संत निळोबाराय अभंग

एकली एकटची होती – संत निळोबाराय अभंग – १९१

एकली एकटची होती – संत निळोबाराय अभंग – १९१


एकली एकटची होती ये सदनीं ।
तव आयीकिली मुरलीची ध्वनी ॥ गेले
धांवोनियां पहावया लोचनीं ।
तंव गेलिये देहभाव विसरोनी ॥१॥
हरि देखतांची मदनाचा पुतळा ।
गेला जडोनियां बैसला तो डोळा ॥
मनीं आठवे साजणी वेळोवेळां ।
नेल्या शोषुनी माझीया जीवनकळा वो ॥२॥
नव्हतें जवळी दुसरें बाई कोणी ।
नको जाऊं ऐसें सागावया लागुनी ॥
नेईल जीवभाव सर्व हा हरुनी ।
मग पडसि तूं याचेचि व्यसनीं वो ॥३॥
ऐसि जाजावोनि बोले सखियाप्रती ।
येरी टकमकां पाहोनि हांसती ।
म्हणती जाणोनियां होसि कां नेणती ।
भाग्यें लाधलिसी धरुनी राहें चित्तीं वो ॥४॥
आजि तुझिया भाग्यासी नाहीं पार ।
झाला परिचय पाहिला सारंगधर ।
ज्यालागी शिणति हे योगी मुनीश्वरा तोचि तुझें ह्रदयींचा परात्पर वो ॥५॥
निळा म्हणे मोडोनि वैभवा वैभव ।
सकळहि सुखचीच जोडली राणिव ।
देखिला यदुपति निजलावण्याची ठेव वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एकली एकटची होती – संत निळोबाराय अभंग – १९१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *