संत निळोबाराय अभंग

ऐकीं एकपणाचा घेउनियां – संत निळोबाराय अभंग – १६९

ऐकीं एकपणाचा घेउनियां – संत निळोबाराय अभंग – १६९


ऐकीं एकपणाचा घेउनियां त्रास ।
जाला नानाकार स्वरुपें बहुवस ।
म्हणोनि दुसरेंचि नाढळे वोयास ।
जयाततयामाजीं याचाचि रहिवास वो ॥१॥
ऐसे निजात्मया जाणोनि गोविंदा ।
जीवे भावें अनुसरल्या प्रमदा ।
करिती सेवावृत्ति निशिदिनी सदा ।
हसती रुसती करिती विनोदा वो ॥२॥
सर्वसाक्षी सर्वही जाणता ।
सर्व करुनियां म्हणावे अकर्ता ।
जीवीं जिवाचा हा आप्तचि सर्वथा ।
जेथें तेथें याची नित्य एकात्मता वो ॥३॥
नित्य अंगसंगें भोग त्यासि देति ।
दृष्टी अवलोकूनि गुण त्याचे गाती ।
नेऊनि एकांति वो निजगुज बोलती ।
करिती कामधाम परी त्याचिपासीं वृत्ति वो ॥४॥
सासु सासुरिया भ्रतारासी चोरी ।
नणंदा जावा त्याही त्यजूनियां घरीं ।
देती आलिंगन निजात्मया हरी ।
येथुनि म्हणती संसारा बोहरी वो ॥५॥
ऐशा निळा म्हणे झाल्या हरिरता ।
त्या त्या विराजती मुक्तिचिया माथा ।
नानासाधनांच्या लाजउनि चळथा ।
जाल्या असोनि संसारि नित्यमुक्ता वो ॥६


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐकीं एकपणाचा घेउनियां – संत निळोबाराय अभंग – १६९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *