संत निळोबाराय अभंग

ईश्वरा नियंता निगुण – संत निळोबाराय अभंग – १४२४

ईश्वरा नियंता निगुण – संत निळोबाराय अभंग – १४२४


ईश्वरा नियंता निगुण ।
नाम रुप जया नाहीं वर्ण ।
विदया अविदयातीत चिदधन ।
आपणा जो आपण्‍ गुरुशिष्य ॥१॥
नातळोनि महदहंकार मायेसी ।
सहजचि गुणतीत तो अनायासीं ।
होणें निमणें नाहीं ज्यासी ।
आपण आपणासी कदा न देखे ॥२॥
नुरवुनी एक एकपण ।
दुजेपणा घालीत शून्य ।
पूर्णपणें नुरवीच पूर्ण ।
तत्साक्षी आपण सर्वद्रष्टा ॥३॥
ऐसिया आदि गुरुमूर्ति ।
आपणचि पुरुष आपण शक्ति ।
उमामहेश ऐशिया ख्याति ।
वाढउनी त्रिजगती विस्तारिली ॥४॥
मग आपण गुरु आपण शिष्य ।
आपण दीक्षा आपण उपदेश ।
दाउनी परंपरेचा मोस ।
अभेदज्ञानास प्रगटीतु ॥५॥
म्हणोनियां जी आदिनाथा ।
प्रकृति पुरुष तूंचि तें आतां ।
सकळ विश्वी विश्वजनिता ।
करिसी तत्वता निजबोध ॥६॥
शिव शक्ति निमित्य दावून ।
उपदेशिलें निजगुह्यज्ञान ।
तेणें देवोदेवि सुखसंपन्न ।
पावला मीन तो लाभ ॥७॥
तेणें गोरक्षीं उपदेशिला ।
निजात्मज्ञानीं प्रबोधिला ।
त्रैलोक्यमाजी गौरविला ।
योग दाविला विषदार्थ ॥८॥
गुह्यात़गुह्यज्ञानकथन ।
तेणें गहिनीतें उपदेशून ।
उध्दरावया दीन जन ।
तेणें निवृति शिक्षापिला ॥९॥
तेचि हातवटी ज्ञानेश्वरा ।
दिधली आदिपरंपरा ।
सोपान मुक्ताई वटेश्वरा ।
चांगया प्रसाद दिधला ॥१०॥
निळा म्हणे ऐसियापरी ।
नाथसांप्रदायाची थोरी ।
प्रगट केली ज्ञानेश्वरी ।
भगवदगीता उकलुनी ॥११


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ईश्वरा नियंता निगुण – संत निळोबाराय अभंग – १४२४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *