संत निळोबाराय अभंग

अंतरींचे जाणा वर्म – संत निळोबाराय अभंग – १११७

अंतरींचे जाणा वर्म – संत निळोबाराय अभंग – १११७

अंतरींचे जाणा वर्म ।
कर्माकर्म फळदातें ॥१॥
तरि कां माझा अव्हेर केला ।
काय तो देखिला स्वभाव दुष्ट ॥२॥
नेणें करुं तुमची सेवा ।
परि मी देवा नाम जपें ॥३॥
निळा म्हणे यावरी आतां ।
येईल चित्ता तैसें करा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अंतरींचे जाणा वर्म – संत निळोबाराय अभंग – १११७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *