संत निळोबाराय अभंग

धराल जरी चित्तीं न – संत निळोबाराय अभंग – ५०७

धराल जरी चित्तीं न – संत निळोबाराय अभंग – ५०७


धराल जरी चित्तीं न लगेचि तरी वेळ ।
आहेती सकळ कळा हातीं ॥१॥
क्षणेचि सगुण क्षणेंचि निर्गुण ।
क्षणेंचि प्रसन्न होतां दासा ॥२॥
क्षणेंचि निर्मिले चतुर्दशलोक ।
देव ब्रम्हादिक चौदा मनु ॥३॥
झकवाल तरी ठकडे देवा ब्रम्हांदिकां ।
भेटाल तरि भाविकां नलगे वेळ ॥४॥
ऐसे संत मुनी जाणती सकळ ।
क्रीडा तुमचा खेळ ठावा तयां ॥५॥
निळा म्हणे माझें अतरींचे आर्त ।
जाणतां सतत साक्ष तुम्ही ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

धराल जरी चित्तीं न – संत निळोबाराय अभंग – ५०७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *