस्थिता: ।।
।। ये भूता विघ्नकर्तारस्ते नश्यन्तु शिवाज्ञया ।।

(विदित केलेला मंत्र म्हणून, डावा पाय तीन वेळा जमिनीवर आपटावा व ती क्रिया चालू असताना, तीन टाळया वाजवाव्यात.)
ॐ अंगुष्ठाभ्यां नम: ।। (असे म्हणून, अंगठयाजवळील बोटाने, अंगठयाच्या मुळापासून शेवटपर्यंत फिरवावे.)
ऐं तर्जनीभ्यां नम: ।। (असे म्हणून अंगठा, अंगठयाच्या जवळील बोटावर, मुळापासून अंतापर्यंत फिरवावा. त्याचप्रमाणे अंगठयाने पुढील प्रत्येक बोटावर मंत्र म्हणून अंगठा फिरवावा.)
र्‍हीं मध्यमाभ्यां नम: ।। क्लीं अनामिकाभ्यां नम: ।। सौं: कनिष्ठिकाभ्यां नम: ।। ॐ,ऐं, र्‍हीं, क्लीं, सौ: ।। करतलकरपृष्ठाभ्यां नम: ।। (असे म्हणून उजवा हात, बोटांपासून मनगटाच्या टोकापर्यंत, डावे हातावरून फिरवावा.)
ॐ हृदयाय नम: ।। (उजवा हात हृदयावर ठेवणे.) र्‍हीं शिखायै वषट् ।। (उजव हात शेंडीचे जागेवर ठेवणे.) क्लीं कवचाय हुं ।। (असे म्हणून दोन्ही हात मस्तकापासून पायापर्यंत फिरवणे.) सौ: नेत्रत्रयाय वौषट् ।। (असे म्हणून अनामिका व अंगठा, दोन्ही डोळयास लावणे.) ॐ, ऐं, र्‍हीं, क्लीं, सौ: ।। अस्त्राय फट् ।। (उजव हात मस्तकाभोवती फिरवून, अंगठा व मधले बोट ह्यांनी चुटकी वाजवून, डावे हातावर उजवे हाताने टाळी वाजवावी व नंतर शेंडीची गाठ बांधावी.)

अथ ध्यानं।। ॐ नमो भगवते श्रीवीरभद्राय । विरूपाक्षी लं निकुंभिनी षोडशी अपचारिणी। वरूथिनी मांसचर्विणी । चें, चें, चें, चामलवरायै । धनं धनं कंप कंप आवेशय । त्रिलोकवर्तीलोकदायै । सहस्रकोटिदेवानाकर्षय आकर्षय। नवकोटिगंधर्वान् आकर्षय आकर्षय । हंस:, हंस:, सोहं, सोहं, सर्व रक्ष, मां रक्ष, भूतेभ्यो रक्ष । ग्रहेभ्यो रक्ष । पिशाचेभ्यो रक्ष । शाकिनीतो रक्ष । डाकिनीतो रक्ष । अप्रत्यक्षप्रत्यक्षारिष्टेगुरूवाल । ॐ प्रसह हनूमंत रक्ष।।
।।श्रीमन् नाथगुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं । सिद्धाढयं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं ।। वैराटाचतुष्टयं च नवकं वैरावलीपंचकं । श्रीमन् मालिनिमंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलम् ।। इति प्रार्थना ।। (विदित केलेली प्रार्थना हात जोडून म्हणावी.)
प्राणायामविधिं कृत्वा ।। ( ॐ,ऐं, र्‍ही, क्लीं, सौ: या बीजमंत्राने, नाकपुडी वर अनामिका व कानिष्ठिका ही बोटे ठेवून, श्वास उजवे नाकपुडीने ओढुन घ्यावा. नंतर उजवे नाकपुडीवर अंगठा ठेवून बीजमंत्र मनात म्हणून, मुख बंद ठेवून, श्वास रोखून धरावा. नंतर डावे नाकपुडीतून हळूहळू श्वास सोडीत, बीजमंत्र म्हणावा.)
अद्य पूर्वोच्चारित-एवंगुण-विशेषण-विशिष्टायां शुभपुण्यतिथौ।।ब्रह्मा-विष्णु-महेश्वरा ऋषय: ऋग्यजु: सामार्थवाणि छंदांसि मम अमुककार्यसिद्ध्यर्थ जपे विनियोग: ।। (अमुक अक्षरांचे ठिकाणी इच्छित कार्याचे नाव घेउुन, संध्येचे पळीत पाणी घेउुन, विदित केलेला संकल्प सोडावा.)
यथाशक्ति जपं कृत्वा ।। (प्रत्येक राशीचे मंत्र दिलेले आहेत, त्यातून स्वराशीचा मंत्र घेउुन, हजार अगर किमान नित्य १०८ वेळा जप करावा, व तो पूर्वाभिमुख बसून करावा.)
अथमुद्रा । । नमस्कारं कृत्वा ।। पुस्तकं ज्ञानमुद्रां च त्रिशूलं चक्रचारिका ।। अंकुशं पाशमुद्रा च वालमुद्रा: प्रकीर्तीता: ।। योनिमुद्रया प्रणमेत् ।।
१. पुस्तक मुद्रा : उजवे हाताची अर्ध मूठ वळवून सरळ डोळया समोर धरणे.
२. ज्ञान मुद्रा : अंगठया जवळील बोट व अंगठा, टोका जवळ एकमेकांस मिळवणे.
३. त्रिशूल मुद्रा : करंगळी व अंगठा बंद करून, मधली तीन बोटे डोळयांसमोर धरणे.
४. चक्रचारिका : अंगठा व त्याचे जवळील बोट एकमेकांस मिळविणे व गोलाकार करणे.
५. अंकूश मुद्रा : मधले बोट उभे ठेवून, तीन बोटांची मुठ वळवून, करंगळी वर अंगठा ठेवावा.
६. पाश मुद्रा : दोन्ही हातांचे मधले बोट, व आंगठयाजवळील बोट एकमेकांत गुंतविणे.
७. वाल मुद्रा : दोन्ही हात जोडून नमस्कार करणे.
८. योनि मुद्रा : डावे हाताची करंगळी व शेजारील बोट, मधले बोट, यामध्ये क्रमवार उजवे हाताची तीच बोटे, जे बोट त्याच बोटावर ठेवून, हात फिरवून, अंगठया शेजारील बोट एकमेकांस टेकवून व अंगठा एकमेकांत गुंतवून नमस्कार करावा.
अथ प्रार्थना ।। ॐ र्‍हां, र्‍हीं, र्‍हूं, क्षां, क्षीं, क्षूं । कृष्णक्षेत्रं पालाय नम आगच्छ आगच्छ । बली सर्वग्रहं शमन मम कार्यं कुरु कुरु स्वाहा । ॐ नमो ॐ र्‍हीं , श्रीं, क्लीं, ऐं, चक्रेश्वरी ।शंख-चक्र-गदा-पद्म –धारिणी । मम वांछितसिद्धिं कुरु कुरु स्वाहा । । ॐ नमो कमलवदनमेहिनी सर्वजनवशकारिणी । साक्षात् सुक्ष्मस्वरूपिणी यन्मम वशगा ॐ सुरासुरा भवेयु: स्वाहा । । गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: । गुरु: साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवेनम: ।। अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया ।चक्षुरुन्मीलितं ये न तस्मै श्रीगुरवे नम: ।। अरुणकिरणजालै रंजिता सावकाशा । विधृतजपमाला वीटिका पुस्तहस्ता।। इतरकरकराढया फुल्लकल्हारहस्ता । निवसतु हृदि बाला नित्यकल्याणशीला ।। (ही प्रार्थना करून नमस्कार करावा.)
अथ शाबरीकवच जपे विनियोग: ।। असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी ताम्हनात सोडावे व पुढील कवचपाठ नित्य शक्ती नुसार जपावे. जप संख्या विषम असावी; ( म्हणजे ३:५:७:९:११ व जास्तीत जास्त २१ ते ४१ पर्यंत असावी.)


।।अथ शाबरीकवचपाठ प्रारंभ: ।।

ॐ सर्व विघ्ननाशाय । सर्वारिष्टनिवारणाय । सर्वसौख्यप्रदाय । बालानां बुद्धीप्रदाय । नानाप्रकारकधनवाहनभूमिप्रदाय । मनोवांछितफलप्रदाय । रक्षां कुरु कुरु स्वाहा ।। ॐ गुरवे नम: । ॐ श्रीकृष्णाय नम: । ॐ बलभद्राय नम: । ॐ श्रीरामाय नम: । ॐ हनूमंते नम: । ॐ शिवाय नम: । ॐ जगन्नाथाय नम: । ॐ बद्रीनारायणाय नम: । ॐ दुर्गादेव्यै नम: । ॐ सूर्याय नम: । ॐ चंद्राय नम: । ॐ भौमाय  नम: । ॐ बुधाय  नम: । ॐ गुरवे  नम:। ॐ भृगवे नम: । ॐ शनैश्चराय  नम: । ॐ राहवे नम:। ॐ पुच्छ्नायाकाय  नम: । ॐ नवग्रहरक्षां कुरु कुरु  नम:  । ॐ मन्ये वरं हरीहरादय एव दृष्टा दृष्टेषु  हृदयं त्वयि तोषमेती । किं विक्षितेन भवता भुवि येन नान्य : कश्चित मनो हरती नाथ भवानात एहि । ॐ नम: श्रीमन्बलभद्रजयविजय अपराजित भद्रं भद्रं कुरु कुरु स्वाहा  । ॐ भूर्भुव: स्व: तत्सावितुर्वरेण्यं  भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात् । सर्व विघ्नशांतिं कुरु कुरु स्वाहा । ॐ ऐं र्‍हीं, क्लीं, श्रींबटुक भैरवाय । आपदुद्धरणाय । महानस्याय स्वरुपाय । दीर्घारिष्टं विनाशय विनाशय । नानाप्रकारभोगप्रदाय ।मम (दुसर्‍या करिता करणे झाल्यास त्याचे नाव घेउुन“यजमानस्य”असे म्हणून पुढे चालवावे.) सर्वारिष्टं हन हन । पच पच, हर हर, कच कच, राजद्वारे जयं कुरु कुरु । व्यवहारे लाभं वर्धय वर्धय । रणे शत्रुं विनाशय विनाशय । अनापित्तीयोगं निवारय निवारय।संतत्युप्तत्तीं कुरु कुरु।पूर्ण आयु: कुरु कुरु । स्त्रीप्राप्तिं कुरु कुरु हुं फट स्वाहा ।। ॐ नमो भगवते वासुदेवाय नम: । ॐ नमो भगवते विश्वमूर्तये नारायणाय । श्रीपुरुषोत्तीमाय रक्ष रक्ष । युष्मदधीनं प्रत्यक्षं परोक्षंवा । अजीर्णं पच पच । विश्वमर्ते अरीन हन हन ।एकाहिकं द्वयाहिकं त्र्याहिकं चातुर्थीकं ज्वरं नाशय नाशय । चतुरधिकान्वा तान् अष्टदश क्षयरोगान्, अष्टादश कुष्टान हन हन । सर्व दोषान भंजय भंजय। तत्सर्वं नाशय नाशय।शोषय शोषय, आकर्षय आकर्षय । मम शत्रुं मारय मारय ।उच्चाटय उच्चाटय, विद्वेषय विद्वेषय । स्तंभय स्तंभय, निवारय निवारय ।विघ्नान हन हन । दह दह, पच पच, मथ मथ, विध्वंसय विध्वंसय, विद्रावय विद्रावय । चक्रं गृहीत्वा शीघ्रमागच्छागच्छ चक्रेण हन हन । परविद्यां छेदय छेदय। चतुरशीतिचेटकान् । विस्फोटय नाशय नाशय ।वातशूलाभिहतदृष्टीन् ।सर्प-सिंह-व्याघ्र-द्वीपद-चतुष्पदान् । अपरेबाह्यांतरादिभुव्यंतरिक्षगान् । अन्यानपि केश्चित  देशकालस्थान् । सर्वान हन हन ।विषेममेघनदीपर्वतादीन् । अष्टव्याधीन् । सर्वस्थानानि रात्रीदिनपथगचौरान् ।वशमानय वशमानय ।सर्वोपद्रवान नाशय नाशय । परसैन्यं विदारय विदारय ।परचक्रं निवारय निवारय । दह दह रक्षां कुरु कुरु । ॐ नमो भगवते ॐ नमो नारायणाय हुं फट स्वाहा।। ठ: ठ: ॐ र्‍हां, र्‍हीं हृदये स्वदेवता।।

एषा विद्या महानाम्नी पुरा दत्ता शतक्रतो: ।
असुरान हन्तुं हत्वा तान सर्वांश्च बलिदानवान्।।
य: पुमान् पठते नित्यं वैष्णवीं नियतात्मवान्।
तस्य सर्वान् हिंसंती यस्या दृष्टिगतं विषं।।
अन्यदृष्टिविषं चैव न देयं संक्रमे ध्रुवं।
संग्रामे धारयत्यंगे उत्पातशमनी स्वयं।।
सौभाग्यं जायते तस्य परमं नात्र संशय: ।
हुते सद्यो जयस्तस्य विघ्नं तस्य न जायते।।
किमत्र बहुनोक्तेन सर्वसौभाग्यसंपद: ।
लभते नात्र संदेहो नान्यथा नदिते भवेत्।
गृहीतो यदि वा यत्नं बालानां विविधेरपि।
शीतं चोष्णतां याति उष्ण: शीतमयो भवेत्।
नान्यथा श्रुतये विद्यां य: पठेत् कथितां मया।
भूर्जपत्रे लीखेद्यंत्रं गोरोचनमयेन च।।
इमां विद्यां शिरोबंधात्सर्वरक्षां करोतु मे।
पुरुषस्याथवा नार्या हस्ते बध्वा विचक्षण: ।।
विद्रवंति प्रणश्यंति धर्मस्तिष्ठति नित्यश: ।।
सर्वशत्रुभयं याति शीघ्रं ते च पलायिता: ।।

ॐ ऐं, ऱ्हीं, क्लीं, श्रींभुवनेश्वर्य ।श्री ॐ भैरवाय नमो नम: ।अथ श्रीमातंगीभेदा, द्वावींशाक्षरो मंत्र: समुख्यायां स्वाहातो वा।।हरि: ॐ उच्चिष्टदेव्यै नम:। डाकिनी सुमुखिदेव्यै महापिशाचिनी।  ॐ ऐं, ऱ्हीं ,ठा: ; ठ:, द्वाविंशत् ॐ चक्रीधराया: ।अहं रक्षां कुरु  कुरु।सर्वबाधाहरिणी देव्यै नमो नम: ।सर्व प्रकारबाधाशमनं, अरिष्टनिवारणं कुरु  कुरु ।फट्। श्री  ॐ कुब्जिकादेव्यै ऱ्हीं ठ: स्व: ।शीघ्रं अरीष्टनिवारणं  कुरु कुरु।देवी शाबरी क्रीं ठ: स्व: ।शारीरिकं भेदाहं मायां भेदय पूर्णं आयु: कुरु।
हेमवती मूलरक्षां कुरु।चामुंडायै देव्यै नम: ।शीघ्रं विघ्ननिवारणं सर्ववायुकफपित्तीरक्षां            कुरु।भूतप्रेतापिशाचान् घातय्
।जादुटोणाशमनं कुरु।तती सरस्वत्यै चंडिकादेव्यै गलं विस्फोटकान्, वीक्षित्य शमनं कुरु।महाज्वरक्षयं कूरु स्वाहा।सर्व सामग्रीं भोगं सत्यं, दिवसे  दिवसे, देहि देहि रक्षां कुरु कुरु।क्षणे क्षणे, अरिष्टं निवारय।दिवसे दिवसे, दु:खहरणं, मंगलकरणं, कार्यसिधि्दं कुरु कुरु।हरि: ॐ श्रीरामचंद्राय  नम: ।हरि: ॐ भूर्भुवः स्व: चंद्रतारा॑-नवग्रह॑-शेष॑-नाग॑-पृथ्वी॑-देव्यै आकाश॑-निवासिनी सर्वारिष्टशमनं कुरु स्वाहा।।

।।आयुरारोग्यमैश्र्वर्यं वित्तं ज्ञानं यशोबलं।।
।।नाभिमात्रजले स्थित्वा सहस्रपरिसंख्यया।।
।।जपेत्कवचमिदं नित्यं वाचां सिध्दिर्भवेत्तत: ।।
।।अनेन विधिना भक्त्या कवचसिध्दिश्र्च जायते।।
।।शतमावर्तयेद्यस्तु मुच्यते नात्र संशय:।।
।।सर्वव्याधिभयस्थाने मनसाऽस्य तु चिंतनम्।।
।।राजानो वश्यतां यांति सर्वकामाथसिध्दये।।
।।अनेन यशाशक्तीपाठेन शाबरी देवी प्रियतां न  मम।।

(संध्येचे पळीत पाणी घेउुन, ती पळी उजवे हातात धरून, वरील संकल्प म्हणून, ते पळीतील पाणी ताम्हनात सोडावे व नमस्कार करावा.)

।।शुभंभवतु।।


नाथपंथातील शाबरी विद्या समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *