संत निळोबाराय अभंग

अष्टहि दिग्गज आणि – संत निळोबाराय अभंग – ४६०

अष्टहि दिग्गज आणि – संत निळोबाराय अभंग – ४६०

अष्टहि दिग्गज आणि दिकपाळ ।
थावरिले कुळाचळ निज सत्ता ॥१॥
तो हा परमात्मा श्रीहरी ।
येऊनि इटेवरीं ठाकला ॥२॥
जेणें सागर सप्तामृतीं ।
भरिले उचंबळती सर्वदा ॥३॥
निळा म्हणे ज्याचेनी रवी ।
नित्य नवा मिरवी प्रकाश ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अष्टहि दिग्गज आणि – संत निळोबाराय अभंग – ४६०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *