संत निळोबाराय अभंग

सुकुमार साजिरें ठाण – संत निळोबाराय अभंग – ३००

सुकुमार साजिरें ठाण – संत निळोबाराय अभंग – ३००

सुकुमार साजिरें ठाण ।
धरिलें जघन दोन्ही करीं ॥१॥
विटेवरी दिव्यरुप ।
कोटि कंदर्प ओवाळिले ॥२॥
तुळसी माळा वैजयंती ।
कौस्तुभ दीप्ती पदकांची ॥३॥
निळा म्हणे हदयावरी ।
दिधली थोरी व्दिजपधा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सुकुमार साजिरें ठाण – संत निळोबाराय अभंग – ३००

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *