संत निळोबाराय अभंग

मी मज माझीयाचा तुटला – संत निळोबाराय अभंग – २००

मी मज माझीयाचा तुटला – संत निळोबाराय अभंग – २००


मी मज माझीयाचा तुटला संबंध ।
ऐसा लाविला वो येणें मज वेध ।
जिविं जीवाचा हा मोडिल कंद ।
नुरे देहभाव ऐसा केला बोध वो ॥१॥
सखिये साजणी वो ऐके माझें गुज ।
याति पाहतां वो बोलतां सहज ।
नेलें हरुनियां अंतरींचें निज ।
पुढें नाचवि हा आपलेंचि भोज वो ॥२॥
करितां कामधाम विसरुचि पडे ।
ध्यानिं आठवे हो याचेचि रुपडे ।
राहें वेष्टूनियां हाचि मागें पुढें ।
याविण न दिसेचि केले मज वेडे वो ॥३॥
करितां भोजन वो निजतां शयनीं ।
जागृतिं जागतां वो बोलतां वदनिं ।
हाचि जडोनियां ठेला माझें मनीं ।
नेदि हा पारिखेचि दिसों जनिंवनिं वो ॥४॥
नेदि उमजो हा येऊं देहावरि ।
केलि माझिया संसारा बोहरी ।
हाचि व्यापुनियां ठेला घरींदारीं ।
ऐसा नाटक हा नंदाचा खिल्लारि वो ॥५॥
येणें ऐशाचि वो मोहिल्या सुंदरा ।
नेल्या भुलउनि आपुल्या मंदिरा ।
हें मी नेणोनियां गेले याच्या दारा ।
तव निळा म्हणे वेधिले अंतरा वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मी मज माझीयाचा तुटला – संत निळोबाराय अभंग – २००

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *