संत निळोबाराय अभंग

रन्तखचित पालख – संत निळोबाराय अभंग ५४

रन्तखचित पालख – संत निळोबाराय अभंग ५४


रन्तखचित पालख ।
सूर्या ऐसा निर्भियेला चोख ।
निरालंबी गोऊनि देख ।
मोहें उत्साह मांडियेला ॥१॥
महर्षि ऋषिहि सकळिक ।
आले पहावया कवतुक ।
अवलोकूनियां यदुनायक ।
करिती प्राणें कुरवंडिया ॥२॥
आले गौळियांचे भार ।
नाना याति नारीनर ।
नानापरीचे शृंगार ।
लेणीं लुगडीं मिरविती ॥३॥
वाणें घेऊनियां नारी ।
रत्नजडितें तबकें करी ।
देवांगना तैसियापरी ।
कृष्णवैभवें मडिता ॥४॥
पालखीं घालितां चक्रपाणी ।
नाना आल्हादें गाती गाणी ।
नाना स्वरें उमटल्या ध्वनी ।
उठती गगनीं पडिसाद ते ॥५॥
नामें ठेवूनियां पाचारिती ।
गोविंदा गोपाला यदुपति ।
सच्चिदानंदा आनंदमूर्ती ।
जगपति श्रीपति अमरपिता ॥६॥
अच्युता अनंता अपारा ।
देवकिनंदना दगदोध्दारा ।
मुनिमनमाहना सर्वेश्रवरा ।
आत्मया श्रीवरा सर्वगता ॥७॥
सुंदरा राजीवलोचना ।
जगदादीशा पंकजवदना ।
योगीमानसमनोरंजना ।
सुखनिधाना सुखमूर्ती ॥८॥
मधुमाधवा मधुसूदना ।
त्रिविक्रमा वामना संकर्षणा ।
मुकुंदा मंदारा शेषश्यना ।
राजीवाक्षा जनार्दना श्रीकृष्णा ॥९॥
निळा म्हणे ऐशिया नामें ।
गर्जती गौळणी सप्रेमा प्रेमें ।
ऐकोनियां ते पुरुषोत्तमें ।
केलिया संभ्रमे अति वाड ॥१०॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

रन्तखचित पालख – संत निळोबाराय अभंग ५४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *