संत निळोबाराय अभंग

मागें तुम्हीं वांटिलें लोकां – संत निळोबाराय अभंग – ५१५

मागें तुम्हीं वांटिलें लोकां – संत निळोबाराय अभंग – ५१५

मागें तुम्हीं वांटिलें लोकां ।
सनकादिकां पर्यंत ॥१॥
अधम तेहि थोराविले ।
आपणा केले सारिखें ॥२॥
नाहीं विचारिली याती ।
धरिलें हातीं प्रीतीनें ॥३॥
काय त्यांचें क्रियाकर्में ।
कांही धर्म न विचारा ॥४॥
उदारपणा नाहीं सीमा ।
पुरषोत्तमा तुमचिया ॥५॥
निळा म्हणे सरतें पुरतें ।
केलें किती वर्णावें ॥६॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मागें तुम्हीं वांटिलें लोकां – संत निळोबाराय अभंग – ५१५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *