संत निळोबाराय अभंग

आठऊनियां श्रीकृष्णचरण – संत निळोबाराय अभंग – १४०

आठऊनियां श्रीकृष्णचरण – संत निळोबाराय अभंग – १४०


आठऊनियां श्रीकृष्णचरण ।
अक्ररें रायातें पुसोन ।
चालिला रथावरी बैसोन ।
मार्गी हरिगुण आठवितु ॥१॥
गोकुळा पाठविला अक्रूर ।
परि कंसामनी दचक थोर ।
तेणें पाचारुनियां धनुर्धर ।
चौकिये बाहेर बसविले ॥२॥
म्हणे येतां देखोनियां कृष्णासी ।
युध्द करावें अति आवेशीं द उतरुनी त्याचिया मस्तकासी ।
मजपाशीं आणावें ॥३॥
रजका सांगे निजमुखें ।
कृष्णा येतांचि धोपटीं सुखें ।
तुझिये पाठिसि हे आसिकें ।
सावध ठेविले धनुर्धर ॥४॥
मग बोलाऊनियां मल्लजेठी ।
बैसविले ते दारवंटी ।
मातला हस्ती त्याचिये पुष्टीं ।
कुळवई ठेवियेला ॥५॥
तया भोंवते आणिक कुंजर ।
उभे केले ते दळभार ।
तंव इकडे जाऊनियां अक्रूर ।
भेटला नंद यशोदेसी ॥६॥
निळा म्हणे पुसे कृष्णा ।
तंव ते म्हणतीं गेला राना ।
मग रथ तेथेंचि ठेऊनी जाणा ।
चालिला दर्शना कृष्णाचिया ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आठऊनियां श्रीकृष्णचरण – संत निळोबाराय अभंग – १४०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *