संत निळोबाराय अभंग

सर्वगुणीं गुणमंडिता – संत निळोबाराय अभंग – ६०५

सर्वगुणीं गुणमंडिता – संत निळोबाराय अभंग – ६०५


सर्वगुणीं गुणमंडिता ।
सर्वरुपीं रुपशोभिता ।
सर्वी सर्व तूं अनंता ।
यश वागवितां निज कीर्ति ॥१॥
ऐसी असोनियां शक्ति ।
दवडतां कां माझी आतीं ।
चरण पहावया चित्तीं ।
वर्ते चिंता अनिवार ॥२॥
काय नाहीं तुमच्या हातीं ।
सकळ ब्रम्हांडाच्या व्यक्ती ।
घडामोडा निमिषाप्रती ।
धरा आवडतीं रुपें तैसीं ॥३॥
मासा कांसव डुकर होणें ।
नृसिंह वामन रुप ठेगणें ।
ब्रम्हचर्य आणि फरश धरणें ।
वंशनिपातनें क्षत्रियांचा ॥४॥
परमात्मा आणि राज्य करी ।
एकपत्नीव्रत शिळा तारी ।
सत्यवचनी एक बाणधरी ।
रावणारी मदनमूर्ति ॥५॥
नंदानंदन गुणातीत ।
लीलाविग्रही ऐश्वर्यनाथ ।
कामिनी भोगुनी कामातीत ।
उच्छिष्टें स्वीकारीत गौळियांचीं ॥६॥
बौध्य कलंकिया =ह्यग्रीवा ।
नामें रुपें नटलेति देवा ।
निळा म्हणे माझिया भावा ।
रुप भेटवा चतुर्भुज ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सर्वगुणीं गुणमंडिता – संत निळोबाराय अभंग – ६०५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *