संत निळोबाराय अभंग

मग तो उतरुनियां – संत निळोबाराय अभंग – १३३

मग तो उतरुनियां – संत निळोबाराय अभंग – १३३


मग तो उतरुनियां गिरी ।
आले गोकुळा भीतरीं ।
तंव धावोनियां नरनारी ।
लोटांगणे घालिती ॥१॥
मेघीं सांगता सूरपती ।
आनंदला होता चित्तीं ।
तोचि आला गोकुळाप्रती ।
निज नयनीं पहावया ॥२॥
तंव तों गोंवळ पहिलियाची ऐसे ।
केळवती का नोवरे जैसे ।
गाई चौताळताती हर्षे ।
तैसेचि गोकुळींहिं स्वानंदें ।
गौळी गौळणी मिरवती ॥४॥
इंद्र देखोनियां ते दृष्टी ।
विस्मयापन्न झाला पोटीं ।
म्हणे संवर्तकाचिये वृष्टी ।
पुढें कैसी वांचली हीं ॥५॥
तस्मात परमात्मा हा श्रीहरी ।
कृष्णवेषें महीवरी ।
अवतरला जाणेनियां अंतरीं ।
स्तवन करी निज मूखें ॥६॥
निळा म्हणे शरणांगत ।
म्हणवी घाली दंडवत ।
त्राहें त्राहें म्यां महिमा नेणत ।
केला अपराध क्षमा कीजे ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मग तो उतरुनियां – संत निळोबाराय अभंग – १३३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *