संत निळोबाराय अभंग

मनींचा माझिया वो – संत निळोबाराय अभंग – १९९

मनींचा माझिया वो – संत निळोबाराय अभंग – १९९


मनींचा माझिया वो संदेह फिटला ।
देव पाहों जातां जवळींच भेटला ।
अवघा मागें पुढें तोचि वो ठाकला ।
जनीं जनार्दन भरोनियां दाटला वो ॥१॥
पुरलें जीवींचे आर्त साजणी ।
पाहें जेथें तेथें दिसे चक्रपाणी ।
लोकलोकांतरी त्याचीचि भरणी ।
भरोनि उरला अवघ्याचि वाणी खाणी वो ॥२॥
झाला सुकाळ हा सुखाचा मानसा ।
पडिला त्रिभुवनीं एकरुप ठसा ।
धरा व्यापूनियां अंबर दशदिशा ।
आतां भोगीन मी सर्वकाळ ऐसा वो ॥३॥
नाना भूताकृति एकचि आभासे ।
नाना नामें आळवितां वो देतसे ।
नाना अळंकार एकचि लेतसे ।
नागिवा उघडाही बरवाची दिसे वो ॥४॥
नाना वस्त्रें हा नेसला पांघुरला ।
जेथील तेथेंचि हा बहुरंगें नटला ।
शस्त्रें अशस्त्रे हा हातें मिरवला ।
सौम्य क्रूर ऐसा होऊनियां राहिला वो ॥५॥
एका निववी भोगवी नाना भोग ।
एका खाववी जेववी दावी जग ।
एका विचरे देऊनि अंगसंग ।
निळा म्हणे हा एकलाचि अनंग वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मनींचा माझिया वो – संत निळोबाराय अभंग – १९९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *