संत निळोबाराय अभंग

बैसला होता पाटावरी – संत निळोबाराय अभंग ४६

बैसला होता पाटावरी – संत निळोबाराय अभंग ४६


बैसला होता पाटावरी ।
तोचि थरारिला ते अवसरीं ।
निसटोनियां पृष्ठीवरी बैसला ।
अवचिता निघातें ॥१॥
वढिला येऊनियां चौपाशीं ।
घरोघरींच्या पिढियांनी ॥२॥
मग म्हणे धावां धावां ।
याचिये हातींचे मज सोडवा ।
नडलों आपुल्या कापटयभावा ।
नाही स्मरलों चांडाळा ॥३॥
अचेतन हे धांवती काष्ठे ।
लक्षानुलक्ष कोटयानुकोटें ।
आतां कैंचे जिणें येथें अदृष्टें ।
मारावया आणिलें ॥४॥
लोक हांसताती भोंवताले ।
म्हणती कैसें हें नवल झालें ।
आमुचेही पाट येथें आले ।
मारुंचि बैसले माभळभटा ॥५॥
येथें न चले कोणाचेंचि कांहिं ।
ईश्वरइच्छेची हे नवाई ।
ब्राम्हण म्हणोनी सोडिला पाहिं ।
नागवा उघडा माभळभट ॥६॥
निळा म्हणे लवडसवडी ।
पळतां भूई त्या झाली थोडी ।
येऊनियां कंसाचिये देवडीं ।
शंखस्फूरणे उभा ठेला ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बैसला होता पाटावरी – संत निळोबाराय अभंग ४६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *