संत निळोबाराय अभंग

झाला विरह हे नये देहावरी – संत निळोबाराय अभंग – १९३

झाला विरह हे नये देहावरी – संत निळोबाराय अभंग – १९३


झाला विरह हे नये देहावरी ।
देतां वोषधे वो आणितां पंचाक्षरी ।
देवि देवतांची नचले येथें थोरी ।
नाना उपायांच्या करिता भरोवरी वो ॥१॥
आण वेगिरी तो सावळा सुंदर ।
मदनमूर्ति वो नदाचा कुमर ।
तया भेटतांचि होईल उतार ।
पुरेल आर्त हे वाचेल सुंदर वो ॥२॥
येकि सखिया त्या येउनि विनविती ।
येकि हरिचीया पायावरी लोळती ।
येकि करुनि पंचप्राणातिं आरती ।
म्हणति चला वेगीं येकांता श्रीपति वो ॥३॥
येकी घालिती हरिसी विंझणवारा ।
येकि देति विडि त्या सुंदरा ।
येकि वारिती वरी चौया सकुमारा ।
ये म्हणति हरि चलावे मंदिरा वो ॥४॥
येकि देति चंदनाचि उटी ।
येकी लाविती कस्तुरिमळिवटी ये घालिती त्या तुळसिमाळा कंठि ।
येकि म्हणती चलावें जगजेठी ॥५॥
ऐसा विनउलि आणिला ऐकोनि जिविं ते सुखावलि बाळी ।
उठोनि सेजेवरी बैसली वेल्हाळी ।
निळयास्वामी तीचे आर्त पुरवि तये काळीं वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

झाला विरह हे नये देहावरी – संत निळोबाराय अभंग – १९३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *