संत निळोबाराय अभंग

वदन निमासुरें कटांवरीं – संत निळोबाराय अभंग – २०९

वदन निमासुरें कटांवरीं – संत निळोबाराय अभंग – २०९


वदन निमासुरें कटांवरीं कर ।
उभा विटेवरीं पुंडलिका समोर ।
चरणीं ब्रीदावळी रुळती असूर ।
वरी वाळे वांकी रुणझुणिती मधुर वो ॥१॥
तेणें नवलचि केलें वो साजणी ।
सहज अवलोकितां संचारला नयनीं ।
त्याविण न दिसेचि दुजें जनीं वनीं ।
जें जें दिसे तें तें हाचि भासे मनीं वो ॥२॥
कांसे कसिला वो मिरवें सोनसळा ।
कटीं कटिसूत्र जडित मेखळा ।
उदरीं त्रिवळीं वों तुळसी वनमाळा ।
कौस्तुभ पदकें व्दिजचरणांकुश सोज्ज्वळा ॥३॥
मुखमयंक पूर्णाशें उगवला ।
भक्त चकोरासी अमृतें वंरुषला ।
दंत हिरयाचा प्रकाश फांकला ।
अधर सोज्जवळ वो नासाग्र सरळा वो ॥४॥
निडळीं रेखिलें वो केशर झळके ।
श्रवणीं कुंडलाचें तेज फांके ।
नयनीं सुतेज विदयुल्लता चमके ।
माथां मुगुटावरी मयूरपिच्छा स्तवकें वो ॥५॥
सुंदर साजिरें वो स्वरुप ठाणमाण ।
तेणें आकर्षिलें माझे पंचप्राण ।
नावडे आणिक वो त्याचीच मज आण ।
निळा म्हणे मी माझें याची झाली बोळवण वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वदन निमासुरें कटांवरीं – संत निळोबाराय अभंग – २०९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *