संत निळोबाराय अभंग

हरिभक्त माझे जिवलग सांगाती – संत निळोबाराय अभंग – १४०६

हरिभक्त माझे जिवलग सांगाती – संत निळोबाराय अभंग – १४०६

हरिभक्त माझे जिवलग सांगाती ।
सांभाळूनी नेती परलोका ॥१॥
वचनेंचि त्यांच्या होय महा लाभ ।
करी पदमनाभ कृपादृष्टी ॥२॥
मोहादिबंधनें जाती तुटोनियां ।
कळिकाळहि पायांतळीं दडे ॥३॥
निळा म्हणे मुक्त मोकळिया वाटा ।
जावया वैकुंठा त्यांच्या संगें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

हरिभक्त माझे जिवलग सांगाती – संत निळोबाराय अभंग – १४०६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *