संत निळोबाराय अभंग

येरीकडे गोकुळाभीतरी – संत निळोबाराय अभंग ३५

येरीकडे गोकुळाभीतरी – संत निळोबाराय अभंग ३५


येरीकडे गोकुळाभीतरी ।
येतांचि परमात्मा श्रीहरी ।
विश्वकर्मा येऊनियां निमिशावरी ।
नगर शृंगारी कौतुके ॥१॥
निजेलीचे असतां नारीकुमरें ।
शृंगारिलीं वस्त्रे अळंकारें ।
वृध्द होताती ते निमासुरे ।
रुंपे मंडित योजिलीं ॥२॥
धन कनक घरोघरी ।
नाना धान्याचिया परी ।
सुख सोहळा वर्ते शरीरीं ।
पलंग सुपत्या न्याहालीया ॥३॥
नाना फळफळावळी ।
सुमने वरुषती वृक्षातळी ।
एकैक सुखाची नव्हाळी ।
वर्ते गोकुळी निजानंर्दे ॥४॥
कामधेनु ऐशीं गुरें ।
नंदिनीचिये परीचे वासुरे ।
प्राप्त:काळी देखती नारीनरें ।
परम विस्मयें दाटली ॥५॥
लक्ष्मी न समाय गोकुळांत ।
लेणीं लुगडीं अंळकारमंडित ।
धन संपत्ती नाही गणित ।
जेथे श्रीकांत वस्ती आला ॥६॥
निळा म्हणे सुखाची मरणी ।
गाई गोवळा आली गौळणी ।
सारस्वतें घोकिली तैशी वाणी ।
मधुर शब्दें अनुवादती ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

येरीकडे गोकुळाभीतरी – संत निळोबाराय अभंग ३५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *