संत निळोबाराय अभंग

ऐसें सांगतां माभळभटा – संत निळोबाराय अभंग ४८

ऐसें सांगतां माभळभटा – संत निळोबाराय अभंग ४८


ऐसें सांगतां माभळभटा ।
राया दचक बैसला मोठा ।
मग पाचारुनियां सुभटा ।
दैत्याप्रती काय बोले ॥१॥
म्हणे वाढविलेंती बहुता मानें ।
अपार संपदा देऊनियां धनें ।
आजि माझिया उपेगा येणे ।
बाळ कृष्ण्‍ वधणें भलत्यापरी ॥२॥
नाना विदया तुमच्या अंगी ।
रुपे पालटुनी विचरतां जगी ।
मायारुपी म्हणऊनियां स्वर्गी ।
देवही भिती तुम्हांसी ॥३॥
ऐसें असोनि माझिये गांठी ।
कायसी बाळका जळुची गोठी ।
तुमचेनी बळें हे सकळही सुष्टी ।
आर्चित झाली मजलागीं ॥४॥
पूतना गेलीते तंव नारी ।
दुसरा भट तोहि भिकारी ।
काय जाणों कैशापरी ।
देखोनी कळली तयासी ॥५॥
तो तंव अंत्यंत सकुमार ।
सांगती अवघे लहान थोर ।
सुंदरपणाचीही बहार ।
रुपा आली कृष्णाकृती ॥६॥
तरी तुम्ही जाऊनियां तेथें ।
प्रेतरुपचि आणवा येथें ।
निळा म्हणे पाहोनियां त्यातें ।
करऊं अक्षवाणें अपणा ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐसें सांगतां माभळभटा – संत निळोबाराय अभंग ४८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *