संत निळोबाराय अभंग

नरकासुरा वधिलें जेणें – संत निळोबाराय अभंग – ५११

नरकासुरा वधिलें जेणें – संत निळोबाराय अभंग – ५११


नरकासुरा वधिलें जेणें ।
मुरुसी मर्दुनी घेतलें ठाणें ।
वृत्रासुराचें हरिलें जिणें ।
तारकासुरा प्राणहानी केली ॥१॥
मधु दैत्याचें सूदन ।
हिरण्याक्षाचे घेतले प्राण ।
हिरण्यकश्यपा विदारुन ।
काळयवन दग्ध केला ॥२॥
रिठासुर दाढें चाचिला ।
अघा बगासुर तो चीरिला ।
तृणासुर सहजेंचि मर्दिला ।
शकट मोडिला पादघातें ॥३॥
उपटिलीं धेनकासुराचीं शिंगें ।
कंस चाणून ते वधिले रागें ।
केशियाचीं मोडिली टांगे ।
गोंकुळीं श्रीरंगें बाळपणीं ॥४॥
परशुरामें वधिला सहस्त्रार्जुन ।
एकवीस वेळां क्षत्रियांचें कंदन ।
रामें ताटिका खरदूषण ।
नासिकछेदन शूर्पनखे ॥५॥
रावण कुंभकर्ण रामें मर्दिले ।
कित्येक निशाचरातें आटिलें ।
ऐसे पवाडे संपादिले ।
बहु वेळां उतरिले धराभार ॥६॥
निळा म्हणे जे ते अवतारीं ।
भक्त रक्षूनी दैत्यां मारी ।
ऐसिया चरित्राची हारी माळा लाविल्य कल्पादी ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नरकासुरा वधिलें जेणें – संत निळोबाराय अभंग – ५११

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *