संत निळोबाराय अभंग

भाव भक्ति विलासिया – संत निळोबाराय अभंग – ११३६

भाव भक्ति विलासिया – संत निळोबाराय अभंग – ११३६


भाव भक्ति विलासिया ।
परिसा विनंती पंढरीराया ॥१॥
आम्हां दासां सांभाळिजे ।
देउनी प्रेम गौरविजे ॥२॥
जैसी तुमची आहे ख्याती ।
तैसीचि चालों दया जी पुढती ॥३॥
नाहीं तरि होईल हांसें ।
लोकीं ब्रीद लटिकें दिसे ॥४॥
तुम्ही आम्हां उपेक्षिलें ।
तरी हीनत्व सांगा कोणा आलें ॥५॥
निळा म्हणे पुढीला चाली ।
वाट पाहिजे रक्षिली ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भाव भक्ति विलासिया – संत निळोबाराय अभंग – ११३६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *