संत निळोबाराय अभंग

कथाश्रवणें उपजे विरक्ति – संत निळोबाराय अभंग – १०८०

कथाश्रवणें उपजे विरक्ति – संत निळोबाराय अभंग – १०८०


कथाश्रवणें उपजे विरक्ति ।
कथाश्रवणें वाढे शांति ।
कथाश्रवणें परमानंद प्रप्ति ।
कथा श्रवणें ॥१॥
पापी उध्दरती ।
कथा श्रवणें उपाधी तुटे ।
कथाश्रवणें भवाब्धि आटे ।
कथाश्रवणें सच्चिदानंद भेटे ।
समुळ तुटे मायाजाळ ॥२॥
कथाश्रवणें स्वरुप स्थिति ।
कथाश्रवणें विषय समाप्ती ॥३॥
कथाश्रवणें मीपण नुरे ।
कथाश्रवणें अभिमान विरे ।
कथाश्रवणें कल्पनाहि चुरे ।
ब्रम्ह साक्षात्कारें भेटिसी ये ॥४॥
निळा म्हणे प्रथम पायरी ।
हरिकथा श्रवण मनन वरी ।
निजघ्यासें आत्मया हरी ।
भेटीजे निर्धारी साक्षात्कारें ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कथाश्रवणें उपजे विरक्ति – संत निळोबाराय अभंग – १०८०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *