संत निळोबाराय अभंग

जें जें करिती तें – संत निळोबाराय अभंग – ४४८

जें जें करिती तें – संत निळोबाराय अभंग – ४४८

जें जें करिती तें तें वृथा ।
पंढरिनाथा न भजतां ॥१॥
दिसे पुढें परी तें माया ।
जाइल विलया क्षणमात्रें ॥२॥
पुत्र पत्नी बंधु पशु ।
भासे अभासु परि मिथ्या ॥३॥
निळा म्हणे वित्त गोत ।
नेणसी नाशवंत हें सकळ ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जें जें करिती तें – संत निळोबाराय अभंग – ४४८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *