संत निळोबाराय अभंग

लोंढा आला सात्विकचा – संत निळोबाराय अभंग – ११००

लोंढा आला सात्विकचा – संत निळोबाराय अभंग – ११००

लोंढा आला सात्विकचा ।
पूर अदभूत या प्रेमाचा ॥१॥
तेणें लागती वोसाणें ।
स्वानंदचि नामस्मरणें ॥२॥
मनोमीन तळपताती ।
गोड अर्थातें कवळिती ॥३॥
निळा म्हणे उभय तीरें ।
श्रोते वक्ते निर्मळ नीरें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

लोंढा आला सात्विकचा – संत निळोबाराय अभंग – ११००

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *