संत निळोबाराय अभंग

देतां कांहींचि न घेती – संत निळोबाराय अभंग – १३२२

देतां कांहींचि न घेती – संत निळोबाराय अभंग – १३२२

देतां काहींचि न घेती ।
संत उदासीन चित्तीं ॥१॥
त्रैलोक्यींचा मानधन ।
नावडे तयां देवाविण ॥२॥
नाहीं आस्था देहावरी ।
आशा तृष्णा कैंची उरी ॥३॥
निळा म्हणे ते देवचि झाले ।
कल्पकल्पांतीं संचले ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देतां कांहींचि न घेती – संत निळोबाराय अभंग – १३२२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *