संत निळोबाराय अभंग

गाइलेचि गातां गीतीं – संत निळोबाराय अभंग – ४९७

गाइलेचि गातां गीतीं – संत निळोबाराय अभंग – ४९७


गाइलेचि गातां गीतीं ।
पवाडे तुमचेंचि श्रीपती ।
सहसा धणी न पुरे चित्तीं ।
सरितां रातिदिवस युगें ॥१॥
अनंता युगी अनंत खेळ ।
अनंता नामा रुपांचे मेळ ।
अनंत संपादिलें जे निर्मळ ।
पढतां वाचे उल्हासु ॥२॥
क्षीराब्धिशयन वैकुंठवास ।
अमरावती सत्यलोक कैलास ।
अष्टहि दिक्पाळाचे वेष ।
भरले सावकाश निजात्मरुपें ॥३॥
मच्छ कच्छ वराह रुपें ।
नृसिंह वामन परशुराम प्रतापें ।
राम कृष्ण बौध्यादि अमूपें ।
मिरविली स्वरुपें क्षुल्लकादि ॥४॥
नाना स्वर्गं सृष्टीरचना ।
नाना ऋषीरुपें वसवूनि स्थना ।
नाना संतरुपा नारायणा ।
निळा विज्ञापना करी तुमची ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गाइलेचि गातां गीतीं – संत निळोबाराय अभंग – ४९७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *