संत निळोबाराय अभंग

आरुपीं रुपाचा विस्तार – संत निळोबाराय अभंग – ४६२

आरुपीं रुपाचा विस्तार – संत निळोबाराय अभंग – ४६२


आरुपीं रुपाचा विस्तार ।
अगुणीं गुणांचा श्रृंगार ।
अनामीं नामांचा बडिवार ।
सहस्त्रावरी विराजला ॥१॥
नाहीं अवतारा मर्यादा ।
अपार गुणांची संपदा ।
केलीं चरित्रें सच्चिदानंदा ।
कोण वर्णितां पुरेल ॥२॥
वृध्द तरुण नव्हती मुग्ध ।
सूक्ष्म स्थूळ ना अगाध ।
तरंग सागरींचे बुदबुद ।
नाहीं गणना त्यां जैशीं ॥३॥
अनंतरुपा मधुसूदना ।
जगत्रयव्यापका जनार्दना ।
योगिमानसमनोरंजना ।
अहो निधाना सुखमूर्ति ॥४॥
मुख मंडित सुंदर कर ।
कटी विराजले सुकुमार ।
चरणीं ब्रीदाचा तोडर ।
रुळती असुर तया तळीं ॥५॥
संत गर्जती स्वानंदें ।
कीर्त करिती ब्रम्हानंदे ।
नित्य करिती नाना छंदें ।
पढती ब्रिदें सुस्वरे ॥६॥
निळा म्हणे तया सुखा ।
नाहीं पार नव्हे लेखा ।
समाधि लागे सनकादिकां ।
तो सोहळा देखोनी ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आरुपीं रुपाचा विस्तार – संत निळोबाराय अभंग – ४६२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *