संत निळोबाराय अभंग

वेणु वाजवीत यमुनेच्या – संत निळोबाराय अभंग – १७८

वेणु वाजवीत यमुनेच्या – संत निळोबाराय अभंग – १७८


वेणु वाजवीत यमुनेच्या तटीं ।
उभा कान्हया सांवळा जगजेठी ।
भोंवती गोधनें वो थाटीं ।
एकोनि गवळणी धांवती उठाउठीं वो ॥१॥
ऐसा जनमन मोहनरंजवणा ।
गुणीं गुणातीत नंदाचा पोसणा ।
करुनि अकर्ता हा सृष्टयादिरचना ।
विश्वीं विश्वातीत अलक्ष देखणा वो ॥२॥
बैसोनि विमानीं याच्या पाहो येति खेळा ।
देव सकळही मिळोनियां पाळा ।
वोघ कुंठित या यमुनाच्या जळा ।
वरुषे ब्रम्हानंद नरनारी बाळावों ॥३॥
जलचर भूचर खेचर वनचरें ।
लुब्ध होऊनियां वेणेचिया स्वरें ।
राहिलीं तटस्थचि मानसें शरीरें ।
नेणती वैरभाव एकत्र परस्परें वो ॥४॥
पवन निश्चलचि होऊनियां ठेला ।
सूर्य अस्तमाना जाऊं विसरला ।
वत्सें न पिती देहभाव गेला ।
मुखींचा कवळ गाईमुखींचि राहिला वो ॥५॥
ऐसा स्वानंदाचा आला महापुर ।
कृष्णवेणुध्वनी लोधले अंतर ।
नेत्रीं गळताती प्रेमाचे पाझार ।
निळा म्हणे देहीं देहा अनाचार वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वेणु वाजवीत यमुनेच्या – संत निळोबाराय अभंग – १७८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *