संत निळोबाराय अभंग

सुदर्शन धरिलें शिरीं – संत निळोबाराय अभंग – ३९०

सुदर्शन धरिलें शिरीं – संत निळोबाराय अभंग – ३९०


सुदर्शन धरिलें शिरीं ।
क्षेत्राभोंवतें फिरे वरी ।
जगदात्मा राज्य करी ।
पांडुरंग तेथींचे ॥१॥
शिव सांगे स्कंदाप्रती ।
पंचक्रोशीमाजीं वस्ती ।
कृमी कीटकादि जीवयाती ।
ते ते होती चतुर्भज ॥२॥
नरनारी तेथींचे जन ।
हरि सन्निध हरिची समान ।
नित्य करिती अवलोकन ।
प्रत्यक्ष रुप विष्णूचें ॥३॥
भूमंडळींचीं सकळ तीर्थे ।
होतीं चंद्रभागेसी सुस्नातें ।
माध्यान्हकाळीं येऊनि तेथें ।
करितीं मार्जनें नित्यानि ॥४॥
पुंडलिक मुनीश्वर ।
घेऊनी पूजेचें संभार ।
माता पिता आणि हरिहर ।
पूजी विठोबारायातें ॥५॥
जे जे प्राणी यात्रेसि येती ।
ते ते वैकुंठीचि वसती ।
प्रत्यक्ष श्रीहरीतें भेटती ।
पुन्हां न येती संसारा ॥६॥
सकळ देवांचे देवतार्चन ।
मुनिजनांचे ध्येय जे ध्यान ।
संत सनकादिकांचें जीवन ।
उभें असें विटेवरी ॥७॥
नाम स्मरतांचि पावन करी ।
दर्शनानेंचि पतीतासी उध्दरी ।
युगें गेलीं परी हा दुरी ।
नवजेचि भक्तापासुनि ॥८॥
देव भक्ततीर्थक्षेत्र ।
चारी सन्निध ऐसे विचित्र ।
पाहती याचे धन्य नेत्र ।
स्वयें पंचनवत्क्त्र अनुवादला ॥९॥
अगाध क्षेत्र हें पंढरपुर ।
सकळिक संतांचें माहेर ।
घर सोळा सहस्त्र अंत:पूर ।
सहित रुक्मिणी रहिवासली ॥१०॥
निळा म्हणे यात्रेसी येती ।
पुण्या त्यांचिया नाही मिती ।
पाउलां पाउलीं यज्ञाचि घडती ।
प्रत्यक्ष्‍ा भेटती परब्रम्हा ॥११॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सुदर्शन धरिलें शिरीं – संत निळोबाराय अभंग – ३९०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *