संत निळोबाराय अभंग

बोलाविल्यावांचूनि आला – संत निळोबाराय अभंग – ३६८

बोलाविल्यावांचूनि आला – संत निळोबाराय अभंग – ३६८


बोलाविल्यावांचूनि आला ।
उभा पाठीसी ठाकला ।
अवचित पुंडलिकें देखिला ।
मग पुजिला उपचारीं ॥१॥
म्हणे आजी हें नवल झालें ।
मज अनाथा सांभाळिलें ।
ब्रीद आपुलें साच केलें ।
सुयाणें घडलें स्वामीचें ॥२॥
देव म्हणती तुझिया भावा ।
देखोनि पावलों विसांवा ।
उभा राहोनि करीन सेवा ।
न वजें आतां येथुनी ॥३॥
पंच महापातकी येती ।
तेही येथें मुक्त होती ।
ऐसा पुरस्करुनी पुंडलिकाप्रती ।
वरु दिधला त्रिवाचा ॥४॥
निळा म्हणे सात्विक जन ।
करिती तेथें हरि-कीर्तन ।
तें तों ब्रम्ह सनातन ।
पावती वचन हें सत्य ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बोलाविल्यावांचूनि आला – संत निळोबाराय अभंग – ३६८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *