संत निळोबाराय अभंग

कुवळई मर्दूनियां उन्मत्त – संत निळोबाराय अभंग – १६०

कुवळई मर्दूनियां उन्मत्त – संत निळोबाराय अभंग – १६०


कुवळई मर्दूनियां उन्मत्त ।
उपटूनियां घेतले त्यांचे दांत ।
बळिराम आणि कृष्णनाथ ।
आनंदें नाचत रणसौरे ॥१॥
दोघेहि बंधु अति सुंदर ।
लावण्यगुणें गुणगंभीर ।
हे देखोनियां महावीर ।
मुष्टीक चाणूर उठावले ॥२॥
ते रायाचे परम आप्त ।
आतुर्बळी बळ प्रताप ।
जयां देखतांचि आहाकंप ।
देवां दैत्या मनवां ॥३॥
दंडी मुडपी उरीं शिरीं ।
अदभुत बळाची उजरी ।
काळासम तुल्य ते निशाचरीं ।
जेठिया वस्ताद मल्लाचे ॥४॥
तयाचिये दृष्टीपुढें ।
मेरुमांदार भासती खडे ।
मल्लविधेमाजी निधडे ।
वीर उन्नत शिघ्रकोपी ॥५॥
जयाचा सदा आडदरा ।
समुद्रवलयांकिता वीरा ।
धाकें त्याचिया कंसापुरा ।
देती करभार सर्वही नृप ॥६॥
निळा म्हणे ते आग्रगण ।
जेठियांमाजी शिरोरत्न ।
भुजा दंडांतें थोपटून ।
राहिले उठोन पुढें उभे ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कुवळई मर्दूनियां उन्मत्त – संत निळोबाराय अभंग – १६०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *