संत निळोबाराय अभंग

ध्यानीं चिंतनी मानसीं – संत निळोबाराय अभंग – ११८६

ध्यानीं चिंतनी मानसीं – संत निळोबाराय अभंग – ११८६


ध्यानीं चिंतनी मानसीं ।
हरितें ध्याता अहर्निशीं ।
तोचि होऊनिया भक्तरासी ।
झाले विठठलिं विठ्ठल ॥१॥
कीटकी भृंगी ऐशी रुप ।
तीव्र ध्यानें ते तद्रुप ।
विष्णु जेवीं शिवस्वरुप ।
शिवहि विष्णु चिंतनें ॥२॥
नर तोचि नारायण ।
अर्जुनरुपें विलसे कृष्ण ।
येरे येरे विराजमान ।
करितां ध्यान तद्रुपता ॥३॥
निरसोनियां अविदयाजात ।
देव तैसेचि झाले भक्त ।
मोहममता कामातीत ।
जाले सतत निजध्यासें ॥४॥
निळा म्हणे अर्धनारी ।
रुप विलसें नटेश्वरीं ।
दोनि दाउनी एक शरीरीं ।
दोघां नाहीं दोनिपणें ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ध्यानीं चिंतनी मानसीं – संत निळोबाराय अभंग – ११८६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *