संत निळोबाराय अभंग

मग वस्त्रें देउनी गौरविला – संत निळोबाराय अभंग ४४

मग वस्त्रें देउनी गौरविला – संत निळोबाराय अभंग ४४


मग वस्त्रें देउनी गौरविला ।
रायें बहूत सन्मानिला ।
चालतां मार्गी विचार सुचला ।
म्हणे टाकवीन तान्हुला निर्जनी ॥१॥
टिळे माळा टोपी शिरीं ।
श्रीमुद्रांची वोळी पंचांग करी ।
धोकटी घेउुनीयां खादियावरी ।
शुध्द मुहूतें चालिला ॥२॥
आला गोकुळासन्निधीं ।
शुध्दाचमन केलें विधी ।
मनी कापटयाची बुध्दी ।
साक्षी तियेचा परमात्मा ॥३॥
नंदगृही प्रवेशला ।
येतां यशोदेनें देखिला ।
पाट बसावया दिधला ।
पाट बसावया दिधला ।
नमूनि पूजिला उपचारी ॥४॥
स्वस्थ स्वस्थानीं बैसले ।
पंचाग काढूनियां उकलिलें ।
वाचुनी चंद्रबळ दाविलें ।
आणि दिधले आशिर्वादा ॥५॥
मग पुसे यशोदेप्रती ।
प्रसूतिकाळ कोणती तिथी ।
तंव ते आणूनियां श्रीपती ।
व्दिजातें दाखवी उल्हासे ॥६॥
देखतांचि तो मदनमूर्तीं ।
ठकल्या ठेल्या इंद्रियवृत्ती ।
निळा म्हणे समाधिस्थिती ।
पावली प्रतीति ब्राम्हणां ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मग वस्त्रें देउनी गौरविला – संत निळोबाराय अभंग ४४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *