संत निळोबाराय अभंग

एका हरिच्या नामाचिसाठीं – संत निळोबाराय अभंग – १००९

एका हरिच्या नामाचिसाठीं – संत निळोबाराय अभंग – १००९

एका हरिच्या नामाचिसाठीं ।
चढला वैकुंठीं गजेद्र पशु ॥१॥
व्दंव्दाचिया महामारी ।
ओढितां जळचरीं जळा आंत ॥२॥
तैसाचि प्रल्हाद नामचि गातां ।
शस्त्र अग्नी घाता विष न करी ॥३॥
निळा म्हणे हरिचे भक्त ।
हरिनामें मुक्त बहुत झाले ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एका हरिच्या नामाचिसाठीं – संत निळोबाराय अभंग – १००९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *