संत निळोबाराय अभंग

सुखें भिक्षा मागोन – संत निळोबाराय अभंग – ११०७

सुखें भिक्षा मागोन – संत निळोबाराय अभंग – ११०७


सुखें भिक्षा मागोन खावें ।
हरीचें करावें कीर्तन ॥१॥
कलियुगीं हें साधन सार ।
भवसिंधू पार पाववितं ॥२॥
नेघोनियां गुणदोष ।
करावें घोष हरिनामें ॥३॥
निळा म्हणे सुगम सिध्दी ।
तुटती उपाधी सकळही ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सुखें भिक्षा मागोन – संत निळोबाराय अभंग – ११०७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *