संत निळोबाराय अभंग

कृष्ण परमात्मा श्रीहरी – संत निळोबाराय अभंग – १५३

कृष्ण परमात्मा श्रीहरी – संत निळोबाराय अभंग – १५३


कृष्ण परमात्मा श्रीहरी ।
बळिराम शेषअवतार निर्धारी ।
कैसे शोभले अलंकारीं ।
निजांगाचियें निज प्रभे ॥१॥
मुगुट कुंडले विशाळ डोळे ।
जैसी विकासलीं सूर्यकमळें ।
अंगकांती रुप सांवळें ।
पीतांबराची परिधानें ॥२॥
कंठी पदकें सुमनकळा ।
कौस्तुभ एकावळी रुळती गळां ।
बाहुभूषणें मुद्रिका सकळां ।
कांडोवाडी सुशोभित ॥३॥
सुकुमार नागर अंगकांती ।
ज्याचिया तेजें रविशशी दीप्ती ।
हुताशनीं रत्नीं प्रकाशे फांकती ।
ज्याचेनियां झगमगती तारांगणे ॥४॥
सुवर्ण म्हणती जें उत्तम ।
तें याचिये अंगकांती सुमहिम ।
ऐसे सौंदर्य निरुपम ।
कृष्णाकृती वोसंडलें ॥५॥
जैसिया परी तैसा भासे ।
हेंहि अपूर्वचि एक असे ।
कृष्णरुपें लाविलें पिसें ।
न स्मरती पहातां देहगेहा ॥६॥
निळा म्हणे बैसली दृष्टी ।
कृष्णारुपीं ते सहसा नुठी नरनारी विस्मित पोटीं ।
अवलोकिती श्रीकृष्णा ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कृष्ण परमात्मा श्रीहरी – संत निळोबाराय अभंग – १५३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *