संत निळोबाराय अभंग

लाभ अथवा हानी – संत निळोबाराय अभंग – ११४६

लाभ अथवा हानी – संत निळोबाराय अभंग – ११४६


लाभ अथवा हानी करितां व्यवसाय ।
आम्हां कते विपाय फळां आले ॥१॥
एका लाभा पात्र केलें तिहीं लोकीं ।
आम्हां नेलेंशेखीं ऐशा थरा ॥२॥
फजितीसी उणें नाहीं लोकांमाजी ।
अंतरविलें काजीं संसारिकां ॥३॥
नव्हता कळों आला निश्च्‍याचा भावो ।
येणें काळें देवो निष्ठुरसा ॥४॥
गेलें होऊनियां न चले या युक्ति ।
होणार ते गती हो कां सुखें ॥५॥
निळा म्हणे लाजे झाली प्राणसंधी ।
न ये करुणानिधी कृपा तुम्हां ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

लाभ अथवा हानी – संत निळोबाराय अभंग – ११४६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *