संत निळोबाराय अभंग

आम्ही लेंकुरें लळेवाडें – संत निळोबाराय अभंग – १४३

आम्ही लेंकुरें लळेवाडें – संत निळोबाराय अभंग – १४३


आम्ही लेंकुरें लळेवाडें ।
तुमचीं तैसीं त्याहि पुढें ।
क्रीडा करुनी वाडे कोडें ।
येऊं भेटोनियां वोरसें ॥१॥
नाहीं तया पोटीं मैल ।
अत्यादरें धाडिलें असे मूळ ।
अक्रूर सांगताहे केवळ ।
भेटी आमुची इच्छितो ॥२॥
तुम्ही न धरावा संशय ।
तेथें आम्हां नाहीं भय ।
मामाभेटी जातां काय आमुची इच्छितो ॥२॥
तुम्ही न धरावा संशय ।
तेथें आम्हां नाहीं भय ।
मामा भेटी जातां काय ।
उव्देग घडती भाचिया ॥३॥
ते म्हणती रे नव्हे कृष्णा ।
तुम्ही त्याचा भावार्थ नेणां ।
कालिची पहा पां पूतना ।
आली होती घातावया ॥४॥
केवढी दाऊनियां माया ।
बसलीं तुंतें स्तन धावया ।
कृष्णा म्हणे मी धालों तिचिया ।
स्तनपानेंची आजिवरी ॥५॥
तिणें वेचोनियां कायाशक्ती ।
आम्हांसि तोषविलें प्राणांतीं ।
उपकार तिचेहि श्रीपती ।
म्हणे मुखें मी काय वानूं ॥६॥
निळा म्हणें बोलो‍नि ऐसें ।
न रहातीचि चालिले उददेशें ।
गोपिका गौळणीही ऐकोनि ऐसें ।
आल्या धांवत हरिपाशीं ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आम्ही लेंकुरें लळेवाडें – संत निळोबाराय अभंग – १४३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *