संत निळोबाराय अभंग

मी तों नेणें व्यासवाणी – संत निळोबाराय अभंग – १६७

मी तों नेणें व्यासवाणी – संत निळोबाराय अभंग – १६७


मी तों नेणें व्यासवाणी ।
अर्थ गह्यार्थ जे जे पुराणीं ।
बोलीले कवी प्रासाद वाणी ।
तेही अर्थ मी नेणें ॥१॥
आपुलिये आवडीचिये भरीं ।
गौरविली म्यां हे वैखरी ।
श्रवण करावी हे चतुरीं ।
ऐशी नव्हेचि मुग्ध वाणी ॥२॥
परी एक आहे विश्वास थोरु ।
स्वामी तुकया हा सद्गुरु ।
न करील कदाही अव्हेरु ।
भाव माझा जाणोनी ॥३॥
कृष्णचरित्रीं हे वाग्बाणीं ।
वदविली तिहिंचि वर देउनी ।
पुरविली माझी हे आयणी ।
आर्त जाणोनि अंतरीचें ॥४॥
निळा म्हणे कृष्णार्पण ।
होतु कथिलें ते कृष्णगुण ।
ऐशी हे प्रार्थना करुन ।
ठेविला मस्तक चरणांवरी ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मी तों नेणें व्यासवाणी – संत निळोबाराय अभंग – १६७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *